एकच कारण होतं ज्यामुळे हवा झाली पण प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये गेले नाहीत..

राजकीय रणणितीकार प्रशांत किशोर. राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणातला नेहमीच चर्चेत असणारा चेहरा. त्यांच्या रणणितींचा अंदाज भल्याभल्यांना लागत नाही. याचं सोप्यातलं उत्तर म्हणजे सध्याचं तृणमूल काँग्रेसचं राष्ट्रीय स्तरावर तयारं होणार चित्र.

म्हणजे एका राज्यापुरता मर्यादित असणारा पक्ष आज सगळ्या देशात आपले हातपाय पसरवतोयं. त्यामागचं कारण म्हणजे ममता दिदींच्या तृणमूल पक्षाचा पीआर प्रशांत किशोर यांच्या I- PAC कंपनीकडे आहे.

त्यामुळे कुठल्याही पक्षांना प्रशांत किशोर आपल्याकडे असावेत असं वाटण साहजिकचं आहे. ज्यात काँग्रेसचा सुद्धा नंबर लागतो.

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये एन्ट्री करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. किशोरांना पक्षात प्रवेश देण्याबाबत काँग्रेसमध्ये खलबतं सुद्धा सुरू होती. पण या कारणामुळे जी – 23 आणि काँग्रेस हायकमांडमध्ये सुरू झालेला वाद आपण पाहिलाचं.

पण या सगळ्या दरम्यान प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चांना फूलस्टॉप बसला. आता असं नेमकं काय घडलं की, किशोरांना पक्षात प्रवेश करण्याचा प्लॅन बंद करावा लागला.

शेवटच्या क्षणी काँग्रेसमध्ये प्रवेश न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्रशांत किशोर यांच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे बऱ्याच नव्या चर्चांना तोंड फुटलं होतं. पण या सगळ्या चर्चांवर स्वतः प्रशांत किशोर यांनी उत्तर दिलयं.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी सांगितले की,

आपण काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याबाबत पक्षातही जोरदार चर्चा सुरू होती. पण दोन-तीन मुद्दे असे झाले की काँग्रेस आणि माझे एकमत होऊ शकले नाही, त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार त्यांनी पुढे ढकलला.

यासोबतच प्रशांत किशोर कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या सोबत असल्याच्या चर्चांना सुद्धा उधाण आलं होतं. यावर बोलताना प्रशांत किशोर यांनी स्पष्टपणे सांगितले की,

“मी त्यांच्यासोबत कधीच नव्हतो, जेव्हा मी बंगालच्या निवडणुका पाहत होतो तेव्हा मला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मी कधीही पंजाबला गेलो नाही किंवा मी ती जबाबदारी स्वीकारली नाही. माझी एक-दोन बैठक झाली.

मी त्यांना एवढंही म्हणालो की, मला नाही वाटत की तुमचा रस्ता सोपा असेल. तेव्हा कॅप्टन म्हणाले की, समोर कोणताच विरोध नाही. तेव्हा मी त्यांना सांगितले की, विरोध तुमच्या पक्षातचं आहे.

आता प्रशांत किशोर यांच्या या वक्तव्याचा स्पष्ट इशारा नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडे होता. कारण नवज्योत सिंग सिद्धू यांनीचं कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं होतं.

दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धूंचा विषय निघतात प्रशांत किशोर यांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. प्रशांत किशोर म्हणाले की, मला या प्रकरणी कोणतेही वक्तव्य करायचे नाही.

महत्त्वाचं म्हणजे प्रशांत किशोर यांना जेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘हिंदू आणि हिंदुत्व’बद्दल विचारले त्यांनी म्हंटलं की,

“हे म्हणजे बळचं ओढून ताणून आणल्यासारखं आहे. यामुळे भाजपच्या आशा पल्लवित होतील. तुम्ही काँग्रेसचे नेते असाल आणि तुमच्या भाषणाचा बराचसा भाग ‘हिंदू-हिंदुत्वा’वर घालवत असाल तर निरर्थक आहे, ते भाजपला सुट होईल.”

आता प्रशांत किशोरांच्या या मुद्द्यावरून असं तरी स्पष्ट होतयं की, सध्या तरी त्यांची काँग्रेस पक्षात जाण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. मात्र, आपल्या भाजपविरोधी अजेंडा ते कायमचं ठेवणार आहेत.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.