कालच्या पोरासारखंच चौथ्या वर्षी मॅरेथॉन पळून फेमस झालेल्या बुधिया सिंगचं पुढं काय झालं ?

रविवारी संध्यकाळी स्क्रीन स्क्रोल करता करता एक व्हिडिओ टाइमलाइनवर आला. प्रदीप मेहरा अवघ्या १७-१८ वर्षाच्या पोराचा दिल्लीतल्या रस्त्यांवरून पाळण्याचा तो व्हिडिओ होता. मॅकडोनाल्डमध्ये दिवसभर काम केल्यानंतर घरी रात्री घरी जाताना जवळपास १० किलोमीटर अंतर हे पोरगं पळत जात होतं. त्याला आर्मीत भरती व्हायचं आहे पण त्यासाठीची धावण्याची तयारी करण्यासाठी दिवसभर वेळ भेटत नाही म्हणून प्रदीप रोज रात्री घरी धावत जातो असं त्या व्हिडिओ मधून आपल्याला कळतं.  त्याचा हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी असलेला स्ट्रगल आपल्यातल्या अनेकांना भावाला. हा व्हिडिओ करोडो लोकांना पहिला.

आणि मग मीडियाने पण त्याला घेरलं.

एवढं की  मीडियावाले आपल्या भावाला नेलंय आणि मागच्या ३ तासांपासून त्याचा काही आता पता नाहीये असं त्याचा भावालाच पुढे येऊन सांगावं लागलं. 

शेवटी प्रदीप कुठे सापडला तर तो एक चॅनेलच्या स्टुडिओमध्ये. आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा या चॅनेलने त्याला स्टुडिओ मध्येच पळायला लावलं.

आणि टीआरपी साठी भुकेलेले टीव्हीवाले या पोराची पण  बाबा का ढाबा वाला बाबा, रेणू मंडल यांच्यासारखीच सर्कस करणार असंच वाटत होतं. 

पण पोरगं हुशार निघालं आणि यातून बाहेर पडलं. ज्याप्रकाराने त्याने व्हिडिओत गाडीत बसण्यास नकार दिला होता तसंच त्यानं आता मीडियाला पण आपल्याला आता एकटं सोडावं असं सांगितलं.

“मेहनत सुनसान होनी चाहिए, कामयाबी का शोर होना चाहिए” 

असं म्हणत त्यानं मीडियाला दूर सारलं.

तसंच आज अनेक जणं प्रदीप मेहराला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. आर्मीतल्या अधिकाऱ्यांनीही त्याच्याशी संपर्क साधत त्याला आर्मीत भरती होण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. तरीही भारतासारख्या देशात एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रदीप मेहरा आपलं आयुष्य त्याला पाहिजे तसं जगू शकेल का याबाबतीत अजूनही शंकाच आहेत.

मात्र अशीच मदत इतकाच फेमस झालेल्या ओडिशाच्या बुधिया सिंगला मिळाली नव्हती. 

तुमच्यापैकी अनेक जणांना त्याचा चेहरा आठवत असेल. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी भारताचा पुढचा मिल्खा सिंग म्हणून बुधियाची हवा करण्यात आली होती. त्यानं पराक्रमही तसा केला होता. २००६ मध्ये, वयाच्या चारव्या वर्षी, बुधिया सिंगने पुरी ते भुवनेश्वर दरम्यानचे ६५ किमीचे अंतर सात तासांपेक्षा कमी वेळात कापलं होतं. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने त्याला त्या वर्षी जगताला सगळ्यात लहान मॅराथॉनपट्ट म्ह्णून गौरवलं होतं.

 एक रात्रीत भुवनेश्वरच्या झोपड्पट्टीतला बुधिया आता स्टार झाला होता.

त्यात त्याची कहाणी पण तशीच करून होती. २००२ मध्ये जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याची कथा बहुतेक झोपडपट्टीतील मुलांप्रमाणे संपली असती. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, लोकांच्या घरात भांडी धुणारी त्याची आई सुकांती हिने त्याला रस्त्यावरील फेरीवाल्याला ८०० रुपड्यानं विकले होते. त्याचवेळी  परिसरातील सलियासाही झोपडपट्टीधारक संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष बिरांची दास याला बुधियाबद्दल कळल्यावर  त्यांनी फेरीवाल्याकडून ८०० रुपये देऊन बुधियाला परत आणले. बिरांची दास हा त्याच्या घराच्या परिसरात ज्युडो-कराटेचे क्लासेस चालवायचा.

