एकेकाळी टीम राहुल गांधी म्हणून मिरवणाऱ्या तरुण तुर्कांचं सध्या काय चालू आहे?
काल देशभरात बेरोजगारी आणि महागाईविरोधात काँग्रेस चांगलीच झालेली दिसून आली. दिल्लीत झालेल्या आंदोलनात काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता.
याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधीं, प्रियांका गांधी यांनी या आंदोलनाला आक्रमकतेचं स्वरूप आणलं. मात्र कलम १४४ लागू असल्यानं पोलिसांनी त्यांना तिथून जाण्याची विनंती केली मात्र तेंव्हा प्रियांका गांधी यांचा एक फोटो देखील बराच व्हायरल झालेला. पक्षाच्या अनेक नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
ही आक्रमकता आणि सक्रियता आता काँग्रेस पक्षासाठी गरजेची आहे. असं असलं तरी हे ही लक्षात घेणं गरजेचं आहे कि, सत्ताधारी पक्षाला तोंड देण्यासाठी काँग्रेस पक्षाला तरुण नेत्यांची, आक्रमक नेतृत्वाची गरज लागणार आहे. काँग्रेसमध्ये असणारी नेत्यांची ‘तरुण फळी’ कुठेय असा प्रश्न निर्माण होतो.
आणि साहजिकच ‘टीम राहुल गांधी’ आज कुठेय याचाही प्रश्न पडतो.
काँग्रेसला गेल्या काही काळात लागलेला पक्षांतराचा शाप आणि त्याचे परिणाम आपण बघितले. त्यात गतवर्षीच कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी पक्षाची साथ सोडत भाजपची वाट धरली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.
खरं तर, या आधीही २०१९ च्या निवडणुकात जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. पण प्रियंका गांधींनी त्यांची मनधरणी केल्यानं त्यावेळी ते प्रकरण शांत झालं. मात्र आता प्रसाद यांनी जास्तचं मनावर घेतलं आणि अखेर कॉंग्रेसचा हात सोडला. दरम्यान, ही काय पहिली वेळ नाही जेव्हा कॉंग्रेसच्या एखाद्या नेत्याने पक्ष सोडलाय. राहुल गांधींच्या ‘यंग तुर्क’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बऱ्याच कॉंग्रेस नेत्यांनी पक्षातून बाहेर पडत आपली वेगळी वाट धरली.
टीम राहुल गांधी पहिल्यांदा प्रकाशझोतात आली ते यूपीए-२ मध्ये
२०११-१२ मध्ये यूपीए-२ सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपात सापडलं होत. अशा परिस्थितीत राहुल गांधींच्या सांगण्यावरून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अनेक तरुण चेहऱ्यांना महत्त्वाची पदे दिली. यात जितिन प्रसाद यांना संरक्षण मंत्रालयात राज्यमंत्री पद, ज्योतिरादित्य सिंधिया यांना ऊर्जा मंत्रालयात स्वतंत्र प्रभारी राज्यमंत्री, महाराष्ट्रातले खासदार मिलिंद देवरा यांना आयटी मंत्रालयातलं राज्यमंत्री पद तर सचिन पायलट यांना कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयात स्वतंत्र प्रभारी राज्यमंत्रीपद देण्यात आलं.
त्यावेळी राहुल गाधींच नाही तर पक्षानेही त्यांच्यावर विश्वास दाखवला. या सगळ्यांना कॉंग्रेसच्या आगामी पिढीचे नेते मानलं जायचं. मात्र याच नेत्यांनी २०२१ पर्यंत पक्षाची साथ सोडली.
जितीन प्रसाद
जितीन उत्तर प्रदेशात ब्राह्मण चेहरा मानला जातात. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला असला तरी २०१९ पासूनच त्यांनी पक्षात नाखूष असल्याचे संकेत दिले होते. अनेक ठिकाणी ते पंतप्रधान मोदी आणि भाजपचे कौतुक करताना दिसले. कॉंग्रेसमधल्या त्यांच्या नाखुशीमागे अनेक कारण आहेत. जसे कि, त्यांना वर्किंग कमेटीत कोणतच पद देण्यात नाही आलं, युपी कॉंग्रेसमध्येही त्यांना बाजूला ठेवण्यात आलं.
एकेकाळी उत्तर प्रदेश कांग्रेस पक्षाच्या अध्यक्षांच्या शर्यतीत त्याचं नाव होत. पण प्रियांका गांधी युपीत सक्रीय झाल्याने जितीन प्रसाद यांच्या हातातून ही संधी सुद्धा गेली.
