अमेरिकेने कोरोनाविरोधी लस विकसित केलेय ती या कोल्हापूरच्या पोराच्या नेतृत्त्वाखाली

कोल्हापूराचा नाद करायचा नाही हे माहिताय, पण थेट अमेरिका म्हणजे जरा जास्तच होतय. भावांनो जास्त वगैरे काही नाही, कोल्हापूर आणि कोल्हापूरकर हे जगभरात डंका वाजवण्यासाठी प्रसिद्धच आहेत.

काही दिवसांपुर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी अमेरिकेने कोरोना रोखण्यासाठी लस विकसित केल्याची माहिती दिली होती.

तुम्हाला माहिताय का या पाठीमागे पण एक कोल्हापूरकर आहे.

हा कोल्हापूरचा पोरगा सध्या कोरोनाविरोधी लस तयार करण्यात येत आहे त्या पथकाचं नेतृत्त्व करत आहे. 

जय अशोक शेंडुरे अस त्याचं नाव. 

जय शेंडुरे हे जागतिक किर्तींचे तज्ञ म्हणून ओळखले जातात. अमेरिकेने फ्ल्यूचे नियंत्रण करण्यासाठी सिएटल इथे फ्लू स्टडी सेंटर उभारले आहे.

याच फ्लू सेंटरमध्ये संशोधकांचे एक पथक अहोरात्र करोना विरोधातील लस तयार करण्याच्या कामात गुंतलेले आहे व त्यांचे नेतृत्व जय शेंडुरे करत आहेत.

http://www.nasonline.org/programs/awards/2019-nas-awards/Shendure.html

जय शेंडुरे यांच्या मते संशोधन यशस्वी ठरले असून त्यावर आत्ता रीतसर शिकामोर्तब करायचे बाकी आहे. 

त्यांच्या या संशोधनाची दखल न्यूयॉर्क टाईम्सने देखील घेतली असून न्यूयॉर्क टाईम्सने त्यांचा उल्लेख ली़ड प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणून केलेली आहे. 

यापुर्वी म्हणजे २०१२ साली जय शेंडुरे यांनी DNA ब्लू प्रिन्ट विकसित केली होती. त्यामुळे गर्भाशयातच बाळाला होणाऱ्या संभाव्य रोगाचे निदान करणे सोप्पे जावू लागले.  २०१० मध्ये त्यांनी भारतीय जनुकिय आराखडा तयार केला होता. त्यांच्या संशोधनामुळे २०१९ चा सायन्स ॲकेडमीचा रिचर्ड सॉन्सरी अवार्ड देखील त्यांना मिळाला आहे. 

हुपरीचे अशोक शेंडुरे आपल्या पत्नी व मुलगा जय आणि राहूल सोबत वाशिंग्टन येथे वास्तव्यास आहेत. जय शेंडुरे हे अशोक शेंडुरे यांचा मुलगा.

हुपरीसोबत त्यांची नाळ आजही कायम असून दरवर्षी हुपरीच्या अंबाबाईच्या यात्रेसाठी कुटूंबाचे सदस्य इथे येत असतात. तसेच त्यांनी हुपरीच्या कॉलेजसाठी ५० लाखांचे देणगी देखील दिली होती. 

  •  माहिती : अमजद नदाफ

हे ही वाच भिडू.