फुटबॉल वर्ल्डकप जिंकणारी अर्जंटिना मालामाल झालीये

३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अर्जंटिनाने फुटबॉल वर्ल्डकप जिंकला. अर्जंटिनाचा स्टार प्लेयर असणाऱ्या लिओनेल मेस्सी ने हा वर्ल्डकप शेवटचा असणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे फायनल मॅचकडे  जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले होते.

या फायनल मध्ये मेस्सी आणि फ्रान्सचा किलियन एमबाप्पे यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली. १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली होती. मॅच बरोबरीत झाल्यामुळं पेनल्टी शूटआऊटमध्ये अखेर अर्जेंटिनानेच बाजी मारली.

सुरुवातीला सामना अर्जेंटिनाच्या बाजूने एकतर्फी जात होता, मात्र, एमबाप्पेने गोल करण्याची हॅट्रिक करुन अर्जेंटिनाच्या नाकी नऊ आणले होते. मात्र, मेस्सीनेही जीवाची बाजी लावत पेनेल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिने विजय मिळवला. २०१४ला विश्वचषकात जेतेपद पटकावण्याचं भंगलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला होता.

१९७८ आणि १९८६ नंतर तिसऱ्यांदा अर्जंटिनाने फुटबॉल वर्ल्डकप जिंकला आहे. वर्ल्डकप जिंकणाऱ्या टिमला मोठं बक्षीस दिल आहे. त्याच बरोबर वर्ल्डकप मध्ये सहभागी होणाऱ्या टिमला सुद्धा ठराविक रक्कम देण्यात येते.

फायनल जिंकणाऱ्या, हारणाऱ्या, वर्ल्डकप मध्ये सामील होणाऱ्या टिमला किती पैसे मिळाले आहेत ते बघुयात.

फक्त फुटबॉल वर्ल्डकप जिंकणारी अर्जंटिना मालामालच झाली असं नाही तर उपविजेत्या फ्रान्सला सुद्धा चांगली पैसे मिळाले आहेत. याच बरोबर सेमीफायनल, क्वाटर फायनल मध्ये पोचणाऱ्या टिमला सुद्धा मोठी रक्कम देण्यात आली आहे.

विजयानंतर अर्जेंटिनाला ३४७ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तर फायनल हरणाऱ्या फ्रान्सला सुद्धा  २४८ कोटींचे बक्षीस मिळाले आहे. मोरोक्कोला हरवून तिसरा नंबर मिळविणाऱ्या क्रोएशियाला २२३ कोटी मोरोक्कोला २०६ कोटी बक्षिस मिळालं आहे.

हे झालं पहिला चार टीमच. याच बरोबर सेमीफायल, क्वाटर फायनल मध्ये प्रवेश करणारे टिमला बक्षीस देण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला ९ मिलियन डॉलर मिळणार आहे. प्री -क्वाटर फायनल मध्ये अमेरीका, सेनेगल, ऑस्ट्रेलिया, पोलंड, स्पेन, जपान, स्विझरलँड, साऊथ कोरिया या टिमला १३ -१३ मिलियन मिळणार आहे. तर क्वाटर फायनल हरणाऱ्या ब्राझील, नेदरलँड, पोर्तुगाल, इंग्लंड या टिमला १७ – १७ मिलियन मिळणार आहे.

फुटबॉल वर्ल्डकपच फायनल जाणाऱ्या आणि टी-२० वर्ल्डकप फायनल जिंकणाऱ्या टीम पेक्षा जास्त रक्कम दिली जाते. टी-२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टिमला फक्त ४६ कोटी रुपये बक्षीस देण्यात आले होते.

फुटबॉल वर्ल्डकप २०२२ च्या एकूण बक्षीस रक्कम ३ हजार ६४० कोटी रुपये होती. जे गेल्या विश्वचषकापेक्षा ३३० कोटी रुपये जास्त असल्याचे सांगितलं जातं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.