नीट बघा..! या फोटोमधलं एकजणं मेलेलं आहे, अन् हा त्याकाळचा ट्रेंड होता

फोटो बघूनच आत आला असाल. पुन्हा एकदा चेक करा. तर त्या फोटोमधी जे ५ पोरं पोरी दिसत आहेत. त्यामधली जी शेवटची लहान पोरगी आहे तिचा मृत्यु झालेला आहे. म्हणजेच त्या बारकीचा मेल्यानंतर फोटो काढण्यात आला आहे. आपल्याकडं एकाद मेल्यानंतर त्याचा मरण्याच्या आधीचा फोटो असेल तर तो फ्रेम करून ठेवतात. पण  इंग्रंजांच्या देशात मात्र एकेकाळी मेलेल्या माणसाचे फोटो काढण्याची फॅशन होती.त्यामुळंच तुम्ही नीट बघितलं तर समजलं सगळ्यात छोटी जी पोरगी आहे तिला मागे स्टॅन्ड लावून उभं केलं आहे.

तर व्हिक्टोरियन काळात ब्रिटनमध्ये ही प्रथा अस्तित्वात होती. मेमेंटो मोरी या नावाने ही फोटोग्राफी ओळखली जायची.
मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे ही मेमेंटो मोरीच्या मागील मुख्य फिलॉसॉफी होती. लहानमुलांचे कमी वयात होणारे मृत्यू हे विशेषतः फोटोग्राफीद्वारे आठवणीत साठवले जात होते.

social media credit
social media credit

आता ह्याच फोटोमध्ये बघा. या फोटोमधल्या दोन जुळ्यांपैकी एक वारलेलं आहे. यातल्या ज्या मुलाच्या भोवती फुलं आहेत ते मरण पावलेलं आहे. अनेकवेळा फोटोसाठी अशी पोझिंग केली जायची की फोटोमधली एकाधी बॉडी डेड झाली आहे हे कळायचं देखील नाही.

social media credit
social media credit

ह्या तीन फोटोंमधल्या पहिल्याच फोटोमध्ये या दोन लहान मुलींची आई मरण पावलेली आहे. तर बाकीच्या दोन फोटोंमध्ये लहान मुलं ही फोटो घेण्याच्या आधीच देवाघरी गेलेली होती.

व्हिक्टोरियन जीवन मृत्यूने ग्रासले होते. डिप्थीरिया, टायफस आणि कॉलरा यांसारख्या साथीच्या रोगांनी देशात अनेक बळी पडत असत. आणि यातूनच १८६१ पासून शोकग्रस्त इंग्लडच्या राणीने शोक करणे फॅशनेबल केले होते.

मृतांच्या स्मृती सांभाळून ठेवणे ही प्रथा इंग्लडमध्ये बरीच जुनी होती. मात्र याला नेक्स्ट लेव्हलला नेलं ते इंग्लंडमध्ये झपाटयाने स्वस्त होत गेलेल्या कॅमेऱ्यांनी.  फोटोग्राफीचा पहिला यशस्वी प्रकार, डग्युरिओटाइप – पॉलिश केलेल्या चांदीवर एक लहान, अत्यंत तपशीलवार चित्र  असा होता. ही एक महागडी लक्झरी होती, परंतु पोर्ट्रेट रंगवण्याइतकी ती महाग नव्हती.

मात्र फोटोग्राफर्सची संख्या जसजशी वाढत गेली तसतशी डॅग्युरिओटाइपची किंमत कमी झाली. १८५० च्या दशकात जेव्हा औद्योगिक क्रांती जोरात होती तेव्हा कमी खर्चिक प्रोसेस सुरु झाल्या. आता  चांदीऐवजी पातळ धातू, काच किंवा कागद वापरायला सुरवात झाली आणि  मेमेंटो मोरी फोटोग्राफी देखील फॉर्ममध्ये आली. 

डिप्थीरिया, स्कार्लेट फीव्हर, रुबेला यांच्या आजच्या सारख्या लसी नसल्याने जेव्हा बालकं दगवायची  तेव्हा फोटोंच्या माध्यमातून त्यांची आठवण जपण्याकडे कुटुंबाचा ओढा असायचा.

social media credit
social media credit

 तसेच फोटो ही लक्झरी असल्याने अशी भरपूर वेळा व्हायचं कि आयुष्यभर व्यक्तीचा एकही फोटो काढलेला नसायचा. त्यामुळे अनेकदा प्रौढ व्यक्ती मेल्यांनंतरही त्यांचे फोटो काढले जात असत. 

social media credit
social media credit

 

social media credit
social media credit

या फोटोंमधली अजून एक लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे मृतदेहाला पूर्णपणे दागदागिने, चांगले कपडेलत्ते घालून त्याच्याबरोबर फोटो घेतले जात असत. तसेच जिवंत व्यक्तीदेखील कोणत्याच प्रकारचं दुःख दिसायचं नाही.

मात्र हळू हळू वैद्यकीय शास्त्रात प्रगती झाली. मृत्यूदर हि घटत गेला. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या फॅशेनची फोटोग्राफी देखील बुडाली. मात्र जेव्हा जेव्हा हे फोटो डोळ्यापुढे येतात तेव्हा मृत्यू अटळ आहे हे सत्य कायम अधोरेखित होत राहतं.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.