कौल, नेहरू, गांधी की घांडी : राहूल गांधींच गोत्र नेमकं कोणत ?
सध्याचा राष्ट्रीय मुद्दा म्हणजे राहूल गांधींच गोत्र. आपल्या देशाचा राजकारण पहिला जातीपातींच मग विकासाचं. आपण कितीही पुरोगामीपणाची नौका रेटायचा प्रयत्न केला तरी यातून सुटका नाही.
तुम्ही नेमके कुठले? अच्छा त्या गावचे. आडनाव काय म्हणायचं आपलं? अच्छा ते का? पुढच्या माणसाने आपली जात अचूक हेरलेली असते. कधीकधी आपणही तेच करतो. निदान आपल्या मनापुरत आपण प्रामाणिक असायलां हवं.
कोणतर म्हणलं आहे ना,
इन डेमोक्रॅसी पिपल गेट द गव्हर्मेंट दट दे डिझर्व्ह..
तर पहिल्यांदा आपणा सर्वांना शुभेच्छा. कारण आपले राजकारणी देखील तसेच आहेत.
राहूल गांधींनी आपलं गोत्र सांगाव? मोतीलाल नेहरू यांच खर नाव मोईन्नुद्दीन होतं. नेहरू हे आडनाव असतच नाही. इंदिरा गांधींचे पती फिरोज मुस्लीम होते? गांधी आडनाव आलेच कसे? असे कित्येक प्रश्न..
गाव आणि आडनावावरुन जात ओळखणाऱ्या आपल्या बुद्धीला गांधी घराण्यात असलेला हा घोळ म्हणजे एक आव्हानच.
पण कसय “बोलभिडू” तुमच्यासाठी नेहमीच तत्पर असतं.
कथेला सुरवात होते ती अठराव्या शतकात आणि कथेचं नायक आहे कौल घराणं. तर हे कौल आडनाव असणारं घराणं काश्मिरच्या खुल्या मौसमात गुण्यागोविंदान राहत होतं. तेव्हा काश्मिर आजच्या सारखां, “कोणीही ये आणि टपली वाजवून जा” टाईप नव्हता. तेव्हा बरीचशी आक्रमणं खालच्या खाली व्हायची आणि काश्मिरची लोकं हिमालयावर बसून गमज्या पहायची, असा तो काळ होता.
या काळात काश्मिर खऱ्या अर्थाने जन्नत होता. या जन्नतचं विस्तृत वर्णन करण्याचा मोह कौल घराण्याचे पंडित राजनारायण कौल यांना आवरता आला नाही. त्यांनी मस्तपैकी “यैं हसीं वादियां ये खुलां आसमां” टाईप काश्मिरचं वर्णन करणारा ग्रॅंथ लिहला.
आत्ता या ग्रॅंथाची माहिती पोहचली ती थेट दिल्लीचा मोगल शहनशाह फारूक सियार याच्या कानावर. फारूक सियार हा १७१३ ते १७१९ दिल्लीच्या तख्तावर होता. त्याला लोकं मुगलांमधला हूशार आणि विद्वान माणूस समजायचे. आत्ता विचार करा एका हूशार माणसाकडे दूसऱ्या हूशार माणसाची माहिती कानावर पडल्यावर काय होईल ?
दिल्लीच्या शहनशाहंने पंडित राजनारायण यांना दिल्लीत येवून स्थायिक व्हा अशी ऑफर दिली. आत्ता लक्षात घ्या ही ऑफर अमित शहा टाईप होती. म्हणजे “कस येताय का कसं कसं करायचं तुमचं” याप्रकारची. साहजिक मनमारून का होईना पंडित राजनारायण यांना आपल्या कुटूंबकबिल्यासोबत दिल्लीला यावं लागलं.
कौल कुटूंब दिल्लीत आलं.
मुगल बादशाहने त्यांना दिल्लीच्या चांदणी चौकातली हवेली आणि काही गावांची जहांगिरी देवून टाकली. आत्ता हे कुटूंब दिल्लीतल्या चांदणी चौकात रहायचं तिथं एक “नहर” म्हणजेच कालवा होता. या कालव्याशेजारी राहणारे कुटूंब म्हणून त्यांच नाव नेहरू पडलं अस सांगितलं जातं.
थोडक्यात दिल्लीतील त्यांच्या वास्तव्यानंतर त्यांना लोकांनी “नहर” वरुन नेहरू म्हणू लागले अस सांगितल जात. ही गोष्ट तशी पटत नाही पण आपल्या शिंदेचं मध्यप्रदेशात जावून सिंधीया होतं हे पाहीलं की विश्वास बसायला जरा सोप्प जातं.
आत्ता पुढे आपण थेट मोतिलाल नेहरू यांच्याकडे येवू. मोतीलाल नेहरू यांचा जन्म १८६१ सालचा. कौल कुटूंब दिल्लीत आले ते १७१३ ते १७१९ सालच्या दरम्यान. आत्ता या मधल्या काळात नेमक्या काय उलथापालथी झाल्या हे हेळव्याला ( हेळवी माहीत नाही ? हेळवी तोच बैल घेवून येतो आणि तुमच्या घराची कुंडली लिहून पुढच्या गावाला जातो )
सुद्धा सांगता आली नसती म्हणून त्या थोडक्यात मांडतो.
