पंडित नेहरूंचे चाणक्य, ज्यांनी एका रुपयात संयुक्त राष्ट्र संघटनेत आठ तास भाषण केलं..

चाणक्यचं महत्व नव्याने सांगण्याची गरज नाही. प्रत्येक राजाला चाणक्य असतो तो राजाच्या कानात जावून महत्वाची गोष्ट सांगतो. चाणक्यचं महत्व अस की चाणक्यच्या सल्याने राजा निर्णय घेतो. निर्णय बरोबर असतील तर चाणक्यची किंमत वाढते. लोकशाहीत राजाचा पंतप्रधान झाला, राजा कोण असावा हे जबाबदारी लोकांकडे आली हि चांगली गोष्ट पण चाणक्य तसाच राहिला. 

बर हा चाणक्य फक्त राजालाच असतो अस नाही, अगदी गावातल्या ग्रामपंचायत सदस्याला सरपंच करण्यापासून देशाला पंतप्रधान करण्यापर्यन्त चाणक्य आपलं डोक लावत असतो. खरा राजा तोच असतो जो आपला चाणक्य कोण असतो हे अचूक हेरतो. आत्ता मोदींचे चाणक्य अमित शहा आहेत हे काय गुपीत नाही तसच पंडिल जवाहरलाल नेहरूंचे चाणक्य वीके मेनन होते हे देखील गुपीत नाही.

पण मोदींनी शहांना आपलं चाणक्य म्हणून कस निवडलं हे आपण यापुर्वी वाचलच आहे, आजची हि स्टोरी नेहरूंनी वीके मेनन यांना आपला चाणक्य म्हणून कस निवडलं त्याची, 

आणि पुढे त्यांच काय झाल याची देखील. 

अलेक्झडर कल्टरबग या माणसाने त्यांचा उल्लेख, इव्हिल जिनीयस असा केला होता. तर नेहरूंचे हैरी हॉप्किंन्स, भारताचे रासपुतीन, भारताचा विशेंसकी (स्टॅलिनचा चाणक्य) अशा अनेक विशेषणांनी त्यांना ओळखलं जायचं. जागतिक पातळीवर बलाढ्य असणाऱ्या प्रत्येक देशात त्यांच्या त्यांच्या चाणक्यसोबत नेहरूंच्या या चाणक्यसोबत तुलना होत असे. 

मेनन यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता. लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये असताना प्रोफेसर हेरॉल्ड लास्की हे त्यांचे गुरू होते याच प्रभावातून त्यांनी लंडनमध्ये असताना त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली. याच मागणीमुळे ते नेहरूंच्या नजरेत आले. लंडनमध्ये नेहरू आणि मेनन यांची भेट झाली आणि त्याच भेटीत ते नेहरूंच्या विश्वासू सहकार्यांच्या यादित आले. 

भारताला स्वातंत्र मिळालं आणि भारताचे इंग्लडमधील पहिले हायकमिश्नर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. नेहरूंचा चाणक्य होण्याच्या दिशेने मेनन यांच हे पहिल पाऊल होतं कारण नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला आंतराष्ट्रीय पातळीवर तितक्याच ताकदीने भूमिका घेण्याची गरज होती आणि ती मेनन घेवू शकतात हे नेहरूंनी दिसत होतं. अमेरिका आणि रशिया, साम्यवाद आणि भांडवलशाही या जागतिक भूमिकांमध्ये अलिप्त राष्ट्र संघटना स्थापन करण्यात आली. त्याच श्रेय जितकं नेहरूंना दिलं जात तितकच श्रेय मेनन याचं देखील आहे. कोरियन युद्ध, सुएझ कालवा, ताईवान प्रश्न अशा कित्येक प्रश्नांमध्ये जागतिक मध्यस्थाची भूमिका त्यांनी निभावली होती. 

काश्मीर प्रश्नावर त्यांची हिरो ऑफ काश्मीर म्हणून स्तुती करण्यात आली.

जागतिक पातळीवर काश्मीर प्रश्न चर्चेला आला तेव्हा भारतामार्फत जागतिक व्यासपीठावर तितक्याच ताकदिने हि भूमिका मांडण्याची गरज निर्माण झाली होती. हे काम देखील वी.के. मेनन यांनी पार पाडलं होतं. ते फक्त एक रुपया पगार घेत असत. शेवटच्या काळात तर हा रुपया देखील त्यांनी देशाचा तिजोरीत टाकण्याच काम केलं. 

