सिंघू बॉर्डर प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या निहंग शीखवर एका ब्रिगेडियरचा खून केल्याचे आरोप आहेत

काही दिवसांपूर्वी सिंघू बॉर्डर हत्या प्रकरणं चर्चेत होतं. धार्मिक ग्रंथाचा अपमान केला म्ह्णून काही निहंग शिखांनी लखबीर सिंह या दलित युवकाची हत्या केली. हे प्रकरण इतकं भयंकर होत कि, लखबीरची हत्या केल्यानंतर त्याचे हात – पाय कापून सिंघू बॉर्डरपासून काही अंतरावर असेलल्या पोलीस बॅरीकॅडला लटकवण्यात आला. या घटनेचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते.

निहंग शिखांच्या हा कृत्याप्रकरणी भाजप कनेक्शनची चर्चा देखील त्यावेळी झाली होती. म्हणजे शेतकरी आंदोलन संपुष्ठात यावं, यासाठी ही घटना घडवून आणल्याचं यावेळी म्हंटल गेलं. कारण होत बाबा अमन सिंग. ज्यांच्यावर SIT ला पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते. 

आता आधी बाबा अमन सिंग कोण ते जाणून घेऊ,

तर बाबा अमन सिंह हे निहंग शीख समूहाचे प्रमुख आहेत आणि कॅनडाच्या ओंटारियो इथल्या शीख गटाचे प्रमुख आहेत. आणि या हत्येचा आरोप ज्या निहंग शिखांच्या गटावर लावला गेलाय, ते बाबा अमन सिंग यांच्या गटाचे सदस्य असल्याचे म्हंटले जातेय.

त्याच्याबद्दलच्या पोलिस रेकॉर्डनुसार २०१८ मध्ये त्यांनी धुरी येथील रिकामी नापीक जमीन बळकावण्याचा कथित प्रयत्न केला होता.  परंतु ही जमीन वनविभागाची असल्याने त्यांना पळवून लावले होते.

आता सिंघू बॉर्डरवरच्या या घटनेचं भाजप कनेक्शन म्हणजे घटनेवेळी सोशल मीडियावर बाबा अमन सिंग आणि भाजप नेत्यांचा फोटो व्हायरल होत होता. ज्यामध्ये ते केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि इतर भाजप नेत्यांसोबत दिसत आहेत.

या फोटोमध्ये पंजाबचे माजी पोलीस कर्मचारी गुरमीत सिंग पिंकी सुद्धा दिसत आहेत, ज्यांना खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले होते, पण त्यांनी आपली शिक्षा पूर्ण केली आहे.

निहंग शीख बाबा अमन सिंग, ज्यांना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी सरोपा जो शिखांच्या सन्मानाचे चिन्ह म्हणून भेट दिलेला पोशाख असतो तो देऊन सन्मानित केले आहे’

पण बाबा अमन सिंग हा एका वॉर हिरोच्या हत्येप्रकरणी फरार गुन्हेगार आहे. सोबतचं ड्रगच्या प्रकरणात एफआयआरमध्ये आरोपी म्हणून त्याचे नावही नोंदवले गेले आहे.

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार बाबा अमन उर्फ ​​आमनाला ७५ वर्षीय ब्रिगेडियर जोगिंदर सिंग जसवाल (निवृत्त) यांच्यावर मालमत्तेच्या वादानंतर हल्ला केल्याच्या आरोपाखाली २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात दाखवलेल्या शौर्याबद्दल ब्रिगेडियर जसवाल यांना वीर चक्र आणि सेना पदक प्रदान करण्यात आले होते.

खटल्यादरम्यान बाबा अमनने दोनदा जामिनाचे उल्लंघन केले आणि जुलै २०१८ मध्ये जालंधर न्यायालयाने त्याला फरार घोषित केले.

एफआयआरनुसार, ३० मे २०१७ रोजी जालंधर येथील आपल्या घरी जात असताना एका निहंग शीखाने ब्रिगेडियर जसवाल यांच्यासह इतर चार जणांवर कथितपणे हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रे आणि रॉडने हल्ला केला आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर सोडून दिले. या हल्ल्यात ब्रिगेडियर जसवाल यांना अनेक फ्रॅक्चर आणि गंभीर जखमा झाल्या, पण त्यांचा जीव वाचला.

जालंधरचे डीसीपी (गुन्हे) जसकरन सिंह तेजा यांनी सांगितले की,

“आम्ही बाबा अमनबद्दल माहिती गोळा करत आहेत. सिंघू सीमेवर बाबा अमनबद्दलच्या सर्व तथ्यांची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही सुरू केली जाईल.

एवढंच नाही तर बाबा अमन हा बर्नाला पोलिसांनी जानेवारी २०१८ मध्ये ड्रग्जच्या वसुलीसाठी केलेल्या मोठ्या कारवाईचा आरोपी आहे. ज्यावेळी एका ट्रकमध्ये पाच बॅगमध्ये पॅक केलेला ९०० किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला होता. घटनास्थळावरून पाच जणांना अटक करण्यात आली होती, तर बाबा अमन आणि इतर दोघांची नाव नंतर समोर आली होती. २०१८ मध्ये त्याला या प्रकरणात फरारी घोषित करण्यात आले होते, परंतु गेल्या वर्षी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातून जामीन मिळाला.

आता बाबा अमन सिंह आणि भाजप नेत्यांचं काय कनेक्शन आहे. आणि याचा सिंघू बॉर्डरवरच्या  घटनेशी काय संबंध आहे. हा चर्चेचा विषय ठरलं आहे

हे ही वाचं भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.