गंगाधर नेहरू ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत होते. त्यांची नियुक्ती झाली त्या दरम्यान १८५७ चा उठाव चालू झाला. गंगाधर नेहरू होते पोलिस खात्यात. ब्रिटीश शासनाविरोधात आपल्यावर संकट कोसळू नये म्हणून हजारो दिल्लीकरांनी तेव्हा शहर सोडलं. यातच गंगाधर नेहरूंचा समावेश होता. ते या आपली पत्नी जिओराणी, मोठ्ठा मुलगा बन्सीलाल व धाकटां मुलगा नंदलाल यांना घेवून आग्रा शहरात रहायला आले.
- या दरम्यान गंगाधर नेहरु यांच्या पत्नी जिओराणी गरोदर असताना गंगाधर यांचा मृत्यू झाला आणि दोन ते तीन महिन्यातच मोतीलाल नेहरू यांचा जन्म झाला.
- आत्ता जिओराणी आणि त्यांची तीन मुलं बन्सीलाल, नंदलाल आणि मोतीलाल.
- बन्सीलाल न्यायालयात लिपीक होते ते प्रगती करत न्यायाधीश झाले.
- नंदलाल आग्रा शहराच्या राजपुतानात खेतानी नामकं राजाकडे मंत्री म्हणून काम करु लागले त्यानंतर परिक्षा देवून ते वकिल झाले.
- याच पावलावर पाऊल टाकून मोतीलाल नेहरु देखील वकिल झाले. त्यांनी १८८३ साली केंब्रिज मधून कायद्याची पदवी घेतली. त्यासोबत प्रतिष्ठेचा लंब्सडन पुरस्कार देखील मिळवला.
हे सगळं सांगायचं नेमकं कारण म्हणजे मोतीलाल नेहरू यांच्या पाठीमागे जाताना अनेकजण फिरवून फिरवून तो बांग्लादेश पाकिस्तान पासून रशियापर्यन्त घेवून जायला हयगय करत नाहीत. तर आत्ता पुढे…
मोतीलाल नेहरू भारतात आले आणि वकिलीची प्रॅक्टिस करु लागले. जस काश्मिर तेव्हा सुंदर होतं तसचं वकिल सुद्धा तेव्हा श्रीमंत असत. मोतीलाल नेहरू याचं कमी वयातच लग्न झालं. त्याची पहिली पत्नी दगावली त्यानंतर त्यांनी दूसरा विवाह स्वरुपाराणी यांच्याशी केला. त्यानंतर १४ नोव्हेंबर १८८९ साली जन्म झाला तो पंडित जवाहरलाल नेहरूंचा.
या काळात मोतीलाल नेहरू आपल्या वकिलीच्या प्रॅक्टिसमधून महिना दोन हजार रुपये कमवत होते !!
आत्ता आपणास पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेहरू आडनावाचा किस्सा समजला असेल, पुढचा बोनस म्हणून कौल ते नेहरू या आडनावादरम्यान असणाऱ्या घराण्यातील लोकांनी नेमकं काय काय केलं ते देखील समजलं असेल अशी बोल भिडू आशा करतय.
आत्ता पुढील टप्पा म्हणून कहानीत थोडासा ट्विस्ट.
आपण थेट महात्मा गांधींच्या स्वातंत्र काळात जावू. महात्मा गांधी या महात्मानं सगळा भारत ढवळून काढलां होता. अनेक तरुण गांधीच्या चळवळीने प्रभावित होवू भारतभूमीच्या स्वातंत्र संग्रामात उडी घेत होते. याच काळात पारशी समाजाचे जहांगिर घांडी यांचे नातू फिरोज घांडी देखील महात्मा गांधीच्या पावलावर पाऊल टाकतं स्वातंत्रसंग्रामात उतरले होते. ते महात्मा गांधीमुळे इतके प्रभावित झाले की त्यांनी आपलं आडनाव बदलून गांधी केलं.
(या काळात इंदिरा गांधी आणि फिरोज घांडी/गांधी या दूरान्वये संबध नव्हता.)
नंतरच्या काळात फिरोज गांधी आणि इंदिरा गांधीचं लग्न ठरलं. फिरोज गांधी हे पुर्वीच घांडीचे गांधी झाले होते आत्ता इंदिरा गांधी या इंदिरा नेहरूपासून ते इंदिरा गांधी कशा झाल्या ते पाहणं तितकीच मजेशीर आहे,
इंदिरा नेहरूंच आडनाव गांधी होण्यामागे एक किस्सा असा आहे की,
जस संपुर्ण भारतात मुली सासरी गेल्यानंतर नवऱ्याच आडनावं लावतात त्यापद्धतीनेच इंदिरा नेहरू यांनी गांधी आडनाव लावलं. पुढे तेच आडनाव राहून गांधी यांनी लावलं. आत्ता राहूल यांनी आपल्या वडिलांचा इतिहास सांगावा किंवा आईकडचा हा त्यांचा प्रश्न पण आम्हाला तर प्रामाणिकपणे इतकच वाटतं,
गर्दितल्या एकाने तरी आपल्या नेत्याला शिक्षण विचारावं जात नाही.
हे ही वाचा.
- संजय गांधीनी खरच इंदिरा गांधींना मुस्काड लगावली होती ?
- गांधीजींना खरंच देश ‘काँग्रेस मुक्त’ करायचा होता का ?
- राजीव गांधींनी शहाबानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय एम.जे.अकबरांच्या सल्ल्यावरून पलटवला होता..?
- भगतसिंगांच्या फाशीला गांधीजी जबाबदार होते का..?
- सुशीलकुमार की वसंत साठे, कोणी पळवला होता इंदिरा गांधींचा अस्थिकलश ?