असंच एकदा बिरांची दासनं बुधियाला शिक्षा म्ह्णून धावायला सांगितलं. आणि त्यानंतर जे घडलं त्यानं बुधियाचं आयुष्यच बदललं.

 जेव्हा शिक्षा देऊन पाच तासानंतर बिरांची दास परत आला तेव्हा बुदीया अजून धावतच होता. मग कोच दास ने त्याचं टॅलेंट बरोबर ओळखलं आणि बुधियाला अनेक मॅरेथॉनमध्ये पळवायला लावलं. आणी यामुळंच बुधिया देशभर पोहचला.त्याच्यावर डॉक्युमेंट्री आली. त्यानंतर मनोज वाजपेयीच बुधिया बॉर्न टू रान हा सिनेमादेखील आला. 

मात्र पुढे बिरांची दास याच्यावर लहान मुलाच्या शोषणांचे आरोप झाले आणि बुधियाला मग राज्य सरकारच्या हॉस्टेलमध्ये ठेवण्यात झाली. त्यांनतर बिरांची दास याची एका वादातून  लोकांनी गुंडानी हत्या देखील केली.

मात्र इथून जो बुधियाचा प्रवास गंडला तो कायमचाच. 

बुधिया जेवढा फेमस झळा त्याचा त्याला आर्थिक काहीच फायदा झाला नाही. पुढे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या हॉस्टेल मधूनही बुधियाने काढता पाय घेतला. तिथं देण्यात येणारं अन्न त्याचबरोबर ट्रेंनिंग त्याला मानवत नव्हतं असा त्याचं म्हणणं होतं. २०१८ मध्ये २०१८  मध्ये, पॅट्रिक संग जे  सर्वात वेगवान मॅरेथॉनपटू एल्युड किपचोगेचे प्रशिक्षक होते त्यांनी बुधियाला  मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याची ऑफर दिली होती. मात्र तोपर्यंत बुधिया चांगलाच मोठा झाला होता.संगयांनी रॉयटर्सला सांगितले. जसजसा मोठा होत गेला तस तशी बुधियाची धावायची क्षमता कमी होत गेली.

योग्य वयात गरजेनुसार न दिला गेलेला आहार हे ही त्यामागील एक कारण होतं.

२०१८ मध्ये जेव्हा हिंदुस्थान टाइम्स ने ऐक बातमी दिली ती बुधियाची लास्टची बातमी आढळते. त्यामध्ये घरच्यांनी कोच बिरांची दास यानेच सगळे पैसे लागल्याचा आरोप लावला. तसेच ओडिशा राज्य सरकारनेही त्याचा नुसता वापर करून घेतला असं बुधियाच्या आईचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आजही त्यांना स्वतःच घर नाहीये. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार बुधियाला त्यामुळेच ओडिशा सरकारचा राग आहे आणि तो दिल्ली मध्येच वास्तव्यास असतो.

बुधियाने तेव्हाही त्याच्याबद्दल कोणती माहिती देण्यास आणि भूतकाळाबद्दल बोलण्यास नकार दिला होता. 

प्रसिद्धीने होरपळलेल्या आणि त्याचा कोणताही फायदा ना झालेला बुधिया त्यांनतर लाइमलाईटपासून दूरच आहे. सध्या त्याच्या नावाने एक ट्विटर अकॉउंट चालवलं जातंय आणि त्यावरून बुधियाला  मदत करण्यासाठी क्राऊफंडींगची लिंक आहे. तर बुधिया दिल्लीमध्ये शिक्षण घेत आहे एवढीच माहिती मिळते. मात्र यापलीकडे बुधिया प्रसारमाध्यमांपुढे आलेला नाहीये.

त्यामुळं बुधिया सिंगचं काय झालं तर टॅलेंटची नीट जपणूक नं झाल्याने, योग्य सोयी सुविधा नं दिल्याने केवळ प्रसिद्धच्या  २-३ दिवस वापर करून सोडून दिल्याने वाया गेलं हे सत्य आहे. त्यामुळे आता प्रदीप मेहेरच्या बाबतीत होऊ नये अशीच अपेक्षा.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.