भारताचा कॅप्टन असतानाही मोहम्मद अझरुद्दीनने बँकेतले नोकरी सोडली नव्हती….

क्रिकेट आणि त्याबद्दलचे वादविवाद, किस्से, रेकॉर्ड असं सगळं आपण ऐकत असतो. क्रिकेटर लोकांचा संघात येण्यासाठीचा स्ट्रगल सुद्धा फार मोठा असतो. क्रिकेटमध्ये आल्यावर त्यांची नाळ त्यांच्या अगोदरच्या आयुष्याशी जोडलेलीच असते. असाच आजचा किस्सा आहे मोहम्मद अझरुद्दीनचा. भारतातल्या सगळ्यात जास्त कॉन्ट्रोव्हर्शल क्रिकेटर म्हणून सुद्धा मोहमद अझरुद्दीन ओळखला जातो. पण एकेकाळी अझरुद्दीन स्टेट बँकेत नोकरीला होता.

क्रिकेटची आवड अझहरला होतीच, पण सोबतच तो कानपूरच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीसुद्धा करत होता. ८० च्या काळातली हि गोष्ट. अझरचा खेळ बहारदार होता. एसबीआय बँकेत काम करत असताना बँकेकडून तो क्रिकेटसुद्धा खेळायचा. एसबीआय टिममधला सुपरस्टार म्हणून अझरची ओळख होती. 

या काळात अनेक टूर्नामेंट होत असतं आणि या क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये अझहर मोठा खेळाडू मानला जायचा. अनेक चषक अझरने आपल्या खेळाच्या जोरावर बँकेला मिळवून दिले होते. अझरच्या खेळाने त्याला बँकेत तीनदा प्रमोशन मिळालं होतं. ज्यावेळी अझरने क्रिकेटकडे पूर्णवेळ लक्ष द्यायचं ठरवलं आणि बँकेतील काम सोडायचं ठरवलं तेव्हा एसबीआयमधल्या एकूण एक कामगारांनी त्याला अडवलं होतं, कारण अझरच्या मनगटात जी जादू होती ती इतर कोणाकडेही नव्हती.

चौफेर फटकेबाजी करणारा अझहर बँकेतला कर्मचारी मुळातच वाटत नव्हता, त्याचा पिंड क्रिकेटचा होता. मोहम्मद रिझवान हा तेव्हाचा भारताच्या बास्केटबॉल टीमचा कर्णधार होता, अझरसोबत त्याची चांगली मैत्री होती. त्यावेळी चांगले तरणे खेळाडू हे एसबीआयला नोकरीच्या संधी शोधायचे कारण तेव्हा एसबीआयमधून खेळायची संधीही मिळायची आणि लवकरात लवकर प्रमोशनही व्हायचं. एसबीआयचा तो सुवर्णकाळ असल्याचं लोकं सांगतात. 

एसबीआयमध्ये तेव्हा पी कृष्णमूर्ती, डी गोविंदराज, अब्दुल अझीम हि मंडळी मोहम्मद अझरुद्दीनचे टीममेट होते. एसबीआय बँकेकडून खेळताना गोवा, चेन्नई लखनौ आणि अशा अनेक ठिकाणी टूर्नामेंट खेळायची संधी या लोकांसोबत अझरुद्दीनला मिळायची.

पुढे अझरुद्दीन भारतीय संघात सिलेक्ट झाला तरी त्याने आपली बँकेतली नोकरी सोडली नाही.

दीर्घकाळ मोहमद अझरुद्दीन हे नाव क्रिकेटविश्वात रोरावत राहिलं. चांगले चांगले बॉलर तो फोडून काढायचा. आपली कॉलर मोठ्या झोकात तो वर ठेवायचा आणि मैदानात राजासारखा वावरायचा. पण मॅच फिक्सिंगचं भूत आलं ते अझरच्या थेट मानगुटीवरच बसलं आणि त्याच्या क्रिकेट करियरला कायमचं बसवून गेलं. यात सगळ्या घोळातून अझरला बाहेर यायला बराच काळ लागला.

आयुष्यभराचा बॅन अझरच्या क्रिकेट करियरला लागला आणि यामुळे त्याची टीममधून गच्छंती झाली. शेवटी क्रिकेटचा बादशहा म्हणून वावरणारा मोहम्मद अझरुद्दीन टीममधून बाहेर फेकला गेला. मॅच फिक्सिंगचं स्कँडल अशा प्रकारे अझरुद्दीनला भोवलं. पण क्रिकेटमधून बाहेर पडलं म्हणून काय झालं, अशा वेळीही अझरने बँकेकडे मोठ्या आशेने पाहीलं. 

क्रिकेटमधून बाहेर पडल्यावर अझरला पुन्हा एकदा एसबीआयने विनंती केली कि पुन्हा नोकरीवर रुजू व्हावं. मॅच फिक्सिंग स्कँडल झालं तेव्हा अझरुद्दीन हा एसबीआयच्या ब्रान्चचा चीफ मॅनेजर होता. भारतीय संघाचा कॅप्टन असतानाही एसबीआयसोबत अझरुद्दीनचे चांगले संबंध होते.

खरतर क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगीरी करण्याऱ्या अझरच्या यशात महत्वाचा वाटा होता आणि तेव्हाच तो भारताचा कॅप्टन झाला आणि एक आताचे एसबीआयवाले आहेत लंच ब्रेक आहे म्हणून आपल्याला पिटाळून लावतात. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.