काजोलच्या आईने मराठमोळा हिसका दाखवत धर्मेंद्रच्या कानफटात हाणली होती…

बॉलिवूडमधील ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या जमान्यात जादुई डोळ्यांची एक अभिनेत्री होती ती म्हणजे तनुजा. अभिनेत्री तनुजाचं वैशिष्ट्य हे होतं कि ती कधी इतर अभिनेत्रींना कॉम्पिटिशन देण्याच्या भानगडीत पडली नाही आणि तिने स्वतःची एक वेगळी वाट तयार केली. त्यावेळच्या नामांकित हिरोंसोबत तनुजाने अभिनय केला पण एक घटना अशी घडली होती कि त्यात तिने थेट धर्मेंद्रच्या कानाखाली ठेवून दिली होती.

तनुजा आणि धर्मेंद्र हे दुलाल गुहा यांचा चांद और सूरज या सिनेमाची शूटिंग करत होते. तनुजा आणि धर्मेंद्र हे एकमेकांचे चांगले मित्र होते आणि एकत्र त्यांनी बरच काम केलेलं होतं. तेव्हा धर्मेंद्रने आपली बायको प्रकाश कौर आणि तनुजाची भेट घालून दिलेली होती. सनी देओल तेव्हा ५ वर्षांचा होता. 

एके दिवशी धर्मेंद्र हा अचानकपणे तनुजा यांच्याशी फ्लर्ट करू लागला. सुरवातीला तनुजा यांना धर्मेंद्र मजाक करतोय कि काय असं वाटत होतं पण जेव्हा तो अति करू लागला तेव्हा तनुजा भडकली आणि तिने बेशरम म्हणत धर्मेंद्रच्या कानाखाली वाजवली.

मी तुझ्या बायकोला ओळखते आणि तू हे चाळे करतोयस… तेव्हा मात्र धर्मेंद्र चपापला आणि म्हणाला तनु मेरी माँ सॉरी बोलता हू..किसीको बताना मत प्लिज, मेरेको तू अपना भाई बना ले….असं म्हणत तनुजाला त्याने राखी बांधण्याची विनंती केली.

बाजूला असलेला काळा दोरा तनुजाने धर्मेंद्रच्या हातात राखी म्हणून बांधला आणि त्याला भाऊ करून टाकलं. धर्मेंद्रची मोठी गोची झाली असती जर हे प्रकरण तेव्हाच बाहेर आलं असतं. पण तेव्हा तनुजाने याबद्दल गुपित ठेवलं आणि एका फिल्मफेअरच्या सोहळ्यात त्यांनी गमतीत हा किस्सा सांगितला.

विनोद खन्ना,अमिताभ बच्चन आणि संजीव कुमार यांच्यासोबतही तनुजाने काम केलं. विनोद खन्नाविषयी त्या बोलतात कि विनोद हा आलतूफालतू कोणीही नव्हता, तो कधीच काहीही फालतू बोलायचा नाही. को ऍक्टरला कम्फर्टेबल कस राहता येईल, को ऍक्टरचा आदर कसा राखावा हे सगळं विनोद खन्नाकडून शिकण्यासारखं होतं. 

१९७१ साली तनुजाने अनुभव नावाचा सिनेमा संजीव कुमार यांच्यासोबत केला तेव्हा त्या संजीव कपूरबद्दल म्हणतात कि सिधा साधा जेंटल सोल आणि फँटॅस्टिक ऍक्टर. संजीव कुमार जर सिनेमात १०० टक्के प्राण ओतत असेल तर मी १०१ टक्के प्रयत्न करायचे कि त्याच्यासारखं काम होईल म्हणून.

तनुजा यांचा पहिला सिनेमा होता प्यार कि कहानी तोही अमिताभ बच्चन यांच्यासोबत. ताज हॉटेलच्या एका क्लबमध्ये या सिनेमाची मिटिंग होती तेव्हा अमिताभ बच्चन तनुजा यांना म्हणाले होते कि तुम्ही छान दिसता सिनेमात काम करायला हवं तुम्ही. तेव्हा तनुजा हसून आणि टोमण्याच्या पद्धतीत म्हणाल्या होत्या मी इथं सिनेमाच जॉईन करायला आले आहे.

आज तनुजा यांची मुलगी काजोल आपल्या आईचा वारसा पुढे चालवत आहे. पण त्या काळात धर्मेंद्रसारख्या आघाडीच्या नटाला मराठमोळा हिसका दाखवत तनुजा यांनी त्याच्या कानफटात लगावली होती. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.