काश्मिरी पंडितांना भारतात कुणी खरी मदत केली असेल तर ती फक्त बाळासाहेब ठाकरेंनीच

१९ जानेवारी १९९० ची रात्र काश्मिरी पंडितांसाठी काळरात्र ठरली होती. काश्मीरच्या मुस्लिम कट्टरतावाद्यांनी बंदुकीच्या जोरावर मायनॉरिटी असलेल्या पंडितांना काश्मीर व्हॅली सोडून जाण्यास भाग पाडलं होतं. लाखो काश्मिरी पंडित ज्या ठिकाणी ते वर्षानुवर्षे राहिले, वाढले जिथं त्यांनी आपली मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जीवावर समाजात सन्मानाचं स्थान मिळवलं आज तिथूनच त्यांना हाकलून देण्यात येत होतं.

वडिलजाद्यांपासून कमावलेली घरदार, जमीन जुमला, दागदागिने सगळं काही आहे तिथे सोडून नुसत्या कपड्या लत्त्यांवर त्यांना काश्मीर सोडवा लागलं होतं. त्यात काश्मिरी पंडितांकडून प्रॉपर्टी घ्यायला पण बंदी घालण्यात आली होती. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा ”जो इधर कमया हे वो इधरही रहेगा असं म्हणत” कट्टरतावाद्यांनी  व्हॅली सोडून जाणाऱ्या पंडितांना लुटायला सुरवात केली.

त्यामुळं एका रात्रीत आयुष्यभरची कमाई जाऊन दारिद्र्यता आयुष्य जगण्याची वेळ आली होती.

सरकारकडून फक्त कॅम्प उभारून काश्मिरी निर्वासितांबद्दलची आपली जबाबदारी झटकून देण्यात आली होती. तात्पुरती उपाययोजण्या काही प्रमाणात झाल्या मात्र ज्या त्यांच्या पोटापाण्याची, शिक्षणाची, रोजगाराची अशी निश्चित मदत करण्यास मात्र सरकार पुढे येत नव्हतं. सर्व अगदी तुटपुंज्या प्रमाणात केलं जात होतं. ज्याप्रमाणे काश्मीर मध्ये त्यांना एकटं सोडून देण्यात आलं होतं तसंच त्यांना आता विस्थापनांनंतरही वाऱ्यावर सोडण्यात आलं होतं.

आणि अशावेळी संपूर्ण देशामधून एक नाव पंडितांच्या मदतीला आलं ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

ndtv ला मुलाखत देताना प्रसिद्ध पत्रकार राहुल पंडिता जे स्वतः या काश्मीरमधल्या पंडितांवरील अत्याचारांचे  व्हिक्टिम होते ते  बाळासाहेबांनी केलेल्या मदतीबद्दल सांगताना म्हणतात

” काश्मिरी पंडितांची मदत फक्त एकाच नेत्याने केली आहे आणि ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे”

जम्मू मधील कॅम्पात अनेक काश्मिरी पंडित हलाखीचे दिवस काढत होते. आता त्यांना त्यांच्या पुढच्या पिढीच्या भविष्याची काळजी वाटत होती.  अनेकांनी त्यांच्या नावावर सत्ता भोगली मात्र ठोस पावलं उच्छल नव्हती.

अशा वेळी  काश्मिरी पंडितांचा एक ग्रुप बाळासाहेब ठाकरे यांच्या मदत मागणीसाठी आला. बाळासाहेब या आधी अनेकदा पंडितांच्या प्रश्नाबाबद्दल आत्मीयतेने बोलले होते. पंडितांना त्यांच्या काश्मीरमधल्या ठिकाणी पुन्हा बसवण्यात यावं , त्यांची मालमत्ता. घरदार त्यांना पुन्हा बहाल करण्यात यावी अशी मागणी करण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे नेहमीच अग्रेसर राहिले होते. आणि बाळासाहेब दाखवत असलेल्या याच सहानुभूतीमुळे ते शिष्टमंडळ शिवसेनाप्रमुखांकडे आलं होतं.

बाळासाहेबांनी मोठ्या आत्मीयतेनं त्या शिष्टमंडळाची चौकशी केली. पंडितांचा वनवास अजून संपला नसल्याचे बघून बाळासाहेबांना अतीव दुःख झाले. मात्र नुसत्या भावना व्यक्त न करता त्याऐवजी काहीतरी करून दाखवण्यावर बाळासाहेबांचा विश्वास होता. आणि त्यामुळे त्यांनी लगेच मी तुमच्यासाठी काय मदत करू शकतो अशा प्रश्न केला.

काश्मिरी पंडितांच्या कल्याणसासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करण्याची तयारी असल्याचं बाळासाहेबांनी त्या शिष्टमंडळाला सांगितलं.

मात्र पंडितांनी आतपर्यंत जे मिळवलं होतं ते त्यांच्या शिक्षणामुळे. तसेच पैशांची मदत मागितली तर ती आज ना उद्या संपून जाईल असंही पंडितांना माहित होतं. त्याचबरोबर त्यांना आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याची चिंता देखील होतीच.

त्यानुसार मग काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने बाळासाहेबांकडे काश्मिरी विद्यार्थंच्या शिक्षणाची सोया व्हावी यासाठी महाराष्ट्रात उच्च शैक्षिणक संस्थांमध्ये पंडितांना आरक्षण द्यावं अशी मागणी केली.

बाळासाहेबांनी मग लागलीच १९९५-९६ मध्ये मुखमंत्री असलेल्या मनोहर जोशी यांना या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यास सांगितलं. आणि काश्मिरी पंडितांना शिक्षणासाठी आरक्षण देणारं महाराष्ट्र पाहिलं राज्य ठरलं.

त्याचबरोबर त्या शिष्टमंडळाला महाराष्ट्राच पंडितांच्या मागे नेहमीच उभा राहील हा शब्द दिला. जम्मू मध्ये कॅम्पमधल्या तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या शाळांचा दर्जा तेवढा चांगला नव्हता. त्यामुळे १२ वी नंतर उच्चशिक्षणाकडे वळताना त्यांना अनेक अडचणी येत होत्या. मात्र बाळासाहेबांच्या या निर्णयामुळे काश्मिरी पंडितांच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या होत्या. तसेच शिक्षणाची आणि त्यांनतर रॊजगारची सोय झाल्याने अनेक काश्मिरी पंडितांनी महाराष्ट्राचा स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

आज हजारो काश्मिरी पंडितांची मुले  मुंबई -पुण्यामध्ये  इंजिनीरिंग, बीबीए, एमबीए अशा डिग्र्या घेऊन मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचत नोकऱ्या करत आहेत याचं श्रेय ते अजूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच  देतात.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.