WORK FROM HOME मुळे न्युटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला होता

आर भावा लय अवघड झालंय. घरचे परेशान केलेत. फोन लावू लावू. या रे कोरोना आलाय पुण्यात. सगळे दुकान बंद झालेत. बघा बातम्यात कसली भयानक परिस्थिती आहे.

लवकर या गावाकड. महिनाभर राहून जावा म्हण. मागच्या पाचसहा दिवसापासून सगळीकड हिच चर्चा सुरू आहे.

पुण्यात राहणाऱ्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना गावाकड बोलावून घेत आहेत.
महामारी आलीय. कामधंदे सोडून गावाकड या. जीव वाचवा. सगळ्यांच्या मायबापांच हेच म्हणणं आहे. सर्वत्र भीतीच वातावरण आहे. वरून त्यात भर घालायला व्हॉट्स अप आहेच.

काम करणारे सर्वजण ‘ वर्क फ्रॉम होम ‘ पर्याय निवडत आहेत.

आता या पर्यायाने कामावर किती परिणाम होतो? फायदा होतो की तोटा?  हे त्यांनाच माहीत. विशेष म्हणजे अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झालेली नाही. इतिहासात पण अशा घटना घडलेल्या आहेत.

बरं असो. आता मेन पॉइंट वर येऊ.

कुणी असा विचार करू शकतं का?

अशा परिस्थितीतही काहितरी अनमोल, जगाला दिशा देणारं घडू शकते. एक नुसतीच घटना नाही खरतर जगाच कोडं उलगडणारी घटना अनेक शतकांपूर्वी अशाच एका महामारीत घडली होती.

झाल अस की, 1665 ला लंडन मधे प्लेगची साथ पसरली होती.

त्यात आजच्यासारख अनेकांचा जीव गेला होता. त्यावेळी शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन लंडनच्याच ट्रिनिटी कॉलेजमधे शिकत होते. प्लेगची साथ अतिशय वेगानं सगळ्या लंडन मधे पसरली होती. शेकडो लोकांना दवाखान्यात दाखल केलं होतं. गर्दीची ठिकाणे लोकांसाठी बंद करण्यात आली होती.

अस म्हणतात प्लेगमुळे मानवी मृत्यूचा आकडा 2 लाख इतका पोहचला होता
आजच्या कोरोना सारखीच सगळीकड परिस्थिती होती. शहरातली सर्व कॉलेजेस बंद केल्याने. न्यूटन ला पण आपल्या वूलस्टोर्प मनोर मधल्या घरी जावं लागलं. घरी परतल्यावर पण त्याचं संशोधन सुरूच होते. न्यूटन घरातच आपल संशोधनाचं काम करायचा.

हे वर्क फ्रॉम होमच होत.

हाच काळ न्यूटनच्या संशोधनाला पोषक ठरणार होता आणि जगाला अनेक लहान लहान गोष्टींची उत्तरे मिळणार होती. ज्याच्या  परिणाम स्वरूप अनेक नवीन शोध लागणार होते. याच काळात न्यूटनने गुरुत्वाकर्षण नियमावर काम केल्याचा उल्लेख आहे.

केंब्रिज हुन घरी परतल्यावर त्यांच्या बेडरूमच्या खिडकीतून एक सफरचंदाच झाड दिसायचं त्यावरून त्यांना गुरुत्वाकर्षणाची कल्पना सुचली.

काही जण या गोष्टीचा विरोध करतात. मात्र त्यांचे सहकारी जॉन कॉन्ड्यूईट यांनी ही कथा सत्य असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यांच्या मते न्यूटन त्या बागेत निवांत बसले असताना तिथे सफरचंद पडले व न्यूटनला पुढच्या गुरुत्वाकर्षणाच्या संशोधनाची दिशा मिळाली.

त्याच्या या कष्टाला फळ मिळालं आणि जगाला गुरुत्वाकर्षणाचा नियम.

आजही न्यूटन च्या गुरुत्वाकर्षण नियमाला संशोधनात अनन्यसाधारण महत्व आहे. एकविसाव्या शतकातील अनेक शोधांचा पाया हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षण नियम आहे.

विशेष म्हणजे हा शोध लंडन मधल्या सर्वात मोठ्या साथीच्या रोगामुळे लागला. साथ संपल्यावर न्यूटन परत केंब्रिज विद्यापीठात आले, त्यांनी आपले संशोधन पूर्ण केलं व 2 च वर्षात प्रोफेसर म्हणून तिथे नोकरी पकडली. पण त्यांच्या या शोधामुळे पुढचं सगळं जग बदलून गेल.

न्यूटनच्या या स्टोरीवरून एक आशा ठेवायला हरकत नसावी की, या स्थितीत लवकरच कोरोना वर पण औषध सापडेल. जर कोरोनावर लवकरच औषध सापडल तर ते शोधणारा न्यूटन पेक्षा कमी नसणार हे मात्र नक्की.

  • सुशिल सुरवसे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.