५५ कोटींचं हेलिकॉप्टर खरेदी केलं म्हणून पृथ्वीराज चव्हाणांवर टीका झाली होती पण…

२०१७ सालात एक घटना घडली होती. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्री निलंग्याहून मुंबईला येताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता, आणि त्यातून ते सुखरूप बचावले होते. त्यांचं ते चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली होती. दुसरं एखाद हेलिकॉप्टर असत तर मुख्यमंत्र्यांचा जीव वाचणं कठीण होतं.

मुख्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपघात झालेले हेलिकॉप्टर एकेकाळी त्याच्या किंमतीवरून टीकेचा भाग झालं होतं. ही टीका झाली होती पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका ही झाली होती.

या बाबतचा किस्सा स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांच्या अपघातानंतर सांगितलं होता. 

तर मे २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार खूप जोरात चालू होता. या प्रचारकाळात अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गुजरात आणि दादरा-नगर हवेलीचे प्रभारी म्हणून पृथ्वीराज यांचा दौरा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर नियोजित होता. त्या दौऱ्याच्या एका टप्प्यात सिल्वासा येथे नियोजित कार्यक्रम होता.

यावेळी सोनिया गांधी या एका हेलिकॉप्टर मध्ये होत्या. तर मागच्या हेलिकॉप्टर मध्ये पृथ्वीराज चव्हाण, अहमद पटेल, शैलजा, आणि विशेष सुरक्षा पथकाचा (एसपीजी) अधिकारी असे चौघे हेलिकॉप्टरमध्ये होते. हेलिकॉप्टर हवेत असतानाच त्याच्यात काहीतरी बिघाड निर्माण झाला. वैमानिकाच्या ही गोष्ट लक्षात आल्या आल्या त्याने हेलिकॉप्टर हळूहळू मैदानाजवळ उतरविण्याचा प्रयत्न केला.

हे हेलिकॉप्टर उतरविण्याच्या नादात हेलिकॉप्टरची शेपटी जोरात आपटली आणि तुटली. अशातच दरवाजा उघडला गेल्याने हेलिकॉप्टरमधून पृथ्वीराज चव्हाण बाहेर फेकले गेले. तेव्हा त्यांच्या डोक्याला खोक पडली. सोनिया गांधी यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पुढं उपचाराचा भाग म्हणून त्यांच्या डोक्याच्या जखमेला टाके घालण्यात आले.

हेलिकॉप्टर हवेत आणखी उंचावर असते तर अपघातातून बचावणे कठीणच होते. पण सुदैवाने तेव्हा चव्हाणांच नशीब जोरावर होत म्हणायचं ते अपघातातून बचावले.

त्यानंतर पुढे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी राज्यात एखाद चांगल्या दर्जाचं हेलिकॉप्टर असावं म्हणून ही खरेदी केली होती. ते हेलिकॉप्टर होत सिरकॉस्की. व्हीटी या प्रकारातल हे हेलिकॉप्टर जगभरातील व्हीव्हीआयपींना लोकांसाठी वापरण्यात येत. आपल्या देशात उपलब्ध असलेल्या हेलिकॉप्टरपैकी हे सर्वोत्कृष्ट आहे. या हेलिकॉप्टरने एकावेळी अडीच तासांचा म्हणजे साधारणपणे ८०० किलोमीटरचा प्रवास करता येतो. दोन पायलट आणि पाच प्रवासी वाहून नेण्याची या हेलिकॉप्टरची क्षमता आहे.

पण जेव्हा फडणवीसांचा अपघात झाला तेव्हा हे हेलिकॉप्टर जेमतेम तीन ते चार वर्ष जुनं होत. मग अपघात का घडला होता ? तर त्याला कारण होत हवेचा प्रक्षोभ. हवेच्या प्रक्षोभामुळे (एअर टब्र्युलन्स) मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर खाली उतरवले गेल्याचे सांगण्यात आले होते. 

हवेचे प्रक्षोभ ही वातावरणातील सामान्य घटना आहे. विमान किंवा हेलिकॉप्टर हे स्थिर हवेवर तरंगत जात असते. मात्र तापमान तसेच वेगवेगळ्या दिशांनी येत असलेल्या वाऱ्यांमुळे हवेत समुद्राच्या लाटांप्रमाणे स्थिती निर्माण होते व त्यामुळे विमानाला हादरे बसून ते वर-खाली किंवा एका बाजूला कलंडू शकते.

त्यामुळे स्वतःच्या अपघाताच्या घटनेवरून अंदाज बांधून, पुढं कोणत्याही मुख्यमंत्र्याला अशा अपघाताला सामोरं जावं लागू नये म्हणून पृथ्वीराज चव्हाणांनी केलेली ही खरेदी त्यांच्या दूरदृष्टीच प्रतीक होत.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.