शास्त्रीबुवांनी ठिणगी टाकली आणि अमृता सिंग विनोद खन्नापायी वेडी झाली…
बॉलिवूड म्हणल्यावर बॉक्सऑफिसवरची कमाई एका बाजूला आणि त्यांची अफेअर एका बाजूला असतात. म्हणजे सलमान खानला ऐश्वर्या रॉयवर प्रेम करतो म्हणून हवा देणारे एका बाजूला आणि दुसरीकडे कतरिनाने विकी भाऊसोबत लगीन केलं म्हणून पण सलमान भाईला हवा देणारे एका बाजूला. म्हणजे बरेच प्रेम प्रकरणाचे उदाहरणं देता येईल नर्गिस-राज कपूर, शाहिद-करीना, अमिताभ- रेखा ही सगळी नावं आणि त्यांचे अफेअर्स जगजाहीर होते पण आजचा किस्सा आहे अमृता सिंग आणि विनोद खन्नाच्या अफेअरचा. पण अमृता सिंग काय विनोद खन्नाला इम्प्रेस करू शकली नाही.
आता अमृता सिंग ही सैफ अली खानची बायको होती हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण सैफ अली खानच्या अगोदर तिचं नाव बऱ्याच लोकांसोबत जोडलं गेलं होतं त्यात क्रिकेटपटू रवी शास्त्री ते विनोद खन्ना पर्यंत बरीच लोकं होती. अमृता सिंग एकेकाळी क्रिकेटर रवी शास्त्रीसोबत सिरीयस रिलेशनशिप मध्ये होती. त्याच काळात ती जेपी दत्ता यांचा बंटवारा (1989) चित्रपटही करत होती.
एके दिवशी रवी शास्त्रींनी गंमतीने अमृताला सांगितले की, तू काहीही कर, तू विनोद खन्नाला इम्प्रेस करू शकत नाहीस. मग काय ठिणगी पडली आणि अमृता सिंग हात धुवून विनोद खन्नाच्या मागे लागली.
यानंतर अमृताने विनोद खन्ना यांना इम्प्रेस करण्याचा खूप प्रयत्न केला पण अपयशी ठरल्याचं म्हटलं जातं. ती अक्षरशः विनोद खन्नापायी वेडी झाली होती. दरम्यान, अमृता आणि रवी यांच्यात भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. म्हणजे शास्त्री बुवांनी तो नाद सोडला आणि आपल्या बॅटिंग वर जास्त फोकस केलं. ‘पार्टिशन’ चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलदरम्यान अमृता आणि विनोद खन्ना यांच्यात जवळीक वाढू लागली होती.
मात्र, यादरम्यान अमृता सिंगची आई रुक्साना सुलतान मार्गात आडवी आली आणि तिने आपल्या मुलीला विनोद खन्ना यांच्यापासून दूर राहण्याची सूचना केली. खरंतर अमृताची आई रुक्साना बेगम यांना त्यांच्या मुलीने घटस्फोटित आणि 11 वर्षांहुन मोठ्या मुलाशी लग्न करावे असे वाटत नव्हते. यानंतर अमृता आणि विनोद खन्ना यांचे नाते कायमचे संपुष्टात आल्याचे बोलले जाते.
काही वर्षांनंतर अमृताने आपल्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. एका फोटोशूटदरम्यान दोघांची भेट झाली आणि त्यानंतर काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी घरच्यांना न सांगता लग्न केले. हे लग्न 13 वर्षे चालले. 2004 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अमृताला दोन्ही मुलांचा (सारा आणि इब्राहिम) ताबा मिळाला.
अजूनही बॉलिवूडमध्ये अधुरी प्रेम कहाणी म्हणून अमृता सिंगचं त्या लिस्टमध्ये नाव घेतलं जातं. पुढे विनोद खन्ना अचानक धार्मिक गोष्टीत अडकले आणि मग ही लव्ह स्टोरी जास्त काळ चालु शकली नाही.
हे ही वाच भिडू :
- ४०० वरुन १०० आणि ५० जागा लढविण्याचा निर्णय घेणाऱ्या सेनेचं यूपीत उपद्रवमूल्य आहे तरी किती ?
- विनोद खन्नाच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी “अचानक” झाल्या होत्या.
- २०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या धर्मेंद्रने अमेरिकेला जाण्याची ऑफर धुडकावून लावली होती….
- काजोलच्या आईने मराठमोळा हिसका दाखवत धर्मेंद्रच्या कानफटात हाणली होती…