रझिया ही दिल्लीवर राज्य करणारी पहिली आणि शेवटची महिला सुलतान होती

राज्यसत्ता, गादी, आणि लढाया हा सगळा पुरूषी खेळ असतो, असं चित्र आजही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत. पण इ.स. 12-13 च्या काळात तर पुरूषप्रधान संस्कृतीचं होती. जिला या सगळ्या गोष्टींवर हक्क होता.

पण या अनिष्ठ रुढींचा बिमोड झाला तो, रझियाच्या काळात. जिनं सत्ताही गाजवली आणि लढायासुद्धा.

आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात इल्तमश हा आपल्या वारसदाराच्या मुद्द्यावरून किंवा प्रश्नावरून बराच चिंतीत होता. आपल्या हयात असलेल्या मुलांपैकी कोणीही आपली गादी चालवण्यासाठी किंवा वारसदार होण्यासाठी लायक आहे असे न वाटल्यामुळे त्याने अंततः आपला वारसदार म्हणून आपली मुलगी रझिया हिची निवड केली.

त्याचवेळी आपल्या निवडीला आपल्या दरबारातील प्रभावी सरदार आणि धार्मिक क्षेत्रातील उलेमा मंडळींची संमती मिळविण्याचाही त्याने प्रयत्न केला. प्राचीन इजिप्तमध्ये महिलांनी राज्यकर्ता म्हणून काम पाहिले होते आणि राजपुत्र अल्पवयीन असताना त्याच्या वतीने राज्य प्रतिनिधी म्हणून देखील राज्यकारभार पाहिला होता.

राज्यकारभार पाहण्यासाठी मुला ऐवजी मुलीची निवड केली जाणे ही बाब निश्चितच अनोखी आणि नवीन होती.

अर्थात रझियाला आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी आपल्या भावाविरुद्ध आणि त्याचबरोबर शक्तिशाली तुर्की सरदारा विरुद्ध संघर्ष करावा लागला आणि म्हणूनच ती फक्त तीन वर्षे राज्य करू शकली.

मात्र भलेही तिची कारकीर्द अल्पकाळच टिकली असली तरी ती वैशिष्ट्यपूर्ण होती यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे राजेशाही आणि तुर्की सरदार यांच्यातील सत्तेसाठी सुरू असलेला संघर्ष!

या तुर्की सरदारांचा हा गट ‘चहलगानी’ किंवा ‘चालीसा’ या नावाने ओळखला जात होता. इल्तमशच्या हा या तुर्की सरदारांना खूपच आदराने वागवायचा. इल्तमशच्या मृत्यूनंतर सत्तेने धुंद सरदारांना सुलतान म्हणून आपल्या तालावर नाचणारा एक कळसूत्री बाहुलीसारखी राज्यकर्ता सत्तेवर आणावयाचा होता.

लवकरच त्यांच्या हे लक्षात आले की, जरी स्त्री असली तरी त्यांच्या मर्जीप्रमाणे वागणारी आणि त्यांना ठरवून दिलेल्या चालीप्रमाणे चालणारी राज्यकर्ती नाही. तिने स्त्रियांसारखे पोशाख घालणं सोडून दिलं. ती राजदरबारात पडदा न घेता हजर राहू लागले, इतकेच नव्हे तर ती शिकायला जायची आणि लष्करी मोहिमांमध्ये नेतृत्व करायची.

वजीर असलेल्या निझाम – उल – मुल्क जुनैदी याने तिच्या राज्यरोहणाला विरोध केला होता आणि तिच्या विरुद्ध तुर्की बंडखोर सरदारांनी केलेल्या बंडाला त्याने सक्रिय पाठिंबा दिला होता.

या वजीरा विरुद्ध तिने शस्त्र उचलले आणि त्याला पराभूत करून जीव वाचवण्यासाठी त्याला पलायन करण्यास भाग पाडले.

रझियाने राजपुतांना नियंत्रित करण्यासाठी रणथंबोर विरुद्ध सैन्य पाठवले होते आणि आपल्या राज्यात सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली होती. परंतु आपल्याशी व्यक्तिशः एकनिष्ठ असलेल्या सरदारांचा एक गट निर्माण करण्याचा तिने केलेला प्रयत्न आणि त्याच बरोबर याकुतखाने तुर्क नसलेल्या व्यक्तीला उच्च पदावर स्थानापन्न करण्याचा तिने घेतलेला निर्णय यामुळे तिला बराच विरोध सहन करावा लागला.

तुर्क अमिरांनी रझियावर स्त्रियांकडून ज्या मर्यादशील वागण्याची अपेक्षा केली जाते, त्या परंपरेशी विसंगत वर्तन केल्याबद्दल दोषारोप केला. याकुतखान अॅबिसिनियन सरदाराशी नको इतके घनिष्ट दाखविल्याचा आरोप तिच्यावर केला गेला.

तिच्याविरुद्धच्या उठावाची सुरुवात लाहोर आणि सरहिंद येथे झाली. रझियाने स्वतःच्या नेतृत्वाखाली सैन्य घेऊन लाहोर येथील सुभेदाराला शरणागती स्वीकारण्यास भाग पाडले. परंतु सिरहिंदला जात असताना तिच्या गटातच अंतर्गत बंद होऊन त्यात याकूतखान मारला गेला आणि रझियाला तबरहिंद अर्थात भटिंडा येथे कैद करण्यात आले.

दरम्यान, तिने युक्तीने आपल्याला कैद करणाऱ्या अल्तुनिया या सरदाराला आपल्या बाजूने वळवून घेतले आणि त्याच्याशी विवाह करून दिल्लीवर स्वारी केली. रझिया शर्थीने आणि बहादुरीने लढली. परंतु तिचा पराक्रम कामी आला नाही आणि येता अखेर ती पराभूत झाली. जीव वाचवण्यासाठी जंगलातून जात असताना सशस्त्र लुटारुंकडून ती मारली गेली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.