सात समुद्र पोहून पार करणारी जगातील पहिली व्यक्ती भारतीय होती.

काही लोकांनी एखादी  जोपर्यंत ती मिळवत नाही तोवर ते शांत बसत नाही. आपल्या ध्येयाचा पाठलाग करून ते मिळवून त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीची जाणीव होते. आजचा किस्सा हा अशाच एका ध्येयवादी जलतरणपटूचा. ज्याने आपल्या पोहण्याच्या कौशल्याच्या जोरावर जागतिक विक्रम नोंदवला.

मिहीर सेन. हे एक भारतीय जलतरणपटू होते.

ज्यांनी एका कॅलेंडर वर्षात पाच वेगवेगळ्या महाद्वीपांमधील पाच वेगवेगळ्या समुद्रात पोहण्याचा विक्रम केला होता आणि हा विक्रम करणारे ते पहिले भारतीय होते.

मिहीर सेन यांना प्रसिद्धी मिळाली ती १९५८ साली द इंग्लिश चॅनल [ खाडी ] त्यांनी पोहून पार केली होती.

२७ सप्टेंबर १९५८ साली १४ तास आणि ४५ मिनिटे इतका वेळ घेऊन त्यांनी ती इंग्लिश खाडी पोहून पार केली. भारतीय आणि पहिले आशियायी म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. १९६६ साली प्रत्येक महाद्विपातील महत्वाच्या खाड्या पोहून पार करणारे ते पहिले व्यक्ती बनले होते.

१६ नोव्हेम्बर १९३० रोजी त्यांचा पश्चिम बंगालमध्ये जन्म झाला. सुरवातीचा काळ त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे कठीण गेला. पुढे पदवी शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांची इच्छा होती कि इंग्लंडमध्ये जाऊन वकिलीचं शिक्षण घेण्याची. इंग्लंडमध्ये वकिलीचं शिक्षण घेत असताना त्यांच्या वाचनात आलं कि एका महिलेने इंग्लिश खाडी पोहून पार केली. ती माहिती वाचून मिहीर सेन इतके प्रभावी त झाले कि त्यांनी तेव्हाच निश्चय केला कि आपण सुद्धा हे करायला पाहिजे.

तिथून पुढे त्यांनी पोहण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यांच्या मार्गात येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करून त्यांनी पाच महाद्वीपांमधले समुद्र पार केले. सात समुद्र पोहून पार करायचे हा त्यांचा हेतू होता. हा हेतू राजनैतिक होता कारण जेव्हा ते युरोपात शिकत होते तेव्हा तिथले लोकं भारतीयांना कमी समजायचे. त्यांना युरोपला दाखवून द्यायचं होतं कि भारतीय कुठल्याही गोष्टीत कमी नाही.

ज्यावेळी मिहीर सेन यांनी द इंग्लिश चॅनल पोहून पार केली त्यावेळी त्यांच्या मुलीने सुप्रिया सेनने तिच्या वडिलांच्या भावना व्यक्त करताना सांगितले होते कि म्हणजे हे मनोगत मिहीर सेन यांचं होतं,

जेव्हा माझ्या पायाला जमीन लागली तेव्हा तो स्पर्श अगदीच वेगळा होता. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता, डोळ्यात पाणी आलेलं होतं. कारण मला माहिती होतं कि दीर्घकाळ पाण्यात राहिल्यानंतर जमिनीचं महत्व किती असतं. पृथ्वी माता हि माझ्या आईसारखी आहे, तिच्या कुशीत सुरक्षेची भावना आहे.

हा विक्रम नोंदवून भारतात परतल्यानंतर त्यांनी भारत सरकारला अनेक विनंत्या केल्या आणी योजना सुरु केल्या कि जलतरणपटू आणि तरणतलावांना प्राधान्य द्या. जागतिक पातळीवर भारतीय तरुण देशाचं नाव नक्कीच मोठं करतील याची त्यांना खात्री होती. त्यांना खासकरून युरोपला दाखवून द्यायचं होतं कि भारत सुद्धा सक्षम आहे. हे करण्यासाठी फक्त पोहणे आणि जिंकणे गरजेचं आहे हे त्यांना माहिती होतं.

मिहीर सेन यांनी पुढचा कारनामा केला तो श्रीलंकेच्या तलाईमन्नारपासून ते भारताच्या धनुष्यकोटीपर्यंत २५ तास आणि ४४ मितीने ते पोहत होते. २४ ऑगस्ट १९६६ साली ८ तास त्यांनी पोहून मोरोक्को आणि स्पेनला जोडणारी डार-ई- डेनियल खाडी पार केली होती.

सात समुद्र पार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट त्यांनी अशा प्रकारे एक एक करून पूर्ण केले. असा विक्रम करणारे ते पहिलेच व्यक्ती होते. एकूण पोहण्याच्या कारकिर्दीत त्यांनी ६०० किमी अंतर पोहून पार केलं होतं. १९५९ साली त्यांना पोहण्याच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पदमश्री पुरस्कार देण्यात आला आणि १९६७ साली पदमभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. 

वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. जागतिक पातळीवर विश्वविक्रम करणारा हा भारताचा महान खेळाडू दुर्लक्षतीच राहिला. अगदी शाळेच्या पाठयपुस्तकात त्यांचं साधं नावही नाहीये. भारताच्या नावाचा झेंडा जगभरात जगभरात दुमदुमावा अशी इच्छा बाळगणारे मिहीर सेन महान आणि पट्टीचे पोहणारे होते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.