अहमदनगरची स्थापना करणारा मलिक अहमदशॉ बहिरी कोण होता..?

आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्याची मागणी केली आहे. हे नामांतर पुर्ण करावं यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे. या पत्रात ते म्हणतात,

“हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे  संपूर्ण  हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेंव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती,मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यामातेनं या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे”

सोबतच आपण आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही की होळकरशाहीचा? ‘अहिल्यानगर’ नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात  हे सिद्ध कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे लक्षात ठेवा असही ते म्हणालेत.

साहजिक औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव यानंतर अहमदनगरचे “अहिल्यादेवीनगर” हा विषय चर्चेत आला आहे..

पण या शहराला अहमदनगर हे नाव कसे पडले हे पाहणं देखील तितकच गरजेच आहे.

अगदी थोडक्यात अहमदनगर शहराचा इतिहास पहायचा झाला तर इस पूर्व ९०० ते ३०० या दरम्यान इथे आंधभृत्य, इस ४०० पर्यन्त राष्ट्रकुट चालुक्य, ११७० ते १३१० देवगिरीचे यादव,  पंधराशेव्या शतकात बहामनी, बहामनीतून बाहेर पडलेल्या मलिक अहमदशॉ बहिरी यांची सत्ता या भागात होती.

याच मलिक अहमदशॉ बहिरी सीना नदीकाठी नगर शहराची स्थापना केल्याची सांगण्यात येत. त्याच्याच नावावरून या शहराचं नाव अहमदनगर अस करण्यात आलं.

निझामशाही नंतर मराठेशाही व त्यानंतर मुगलशाहीची सत्ता या परिसरात होती . त्यानंतरच्या काळात म्हणजे १७५९ मध्ये इथे पेशव्यांचा अंमल सुरू झाला. १८०३ मध्ये नगर इंग्रजांच्या ताब्यात गेलं.

१८२२ साली इंग्रजांनी अहमदनगर जिल्हा जन्माला घातला.

अहमदनगरचा विस्तृत इतिहास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सांगण्यात आलेला आहे. या माहितीनूसार,

११७० ते १३१० या काळात देवगिरी यादव यांनी राज्य केले, अहमदनगरच्या ईशान्येस ७४ मैलावर देवगिरी (आधुनिक दौलताबाद) यादवची राजधानी होती. यावेळी सर्वात उल्लेखनीय मंत्री आणि राजकारणी हा हेमाद्री होता ज्यानी मोडी लिपीचा शोध लावला होता.

हेमाद्री बुद्धिमान होते. चुनखडी आणि सिमेंट न वापरता इमारतींचे बांधकाम करण्याची संकल्पना त्यांनी निर्माण झाली. हेमाद्री हे या प्रतिष्ठित राजाचे मंत्री होते. मात्र लष्करी सामर्थ्याच्या अभावामुळे १२९४ मध्ये दिल्लीच्या मोघल राजा जल्लाल्द्दीन खिलजीचा सरदार मुख्याधिकारी अलादीन खिल्जी यांच्या हस्ते त्याचा पराभव झाला.

विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेकडे असलेल्या मुसलमान राजाचे हे पहिले आक्रमण होते. या विजयाने दख्खनमध्ये  मुस्लीम गढीची स्थापना करण्याच्या मुस्लिम महत्वाकांक्षाला जोरदार यश मिळाले.

वारंवार झालेल्या आक्रमणानंतर १३१८ मध्ये यांचे वर्चस्व संपले.

१३१८ मध्ये दिल्लीच्या सम्राट मोहम्मद तुघलघकाने देवगिरीला आपली राजधानी बनवून त्याचे नाव दौलताबाद ठेवले. त्यानंतर तुघलक दौलताबादला निघून गेला आणि सम्राटाच्या सरदारांनी लोकांना लुटून नेऊन त्यांचे घरे आणि महाल इमारती यांना आग लावली. अलादीन हसन गंगु दिल्ली सम्राटांच्या शक्तीचा नाश करण्यात व १३४७ साली गुलबर्गा येथे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात यशस्वी ठरला.

हे राज्य बहामनी राज्य म्हणून ओळखले जाते.

हे राज्य १५० वर्षे टिकले व हसन गंगू बहमनी नंतर १३ राजांनी राज्य केलं. त्यानंतर बहामनी राज्याची पाच स्वतंत्र राज्ये विभागली गेली.

अहमदनगर त्यांच्यापैकी एक होता. मोहम्मद गवन यांची निजाम-उल-रामभाई भैरी यांनी बहामनीच्या कार्यालयात वर्णी लावली. अहमदनगरच्या निजामशाही राजघराण्यातील संस्थापक मलिक अहमद मार्फत या क्षेत्राचे व्यवस्थापन करण्यात आले. सर्व प्रथम मलिक अहमद यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे आपले मुख्यालय बनवले.

