हेमा मालिनीमुळे धरमपाजींनी सुभाष घईच्या कानाखाली हाणली होती…

धर्मेंद्र हा सगळ्यात पॉप्युलर हिरो म्हणून लोकांना आवडायचा. त्याच्या लव्ह स्टोरीचे किस्से आजही ऐकायला मिळतात. हेमा मालिनीवर त्याने टाकलेले टप्पे हे सर्वश्रुत आहेतच. असाच एक किस्सा म्हणजे हेमा मालिनीवरून धर्मेंद्रने रागाच्या भरात दिग्दर्शक सुभाष घई यांच्या कानाखाली पेटवली होती. तर जाणून घेऊया हा किस्सा.

सिनेमांच्या शूटिंगच्या दरम्यान हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं प्रेमप्रकरण चांगलंच फुलत चाललं होतं, त्यानंतर दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. खरंतर हेमा मालिनीसोबत लग्न करणं हेच मोठं दिव्य धर्मेंद्र समोर होतं. लग्न झालेल्या धर्मेंद्रच जेव्हा हेमा मालिनीसोबत अफेअर सुरू होतं तेव्हा त्या दोघांबद्दल बॉलिवूडमध्ये चर्चा झडत होत्या. पण याचा काहीही फरक त्यांच्यावर पडला नाही. धर्मेंद्र हा हेमा मालिनीसाठी वेडा झालेला होता.

हेमा मालिनी सोबत अफेअर हा मुद्दा सोडून धर्मेंद्र हा बॉलिवूडमध्ये रागीट माणूस म्हणून ओळखला जायचा. सुभाष घई सारख्या लेजेंड दिग्दर्शकाला फटकावून काढण्यापर्यंत धर्मेंद्रची मजल गेली होती. हा किस्सा तसा जुनाच आहे पण आजही सिने रसिकांसाठी ताजा आहे.

1981 साली क्रोधी या सिनेमाची शूटिंग सुरू होती. सुभाष घई दिग्दर्शक होते. त्यांनी त्यावेळी सुभाष घई यांनी हेमा मालिनीला बिकिनी घालायला सांगितली, पण हेमा मालिनीनी स्पष्टपणे नकार कळवला. हेमा मालिनी म्हणाली की ती रिव्हीलिंग ड्रेस घालेल, पण सुभाष घईने तिला समजावलं की सिनेमात स्विमिंग पुलचा एक सीन आहे, त्यामुळे बिकिनी घालणं कंपल्सरी आहे. एवढं समजावूनही हेमा मालिनीने बिकिनी घातली नाही आणि तिने रिव्हीलिंग ड्रेसमध्ये तो सीन शूट केला.

आता हा प्रकार जेव्हा धर्मेंद्रला समजला तेव्हा त्याला भयंकर राग आला. थेट शूटिंगच्या ठिकाणी धर्मेंद्रने सुभाष घईच्या कानफटात मारायला सुरुवात केली. धर्मेंद्र आणि सुभाष घई यांच्यातलं हे भांडणं प्रोड्युसर रणजित विर्क यांनी सोडवलं. त्यांनी धर्मेंद्रला समजावलं आणि शांत केलं. या घटनेने सुभाष घई घाबरून गेले आणि त्यांनी सिनेमातून तो सीनच हटवला.

या क्रोधी सिनेमात धर्मेंद्र, हेमा मालिनी,जिनत अमान आणि शशी कपूर ही कास्ट होती. धर्मेंद्र आपल्या रागासाठी फेमस होते. सुभाष घई यांच्या अगोदर धर्मेंद्र हा जितेंद्र आणि राजकुमार यांनाही भिडला होता. असंही बोललं जातं की एकदा जितेंद्रला मारण्यासाठी तो एकदा हेमा मालिनीच्या मेकअप रूममध्ये गेला होता. त्याकाळात हेमा मालिनीचे घरचे जितेंद्रला जावई बनवण्यास उत्सुक होते आणि धर्मेंद्रला या गोष्टी होऊ द्यायच्या नव्हत्या.

पुढे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं. सोबत सिनमे केले पण त्यांची लव्ह स्टोरी आजही बॉलिवूडमध्ये फेमस आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.