पुण्याच्या नगरसेविकेने चक्क यशवंतराव चव्हाण यांना चपलेचा हार घातला होता..

भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतरचा एक लढा देखील इतिहासातील महत्वाचा लढा राहिलेला आहे. तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ! सलग कितीतरी वर्ष मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हवाय म्हणून या मागणीसाठी मराठी भाषकांना तीव्र स्वरुपाचे लढे उभारावे लागले. सत्याग्रह हे या लढ्याचे मुख्य अस्त्र होते, जात-धर्म-पक्ष-विचारसरणी आदी भेद बाजूला सारून सारा महाराष्ट्र अस्तित्वासाठी एकटवला होता.

पण काही राजकीय नेते मात्र या चळवळीच्या बाबतीत काहीसे वेगळ्या मताचे होते. पण त्यांच्या भुमिकेमुळे त्यांना महाराष्ट्राच्या जनतेचा रोष सहन करावा लागला होता. त्यालेच एक म्हणजे यशवंतराव चव्हाण !

त्यांनी नेहरू आणि महाराष्ट्र या दोन्ही पर्यायामधून काय निवडायचे अशी वेळ आल्यास मी नेहरूंना निवडेल, कारण महाराष्ट्र नेहरूंपेक्षा मोठा नाही असं जाहीरपणे म्हणाले होते.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. येथे बहुसंख्य जनता मराठी असतानाही मुंबईचे स्वतंत्र राज्य व्हावे, असा निर्णय तेव्हा पं. नेहरूंनी नेमण्यात आलेल्या फाजलअली, कुंझरू आणि पणीकर समितीने घेतला.

या अन्यायाविरोधात मराठी जनता पेटून उठली आणि मुंबई, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, तसेच सौरुरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणा करून संयुक्त महाराष्ट्र समितीची घोषणा केली. जनतेचा हा उठाव दडपून टाकण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दंडशक्तीचा वापर केल्याने व मुंबईतील गोळीबारात १०५ जण हुतात्मा झाले होते.

पण निर्माण झालेली परिस्थिती पाहता , मराठी जनतेचा लढा गुजरातच्या जनतेच्या विरुद्ध नाही, हे लक्षात घेऊन संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईचे स्वतंत्र राज्य करण्याची भूमिका सोडायला हवी, अशीहि मागणी होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एस. एम. जोशी, भाई डांगे, आचार्य अत्रे आणि मराठवाड्याचे उत्तमराव पाटील यांनी नेतृत्व केले होते.

१९५७च्या विधानसभा निवडणुकीत पश्चितम महाराष्ट्रात काँग्रेसचा संपूर्ण पराभव झाला आणि जनतेने  संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने कौला दिला. हे झाले परिणाम मात्र याच दरम्यान एक घटना घडली होती. अत्यंत वाईट आणि खेदजनक.

ती अशी कि, पुण्याच्या नगरसेविकेने चक्क यशवंतराव चव्हाण यांना चपलेचा हार घातला होता. 

त्याचं झालं असं कि, आचार्य अत्रे नेहेमीच यशवंतरावांच्या विरोधात उघडउघड बोलत असत.  फलटणला आचार्य अत्रे नेहेमीच जात असत, तिथे त्यांचा बराच मित्रांचा गोतावळा होता.  त्या ठिकाणी जाऊन अत्रे विध्यार्थ्यांना गोष्टी सांगत, गावात सभा घेत असायचे. दत्तोपंत देशपांडे नावाचे त्यांचे एक वार्ताहर होते, त्यांचे खरे नावं वेगळे होते पण त्यांच्यावर कसले संकटं नको म्हणून अत्रे त्यांना दत्तोपंत म्हणत असत.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दत्तो पंतांनी अत्रे यांना अनेक गुप्त बातम्या पुरवल्या होत्या. कारण फलटणचे मालोजीराजे आणि मोराराजी देसाई यांची मैत्री चांगली होती.

यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, गणपतराव तपासे, शंकरराव देव, स. का. पाटील, मामा देवगिरीकर, मोराराजी देसाई, हे सात ग्रह आणि मालोजीराजे अर्धवट म्हणून ही सर्व महाराष्ट्राची साडेसाती आहे असं जाहीरपणे अत्रे म्हणत. कारण ही सर्व मंडळी संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधी होती.

संयुक्त महाराष्ट्र आणि पंतप्रधान पंडित नेहरू यामध्ये निवड करायची झाल्यास मी डोळे झाकून नेहरूंच्या बाजूने उभा राहीन. नेहरू महाराष्ट्रपेक्षा मोठे आहेत असं जेंव्हा यशवंतराव म्हणाले होते तेंव्हा मोठाच वाद निर्माण झाला होता.

त्यांना इतका विरोध झाला कि,  शिवाजी आखाड्यात भिमाबाई दांगट यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या गळ्यात चपलेची माळ घातली होती. या भिमाबाई दांगट या त्याच महिला आहेत ज्यांनी पुण्यातील मंडईत एक पोवाड्याच्या कार्यक्रमात जमलेल्या लोकांनी शाहिरांच्या अंगावर पैशाचा पाऊस पाडला. त्यावेळच्या नगरसेविका भीमाबाई दांगट यांनी त्यांच्या अंगावरील सर्व दागिने काढून चळवळीसाठी दिले.

त्यानंतर आचार्य अत्रे यांनी “जिथे जिथे हिरे- चव्हाण तिथे तिथे काळे निशाण ” अशा घोषणा द्यायला सुरुवात झाली. आचार्य अत्रे यांनी सूर्याजी पिसाळ म्हणून यशवंतरावांची गणना केली.

शिवाजी महाराजांच्या काळात त्यांना विरोध करणारे जसे अस्तिनीतील निखारे होते. तसेच संयुक्त महाराष्ट्राचा लढ्यामधील अस्तिनीतील निखारे हे सूर्याजी पिसाळ आहेत तसेच महाराष्ट्राच्या विरोधात  सूर्याजी पिसाळ म्हणजे यशवंतराव आहेत असं म्हणलं होतं.

संदर्भ- आचार्य अत्रे बारा गावचे पाणी लेखक बाबुराव कानडे 
Leave A Reply

Your email address will not be published.