या सगळ्या गोंधळानंतरचं त्यांची पक्ष सोडण्याची चिन्ह दिसू लागली. २०१९,मध्ये झालेल्या कॉंग्रेस वर्किंग कमेटीच्या बैठकीत त्यांनी कलम ३७० वर पक्षाचा विरोध जनभावनेच्या विरुद्ध म्हंटले. त्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्येच त्यांनी मोदींच्या वाढत्या लोकसंख्येच्या चिंतेत सुरात सूर मिसळला.
पक्ष सोडताना जितीन प्रसाद म्हणाले,
मी कॉंग्रेसच्या तीन पिढ्यांपासून कॉंग्रेसच्या सोबत आहे. पण आता हा महत्वाचा निर्णय मी खूप विचार करून घेतलाय. मी कोणता पक्ष सोडतोय यापेक्षा कोणत्या पक्षात जातोय आणि का जातोय, हा महत्वाचा प्रश्न आहे. मला काही वर्षांपासून जाणवले की, देशात खर्या अर्थाने एकच संस्थागत राजकीय पक्ष आहे, तो म्हणजे भाजप. बाकीचे पक्ष विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित राहिलेत. मी ज्या पक्षात होतो तिथे माझ्या देशाची आणि लोकांची सेवा करण्या योग्य मला वाटत नव्हते. मी माझ्या कॉंग्रेसच्या सहकार्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला इतके दिवस समर्थन दिले.
ज्योतिरादित्य शिंदे
कॉंग्रेसमधल्या ज्या युवा नेत्यांनी पक्ष सोडला त्यातला महत्वाचा चेहरा होता ज्योतिरादित्य शिंदे. ते एकेकाळी राहुल गांधींचे सर्वात जवळचे मानले जायचे. मध्याप्रदेशात २०१८ मध्ये जेव्हा कॉंग्रेस विधानसभा निवडणुका जिंकलं. तेव्हा शिंदेना वाटल होत कि, त्यांना मुख्यमंत्री बनवलं जाईल, मात्र राहुल गांधीनी कमलनाथ यांची निवड केल्याने ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचे समर्थक नाराज झाले. त्याचाच राग म्हणून शिंदे यांनी कमलनाथ यांच्या अनेक निर्णयांचा उघडपणे विरोध केला. त्यानंतर जवळपास १५ महिन्यांनी शिंदे गटाच्या आमदारांनी १० मार्च २०२० ला नाटकीय पद्धतीत राजीनामा दिला. ज्यामुळे कमलनाथ सरकार पडल.
पक्ष सोडताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोनिया गांधीना आपला राजीनामा दिला, ज्यात त्यांनी लिहील कि, त्यांचं उद्देश देश आणि त्यांच्या राज्यांची सेवा करण होत. आणि कॉंग्रेसमध्ये राहून ते हे करू शकत नाहीत. ‘ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपात प्रवेश करताना त्यांनी म्हंटल होत की ,
कॉंग्रेसची आजची परिस्थिती पाहता कॉंग्रेस पक्ष पहिल्यासारखा राहिलेला नाही. त्यामुळे तिथं राहून जनतेची सेवा करण्याच उधिष्ठ पूर्ण होत नाहीये. कॉंग्रेस पक्ष वास्तविकता नाकारतय. नवीन नेतृत्व आणि विचारांना ते नाकातेय. २०१८ मध्ये आम्ही एक स्वप्न घेऊन आलो, परंतु ती स्वप्ने पूर्ण झाली नाहीत. मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. कॉंग्रेसमध्ये राहून लोकसेवा करता येणार नाही.
सचिन पायलट
वर्षभरापूर्वीच राजस्थानात सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या विरोधात बंड पुकारला होता. आपला फोन टॅप झाल्याचा आरोप करत ते आपल्या समर्थकांसोबत हरियाणाच्या गुरूग्राममधल्या एका हॉटेलात गेले. त्यानंतर कॉंग्रेसच्या हाय कमांडने हे प्रकरण दाबण्यासाठी अजय माकन यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची कमिटी बनवली. पण अजूनही हे प्रकरण शांत होण्याच नाव घेत नाहीये.
सचिन पायलट दुसऱ्या युवा नेत्यांसारख पक्ष किवा दुसऱ्या नेत्यांबाबत बोलत नसले तरी ते राजस्थान सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करतात. आणि बाकी नेत्यांसारख पक्षातल आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतात.
