इंग्रज पोलिसांशी प्राणपणाने लढली, अखेर तिच्याच नावाने दिल्लीत पोलीस हॉस्पिटल उभं राहिलं..

अरुणा असफ अली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नाव. जेव्हा जुलमी इंग्रज सरकार स्वातंत्र्यासाठी सुरु असलेली आंदोलने मोडून काढण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा अरुणा असफअली आपल्या क्रांतिकारक साथीदारांसह भूमीगत होऊन एकाकी लढा देत होत्या.

त्यांनी जेव्हा भारत छोडो चळवळीत मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर इंग्रजांना चकमा देऊन तिरंगा फडकविला, तेव्हापासून ब्रिटीश पोलिस आणि गुप्तहेर त्यांच्या शोधात होते.

जेव्हा अरुणा यांचे पती असफ अली तुरूंगात खूप आजारी पडले, तेव्हा त्यांना तुरूंगातून विलिंग्टन रुग्णालयात आणण्यात आले. इंग्रजांना विश्वास होता की, अरूणा आपल्या पतीला भेटायला नक्कीच येईल. तिच्यासाठी खास सापळा रचण्या आला.

पोलिसांची या हॉस्पिटलला कडक घेराबंदी होती. 

या दरम्यान जेव्हा एक महिला तिथे ऍडमिट असणाऱ्या असफअली यांना भेटायला आली, तेव्हा तिला देखील पकडण्यात आले. त्यानंतर समजले की , ती अरूणाची बहिण पोर्णिमा होती.

असं वारंवार घडू लागले. एका व्यक्तीसाठी पोलीसव्यवस्थेवर जबरस्त ताण पडू लागला होता. अखेर वैतागलेल्या ब्रिटिश प्रशासनाने आसफ अली यांना शिमल्याला पाठवून दिले. गंमत म्हणजे अरुणा त्याच रुग्णालयात वेष बदलून परिचारिका म्हणून काम करत होत्या.  जेव्हा जेव्हा पोलिसांची टीम येत असे तेव्हा अरुणाची जागा दुसर्‍या परिचारिकाने घेतली.

तोपर्यंत अरुणा यांनाही माहित नव्हते की, एक दिवस दिल्लीत त्यांच्या नावावर एक हॉस्पिटल उभारण्यात येईल.

कालका येथे जन्मलेल्या अरुणाचे कुटुंब बंगालमधील बरीसाल (आताचे बांग्लादेश) मधले होते, त्यांचे आजोबा त्रिलोकनाथ सन्याल हे ब्राह्मो समाजाचे नेते होते, तर त्यांचे काका धीरेंद्रनाथ गांगुली बंगाली चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक होते, तर त्यांचे काका नागेन्द्रनाथचे लग्न रवींद्रनाथ टागोर यांची बहिण मीरा देवीशी झाले होते. अरुणा यांची बहीण पूनमा बॅनर्जी विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडल्या गेल्या होत्या.

असफ अली त्यांच्यापेक्षा २३ वर्षांनी मोठे होते, तरीही दोघांनी लग्न केले. अशा म्हातार्‍या मुस्लिमाशी लग्न केल्यानंतर त्यांच्या मामाने रागाने त्यांना मृत घोषित करून त्यांचे श्राद्ध घातले होते. त्यावेळी त्यांना हेदेखील माहिती नव्हते की, अरुणा असफ अली यांना भारतरत्न मिळेल. असफ अली कॉंग्रेस नेते होते, त्यामुळे अरुणा त्यांच्यासमवेत कॉंग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय झाल्या.

१९३१ मध्ये अरुणा तुरूंगात गेल्या तेव्हा गांधी-आयर्विन करारानंतरही त्यांना सोडण्यात आले नाही. त्यानंतर त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी सुटकेनंतरही तुरूंगातून बाहेर जाण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत गांधीजींनी हस्तक्षेप केला, निषेध झाला, मग ती बाहेर येऊ शकली, पण पुढच्या वर्षी तिला तिहार तुरुंगात पाठवण्यात आले, त्यानंतर तुरूंगातही कैद्यांसह भेदभावाच्या मुद्दय़ावर त्यांनी उपोषणाला सुरुवात केली.

दहा वर्षांनंतर शांततेत राहिल्यानंतर जेव्हा भारत छोडो आंदोलन झाले, तेव्हा त्यांनी तिथेही त्यांनी उडी मारली आणि मुंबईतील गवालिया मैदानावर सर्वांना चकमा देऊन तिरंगा फडकविला.

फरार झाल्यानंतर त्यांच्यावर पाच हजारांचे बक्षीस होते. त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेश बदलून राहू लागल्या. येथेही एक रूग्णालय त्यांच्या कामी आले. आजारी पडल्यावर दिल्लीतील करोल बागचे डॉ. जोशी रुग्णालयात त्या लपल्या.

स्वातंत्र्यानंतर त्यांनी कॉंग्रेसपासून दूर जात सोशलिस्ट पक्षात प्रवेश केला आणि मग कम्युनिस्ट पक्षात सामील झाल्या. दिल्लीच्या पहिल्या महापौर पदी निवडही झाली. १९९६ मध्ये त्यांच्या मृत्यू नंतर दिल्लीने या रुग्णालयाचे नाव देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

विशेष म्हणजे, ज्या इंग्रज पोलीसांनी त्यांना पकण्याचा प्रयत्न केला, त्या पोलिसांसाठी हे हॉस्पिटल बांधण्यात आले होते. जे तीस हजारी कोर्टाजवळ आहे, ज्याला पूर्वी ‘पोलिस रुग्णालय’ असे म्हटले जायचे, एवढेच नाही तर दिल्लीतील सर्व पोस्टमॉर्टम इथेच केले जायचे.

या रुग्णालयाचे अजूनही तीन भाग आहेत, एक म्हणजे ‘सबझी मंडी स्मशानभूमी’, जे दिल्ली-एनसीआर मधील सर्वात जुने आणि सर्वात मोठे पोस्टमॉर्टम सेक्शन आहे. येथे एक १०० बेडचे हॉस्पिटल आहे, १९६० मध्ये स्थापित झालेले सर्व्हिस कॉटेज कॉम्प्लेक्स देखील आहे. ज्यात केवळ सध्या २० बेड्स आहेत. जे गरीबांसाठी आहेत.

१९७० मध्ये ते मुख्य रुग्णालयाशीच जोडले गेले होते.

१९८४ मध्ये पोलिस रुग्णालयाला ‘सिव्हिल हॉस्पिटल’ हे नवीन नाव देण्यात आले. १९९४ मध्ये रुग्णालय विस्तारासाठी पायाभरणी करण्यात आली. १९९६ मध्ये ते तयार झाल्यानंतर त्याये नाव अरूणा आसफ अली हॉस्पिटल ठेवण्यात आले. आता ते त्याच नावाने ओळखले जाते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.