१४८६ मध्ये निजाम-उल-मुळची हत्या झाली आणि मलिक अहमद बहामनी राज्याचे पंतप्रधान झाले. मलिक अहमद राजापासून दूर असताना, राजा ने मलिक खानच्या विरोधात जाण्यासाठी सेनापती जहागीर खानला आदेश दिला. मलिक खान जवळ अपुरी तयारी होती आणि त्याच्याबरोबर थोडी सेना होती.

परंतु मोठ्या धैर्यवान आणि असामान्य चालीने त्याने २८ मार्च १४९० रोजी अहमदनगरच्या पूर्व मैदानावरील जहांगीर खान आणि बहामनी राज्याच्या सैन्याचा पराभव केला.

त्यांचे मुख्यालय, जुन्नर दौलताबादपासून लांब होते, म्हणून १४९४ मध्ये त्यांनी सिना नदीच्या डाव्या किनाऱ्यावर बाग निजाम जवळ एक शहर उभारले, ज्याला त्याच्यानंतर अहमदनगर नावाने संबोधले जाऊ लागले. अहमद निजाम अजूनही शांत नव्हता आणि बहामनी सैन्यावर बदला घेण्याची इच्छा होती.

१४९९ मध्ये तो अखेर यशस्वी झाला आणि दौलताबादचा किल्ला ताब्यात घेतला आणि तेथे त्यांची सेना तैनात केली. या विजयाचे स्मरण ठेवण्यासाठी अहमद निजाम यांनी बाग निजाम (हा अहमदनगरचा सध्याचा किल्ला) याच्याभोवती भिंत उभारली आणि त्यात लाल दगडांचा एक महाल बांधला.

मलिक अहमद निजाम १५०८ मध्ये मरण पावला आणि त्याचा सात वर्षांचा मुलगा बुर्हान सत्तेवर आला, हे राज्य १६३६ पर्यन्त टिकले. त्यानंतर मुघलांचे वर्चस्व आले.

मोघल किंवा दिल्लीचे राज्य (१६३६-१७५९)

शिवाजी, मराठा राजा यांनी अहमदनगर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरावर हल्ला केला. त्यांच्याजवळ मजबूत सेना नव्हती पण सैन्याने गनिमी युद्ध चालू ठेवले आणि मोगला सैन्याला त्रास दिला. शाहजहांने औरंगजेबला १६३६ मध्ये व पुन्हा १६५० मध्ये व्हाईसरॉय म्हणून नेमले. शिवाजीने १६५७ आणि १६६५ मध्ये अहमदनगरवर आक्रमण केले.

इतर वेळी शिवाजी महाराजांचे मंत्री आणि सहकार्यांनी अहमदनगर येथे एकत्रितपणे हल्ला केला.औरंगजेबाने मराठ्यांचे  स्वतंत्र राज्याचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला परंतु ते कधीच यशस्वी झाले नाही आणि शेवटी अहमदनगरमध्ये २१ फेब्रुवारी १७०७ रोजी त्याचे निधन  झाले.

मराठ्यांचे राज्य  (१७५९-१८१७)

निजाम-उल-मुल्कच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन मुलांमधे सलाबत जंग व गझी उद-दीन यांच्यात वाद झाला.या राजकीय गोंधळामध्ये निजामांचा किल्लेदार कवी जंग यांनी पेशव्यांना साथ  दिली.निजाम १७६० मध्ये उदगिर येथे पराभूत झाला.

निजामने अहमदनगर व अहमदनगरच्या प्रांताचा मोठा भाग सोडला. १७९५ मध्ये खर्डा येथे निजामला पुन्हा मराठांनी पराभूत केले. १७९५  मध्ये सवाई माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर मराठ्यामध्ये मध्ये वादसुरु झाले.

१७९७ मध्ये दौलतराव सिंदिया यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडून अहमदनगरच्या किल्ल्याचा ताबा घेतला सिंधिया यांनी १७९७ मध्ये प्रसिद्ध राजकारणी नाना फडणवीस अहमदनगर किल्ल्यात कैदेत होते. अखेरीस तो १७९८  मध्ये सोडले पण अतिशय निराश झालेले नाना फडणवीस १८०० साली मरण पावले.

यशवंतराव होळकर आणि दौलतराव सिंदिया यांनी बाजीराव पेशवेला सतत त्रास दिला.म्हणूनच त्यांनी  ३१ डिसेंबर १८०२ रोजी मंत्रीमंडळाची बैठकित ब्रिटिशांशी त्यांच्या सुरक्षेसाठी एक करार केला. आणि १८१७ मध्ये हे शहर व परिसर इंग्रजांच्या ताब्यात गेले.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.