१९५७ साली काश्मीरमध्ये जनमत घ्याव असा प्रस्ताव पाकिस्तानच्या प्रेमातून अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सभेत ठेवला होता. तेव्हा रशियाला आपल्या बाजूने वळवून घेण्याची भूमिका मेनन यांनी निभावली होती. त्यांनी सलग आठ तास आपली भूमिका संयुक्त राष्ट्र संघटनेच्या व्यासपीठावर मांडली. शेवटी ते थकून त्यांना खाली बसावं लागलं पण याच भाषणामुळे भारताची काश्मीरबाबत असणारी भूमिका तितक्याच ताकदीने जागतिक पातळीवर गेली तर या भाषणामुळे त्यांना हिरो ऑफ काश्मीर म्हणून नवी ओळख देखील मिळाली. 

नेहरू म्हणायचे, मला काहीही विचारू शकता पण कृष्णा यांच्याबद्दल नको. 

मेनन यांच्या भूमिका मात्र नेहरूंना अडचणीत आणणाऱ्या ठरत होत्या. १९५१ मध्ये इंग्लडच्या अॅटली सरकारनं नेहरूंना सांगितल होतं की तुम्ही मेनन यांना पुन्हा भारतात बोलावून घ्या. तर अमेरिकेचे उच्चाधिकारी देखील मेनन यांच्याबरोबर संबध ठेवण्याचे टाळत याचं मुख्य कारण म्हणजे मेनन यांच्यावर असणारा साम्यवादाचा प्रभाव व रशियासारख्या राष्ट्रांसोबत असणारे त्यांचे मैत्रीचे संबध. 

चाणक्य भारतात आला आणि फेल झाला. 

जागतिक व्यासपीठावर जिंकण्याच काम केलेला या चाणक्यला नेहरूंनी १९५७ मध्ये भारतात बोलावून घेतलं. त्यांना संरक्षणमंत्री करण्यात आलं. त्या काळात भारताला जी प्रतिष्ठा जागतिक पातळीवर मिळाली होती त्याच संपुर्ण श्रेय मेनन यांनाच दिल जातं पण असा हा चाणक्य मात्र भारतात तिरस्कारास पात्र ठरला, त्याच कारण होतं चीनने भारतावर लादलेल युद्ध व त्यामध्ये झालेला पराभव. 

तत्कालीन सेनाध्यक्ष थिमैया यांनी भारताच्या सैन्याकडे बेल्जियम रायफल्स असावी अशी मागणी केली होती. भारतीय सेनेकडे अत्याधुनिक शस्त्र असावीत, आपणाला चीन सारख्या देशांकडून धोका आहे असे ते सांगत असत मात्र जागतिक पातळीवर चाणक्य ठरलेले मेनन इथे मात्र चुकीचे ठरत गेले त्यांनी सांगितल की, भारताला चीनकडून कधीच धोका मिळणार नाही. आणि बल्जिमय रायफल्स सारख्या नाटो सैन्याकडे असणाऱ्या शस्त्रांची गरज भारतीय सैन्याला अजिबातच नाही. इतकच नाही तर त्यांनी पुर्वचे फ्रंन्टची जबाबदारी लेफ्टनंट जनरल कौल यांच्याकडे दिली त्यातूनच थिमैया आणि वीके मेनन यांच्यात तणाव निर्माण झाला. थिमैया १९६१ साली रिटायर झाले आणि चीनने १९६२ साली हल्ला करुन थमैया कसे बरोबर होते तेच दाखवून दिलं. चीनच्या आक्रमणानंतर नेहरूंवर दबाब वाढू लागला व मेनन यांना राजीनामा द्यावा लागला. 

कुलदिप अय्यर यांनी बियॉन्ड द लाईन्स पुस्तकात लिहलं आहे की, मी मेनन यांना प्रश्न विचारला होता की त्यांनी कोणत्या या प्रकरणात ठाम निर्णय का घेतले नाहीत तेव्हा मेनन यांच उत्तर होतं,

“माझी गोष्ट माझ्यासोबत संपून जाईल मी जर काही बोललो तर त्याचे आरोप नेहरूंवर केले जातील आणि माझी नेहरूंवर निष्ठा आहे त्यामुळे मी कधीच बोलणार नाही” 

झालं देखील तसच चीनमध्ये त्यांच्या फसलेल्या भूमिकेच ओझ घेवूनच ते ऑक्टोंबर १९७४ ला जग सोडून गेले.  

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.