एक बॉस असा आहे जो कर्मचाऱ्यांनाच नाही तर त्यांच्या पत्नींना देखील पगार देतोय

एक असा बॉस आहे जो कर्मचाऱ्यांनाच नाही तर त्यांच्या पत्नींना देखील पगार देतोय….कदाचित अशी बातमी तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असणार ना ? असंही वाटत असणार असा बॉस प्रत्येकाला मिळो…

विनोदाचा भाग वेगळा पण आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींनाही पगार देण्याच्या प्रकारचा उपक्रम प्रथमच ऐकला जातोय ना?  बरं हा उपक्रम ऐकून तुम्हांला हसायला आलं असेल ना? पण हे खरंय.

युएईच्या शारजाह येथे राहणारे भारतीय बिझनेसमॅन डॉ.सोहन रॉय यांनी त्यांच्या एयरिज ग्रुप ऑफ  कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींना नियमित पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात रॉय आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बांधिलकीमुळे इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी उपयोगाची गोष्ट बक्षीस म्हणून देण्याचा विचार करू लागले. असं काय बक्षीस ज्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आधार मिळेल म्हणून त्यांना हि कल्पना सुचली.

सोहन रॉय संयुक्त अरब अमिरातीमधील बेस्ट बिझनेसमॅन पैकी एक आहेत.

मागे एकदा खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार अशी माहिती समोर आली होती कि, कंपनीने हा निर्णय अमलात आणण्यासाठी सुरुवातीला व्यवस्थापन करायचं ठरवलं. प्रॉपर तयारीला लागले, त्यांनी प्रथम आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा डेटाबेस तयार केला.

तो सबंधित कर्मचारी कंपनीत किती जुना आहे, त्याचा अनुभव किती या अनुषंगाने त्यांच्या पत्नींना किती पगार दिला जाईल हे ठरवलं.

रॉय हे मुळचे भारतातील केरळचे असून ते एरिज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते या कल्पनेबाबत म्हणतात की, वर्ष २०२० जेव्हा कंपनीने बऱ्याच मोठ्या  आव्हानात्मक आणि अनिश्चित काळाला सामोरे जावे लागले होते. साथीच्या काळात, कंपनीने आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले नाही किंवा कमी केले नाही. कारण कर्मचाऱ्यांनी या कठीण काळात देखील कंपनीला साथ दिली आहे.

त्यांच्या मेहनतीला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेला पाठिंब्याची जाणीव ठेवत त्यांना त्याची परतफेड म्हणून हा निर्णय घेतला हे.

रॉय यांना गृहिणींना पैसे देण्याची कल्पना कशी सुचली?

२०१२ मध्ये, तत्कालीन बाल आणि महिला विकास मंत्री कृष्णा तीरथ यांनी एक प्रस्ताव दिला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की गृहिणींना सामाजिकदृष्ट्या अधिक सशक्त ओळख दिली पाहिजे. त्यांचं स्थान वेळोवेळी बळकट केलं पाहिजे. गृहिणी आहेत म्हणून स्त्रियांच्या कामाची दखल घेतली जात नाही. ना त्यांना त्यांच्या कामाचा आर्थिक मोबदला मिळतो.

मागे सुप्रीम कोर्टाने एका केसचा निर्णय देतांना असं स्पष्ट केलं कि,  घरकाम करणाऱ्या बायका त्यांच्या काम करणाऱ्या पतींपेक्षा कमी महत्त्वाच्या नसतात.

न्यायालयाच्या वक्तव्यापासून रॉय यांनी धडा घेतला आणि त्याची प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. या साथीच्या काळात कर्मचारी आणि त्यांच्या पत्नींचे योगदानाची परतफेड करण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग असू शकत नव्हता.

Aries Group Of Companies ही UAE मध्ये एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. मध्यपूर्वेतील १६ देशांमध्ये त्याच्या ५६ कंपन्या आहेत. याची स्थापना १९९८ मध्ये केरळमधील बिझनेस मॅन सोहन रॉय यांनी केली होती. फोर्ब्स मिडल ईस्टने २०१७ मध्ये त्याला मध्य पूर्वच्या प्रमुख प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट केले आहे.

याशिवाय रॉय यांची कंपनी आणखी एक योजना चालवते.

सध्या, एरिझ ग्रुप आपल्या कर्मचाऱ्यांच्या ज्यांनी सेवेची तीन वर्षे पूर्ण केली आहेत त्यांच्या पालकांना पेन्शन देत आहे . तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. रॉय कॉर्पोरेट जगतात हळूहळू बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे इतर कॉर्पोरेट कंपन्यांनी रॉय यांच्याकडून अशा निर्णयांची प्रेरणा नक्कीच घेतली पाहिजे.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.