नुकताच जितिन प्रसाद यांनी कॉंग्रेस पक्ष सोडल्याच्या एक दिवस आधीचं सचिन पायलट यांनी राजस्थानातून पक्षाच्या हाय कमांडवर निशाणा साधला होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले,
राजस्थानात अडचणी सोडविण्यात समिती पूर्णपणे अपयशी ठरलीये. आता १० महिने झालेत. मला सांगितल होत की, समिती लगेच कारवाई करेल, पण आता सरकारचा निम्मा कार्यकाळ संपलाय. आणि प्रश्न अजूनपन तसेच आहेत. दुर्दैव म्हणजे, पक्षातल्या महत्वाच्या कार्यकर्त्यांचचं म्हणण ऐकले जात नाहीये.
दीपेंद्र हुड्डा
दीपेंद्र सिंह हुड्डा हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांचे पुत्र. जे बऱ्याच वर्षापासून पक्षात साईड लाईन आहेत. कांग्रेस वर्किंग कमेटीत सदस्य असण्याशिवाय त्यांना म्हत्वाच असं कोणत पद देण्यात आलेलं नाही. त्याशिवाय हरियाणात सुद्धा त्यांना काही मोठी जबाबदारी दिली गेली नाही. २०१९ मध्ये दीपेंद्र सुद्धा पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. भूपिंदर हुड्डा यांनी आपल्या मुलाला पक्षाच्या अध्यक्ष बनवण्याची मागणी केली होती. पण पक्षान शैलजा कुमारी यांना अध्यक्षपद दिल.
यानंतर दीपेंद्र हुड्डा यांनी मोदी सरकारच्या कलम ३७० हटविण्याच्या निर्णयावर पक्षाच्या विरुद्ध जाऊन आपलं म्हणण मांडल. या निर्णयाच कौतुक करताना ते म्हणाले –
मी नेहमीच कलम ३७० रद्द करण्याच्या बाजूने होतो. २१ व्या शतकात याला काहीच महत्व नाहीये. देशाच्या आणि जम्मू – काश्मीर जनतेच्या हितासाठी हे कलम रद्द करण योग्य आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. दरम्यान, विश्वासार्ह वातावरणात या बदलाची शांततेत अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सध्याच्या सरकारवर आहे.
मिलिंद देवरा
कांग्रेसी नेता मुरली देवरा यांचा मुलगा मिलिंद देवरा एकेकाळी राहुल गांधीच्या कोर टीमचा सदस्य मानला जायचा. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी देवरा यांना मुंबई रीजनल कांग्रेस कमेटीचं अध्यक्ष बनवलं गेल होत. यानंतर पक्षाचा जोरदार प्रभाव झाला आणि मिलिंद यांनी पक्षाचा राजीनामा दिला.
पार्टी लाईनच्या विरोधात जाऊन मोदी सरकारच्या कमल ३७० चं कौतुक करणाऱ्या नेत्यांमध्ये त्याचं नाव येत. जीतिन प्रसाद यांच्या पक्षांतरानंतर मिलिंद देवरा याचं ट्वीट पक्षाबद्दल त्यांचे विचार स्पष्ट करत. ज्यात त्यांनी लिहील –
माझ्यामते, देशव्यापी पक्ष म्हणून कॉंग्रेस नक्कीच आपलं खर लक्ष गाठेल. आमच्याकडे अजूनही मजबूत बेंच स्ट्रेंथ आहे. जर त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला गेला तर चांगले परिणाम मिळू शकतात. माझ फक्त एवढ म्हणण होत कि, माझे बरेच मित्र, सहकार्यांनी आम्हाला सोडायला नको होत .
प्रियंका चतुर्वेदी
२०१९ मध्ये प्रियांका चतुर्वेदी यांनीही अचानक कॉंग्रेसची साथ सोडत शिवधनुष्य हातात घेतलं होत. असं म्हंटल जात कि, २०१९ च्या निवडणुकीत मुंबई उत्तरमधून तिकीट न मिळाल्यान त्या नाराज होत्या. ज्यामुळे त्यांनी पक्ष सोडला. पक्ष सोडताना त्या म्हणाल्या कि,
‘मला आशा होती की, पक्ष (कॉंग्रेस) मला पुढच्या स्तरावर नेईल, पण तसे काही झाले नाही.’
सध्या प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेत असून त्या राज्यसभेच्या खासदार आहेत.
हे ही वाच भिडू.
- वडील काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींशी लढलेले, मुलगा त्याच कारणावरून भाजपमध्ये गेला.
- या निवडणुकीने दाखवून दिलं भविष्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे असू शकतात.
- राजेश पायलट देखील काँग्रेसवर नाराज होते पण पक्ष कधी सोडला नाही..