ड्रग्ज विरोधात जनजागृतीसाठी 81 वर्षाच्या आजोबांनी 5 लाख किमीचं अंतर चालून पूर्ण केलंय.

म्हातारपण हे दुसरं बालपण असतं असं म्हणतात. म्हातारपणात लोकांची इच्छा असते की चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करावं, खावं, प्यावं निवांत झोपावं आणि शांततेत म्हातारपण घालवावं. पण भारतातील एक 81 वर्षाचे बगीचा सिंग आहेत जे मागील 23 वर्षांपासून अविरतपणे चालत आहेत. ते काय फक्त सोसायटी समोरच्या गार्डनला चक्कर मारून येत नाहीए तर आजवर त्यानी 5 लाखांहून अधिक अंतर चालत कापून पूर्ण केलं आहे तेही काय स्वतःच्या वैयक्तिक आरोग्यासाठी नव्हे तर भारताच्या युवा पिढी साठी. तर जाणून घेऊया या बगीचा सिंग यांचा हा थरारक प्रवास.

बगीचा सिंग हे मूळचे पानिपतचे रहिवासी. बगीचा सिंग यांनी हा प्रवास 22 फेब्रुवारी 1993 रोजी जम्मू ते कन्याकुमारी असा ध्यानात ठेवून सुरू केला. त्यांची 12 वीची परीक्षा झाली आणि त्यांनी घरच्या लोकांना निक्षून सांगितलं की ते आता लग्न करणार नाहीए. कारण त्यांना स्वतःला देशसेवेसाठी वाहून घ्यायचं आहे.

पाठीवर तब्बल 90 किलोची बॅग आहे, ज्यामध्ये 18 फूट लांब दोन भारताचे झेंडे आहेत. गेल्या 23 वर्षांचा हा प्रवास अजूनही सुरूच आहे. आ चालण्यामागचा उद्देश काय आहे तर तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन, बालकामगार, भ्रष्टाचार आणि अशा इतर सामाजिक समस्यांविरुद्ध जनजागृती करणे.

पानिपतचे रहिवासी, बगीचा सिंह यांनी 22 फेब्रुवारी 1993 रोजी जम्मू ते कन्याकुमारी पर्यंतचा अविरत प्रवास सुरू केला. 12 वीच्या परीक्षेनंतर त्यांनी आपल्या पालकांना सांगितले की, ते कधीही लग्न करणार नाहीत कारण त्यांना आपले जीवन देशाला समर्पित करायचे आहे. त्याच्याकडे 90 किलो बॅकपॅक आहे, ज्यामध्ये 18 फूट लांब खांबावर दोन भारतीय झेंडे लहरत आहेत.

त्याच्या संपूर्ण प्रवासात, बगीचा सिंह राजकारणी आणि सेलिब्रिटींसह अनेक लोकांना भेटले. आणि त्याच्याकडे शेअर करण्यासाठी अनेक मनोरंजक कथा आहेत.

तेजपूरहून आसाममधील गुवाहाटीकडे जाताना, मला एक जंगल ओलांडावे लागले… जंगल पार करण्यासाठी मला डझनभर केळी घेऊन जावे लागते, कारण हत्तींचे कळप मला थांबवतात आणि त्यांना केळी दिल्याशिवाय ते मला जाऊ देत नाही. जेव्हा जेव्हा मी जंगलातून जातो तेव्हा तेव्हा मी सहा किलो केळी वाहून नेतो आणि हत्तीचे लाड करतो.

या प्रवासात बऱ्याच घटना बगीचा सिंग यांच्यासोबत घडल्या होत्या, त्यापैकी एक सांगताना ते म्हणतात मला नागा आदिवासींच्या एका गटाने घेरलं, त्यांनी माझी सर्व वस्तू माझ्याकडे सोपवण्याची मागणी केली… तेव्हाच हत्ती माझ्या मदतीला आले! त्यापैकी सर्वात मोठा ग्रुपच्या दिशेने धावला. ते लोक घाबरले आणि पळून गेले. मग हत्तीने माझी पिशवी त्याच्या सोंडेसह उचलली आणि संपूर्ण कळप माझ्याबरोबर चालला. एकदाचे आम्ही रस्त्यावर पोहोचलो, मला माझी बॅग देण्यात आली आणि कळप परत आत गेला.

बगीचा सिंग यांचं दैनंदिन रुटीन कसं आहे तर दररोज सकाळी 5:00 वाजता उठल्यानंतर, ते दुपारी 12:00 पर्यंत चालतात, एक तास विश्रांती घेतात आणि पुन्हा संध्याकाळी 7:00 पर्यंत चालतात. सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग सारखे स्वातंत्र्यसैनिक त्यांना चालण्याची प्रेरणा देतात, जे प्रत्येक प्रवासात नवीन मार्ग काढतात.

बगीचा सिंह यांना आशा आहे की देशातील तरुणांना हळूहळू तंबाखू आणि अल्कोहोलचे दुष्परिणाम समजतील. असा हा अवलिया एका वेगळ्या प्रकारे देशाची सेवा करतो आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.