अमेरिकेच्या टेनिसपटूने एक ट्वीट काय केलं अन सोशल मिडियावर बाजार उठलाय.

टेनिस लीजेंड मार्टिना नवरातिलोवा. अमेरिकेची प्रसिद्ध टेनिस खेळाडू. ती तिच्या खेळाच्या कामगिरीमुळे तसेच तिच्या रोखठोक भुमिकेमुळे नेहेमीच चर्चेत असते. कालच तिने एक ट्विट काय केलं आणि इथं भारतात नुसता बाजार उठलाय.

१० ऑक्टोबर रोजी त्यांनी एक ट्विट केले. पण तिचे हे ट्विट तिच्या क्षेत्राशी निगडीत नव्हते तर भारतामधील चालू असणाऱ्या राजकारणावर टिप्पणी करणारी होते. तिने तिच्या या ट्वीटमध्ये भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या एका वक्तव्याची थट्टा उडवली आहे. त्यामुळे तिचे हे ट्विट व्हायरल झालेय.

काय आहे ते ट्वीट ?

संपूर्ण प्रकरण काय आहे ?

प्रसिद्ध टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवाने नेहेमीच आपल्या ट्विटमधून भारताच्या परिस्थितीवर भाष्य करत असते. त्यात या वेळेस तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. त्याचं निमित्त म्हणजे,  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुलाखत रविवारी १० ऑक्टोबर रोजी संसद टीव्हीवर प्रसारित झाली होती, या मुलाखतीत ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे हुकूमशहा नाहीत, तर त्यांच्यासारखा लोकशाही नेता आजपर्यंत भारतात कधीच घडला नाही. मोदी प्रत्येकाचा सल्ला घेतल्यानंतर प्रत्येक महत्त्वाचा निर्णय घेतात.

अमित शहा यांच्या या मुलाखतीचा अहवाल हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रानेही प्रसिद्ध केला होता. त्याचाच हवाला घेत टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, And for my next joke…आणि पुढे हसण्याच्या इमोजी देखील टाकल्या आहेत.  हे ट्विट व्हायरल झाले आणि आत्तापर्यंत या ट्विटला साडे सात हजार लोकांनी रिट्विट केले आहे.

आणि मग काय मार्टिना ट्रेंड मध्ये आली कुणी तिला समर्थन देत होतं तर कुणी विरोध करत ट्रोल करत होतं.

एक युजर ने तिला “अमेरिका आणि भारतातील उजव्या विंग” मध्ये काही “फरक किंवा समानता” सापडते का असा प्रश्न केला. तर संकेत पाठक नावाच्या युजरने नवरातिलोवाचे हे ट्विट तिने फॉलोअर्स वाढवण्यासाठी केलेय असं म्हणलं आहे.

तर एकाने म्हणलंय कि, हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे,

तर पत्रकार उझैर रिझवी यांनी लिहिले की, आता राईट विंग मार्टिनावर हल्ला करणार आहे. ती आता परदेशी सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाली आहे ज्यांना भारतातील राईट विंगकडून ट्रोल केले जाते. त्यांना यातून काय आनंद मिळतो तो मुद्दा राहिलाच. तर रिझवी यांच्या ट्विट ला  मार्टिनाने उत्तर दिले कि,  भारतातील राईटविंगच्या ट्रोल्ससारखेच ट्रोलर्स अमेरिकेत देखील आहेत. मला वाटते की ते सर्व एकाच शाळेत जातात. काळजी करण्यासारखे काहीच नाही.”

बरं मार्टिनाने मोदींना काय पहिल्यांदाच टार्गेट केले नाहीये..

मार्टिना नवरातिलोवाने यापूर्वीही पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या धोरणांना विरोध केला आहे. तिने २०१९  मध्ये पहिल्यांदा ट्वीट केलं होतं ते म्हणजे सीएए कायद्याबद्दल, तेंव्हा तिने मोदी आणि ट्रम्प कदाचित एकाच शाळेतील जात असतील कारण त्यांची  विचारसरणीतून देखील सारखीच आहे असंही तिने म्हणलं होतं.

मार्टिना केवळ भारतावरच नाही तर अंतराष्ट्रीय राजकारणावर कायमच भाष्य करत असते.  रिपब्लिकन पक्ष आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांच्या विरोधात तिने उघडपणे ट्विट केले. त्यांनी सप्टेंबरमध्ये लिहिले, ट्रम्प यांना उघडपणे सैतान असा शब्द देखील वापरला होता. तसेच तिने  अफगाणिस्तानातून अमेरिकेने आपले सैन्य मागे घेतल्याच्या निर्णयाला  विरोध केला होता.

मार्टिनाने आपल्या कारकिर्दीत १८  ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

तिने समलिंगी हक्कांच्या समर्थनार्थ  अनेकद आवाज उठवला आहेत तसेच ती कायमच लोकशाही मूल्यांचे समर्थन करत असते. सतत सामाजिक मोहिमांशी जोडलेली असते.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.