न्यूझीलंड पासून ते भाजपचे खासदार सगळ्यांची मदत फक्त “युथ कॉंग्रेस” करत आहे..

देशात सध्या पेशंटला श्वास घ्यायला ऑक्सिजनचा बेक्कार तुटवडा जाणवत आहे. कालचं कर्नाटकमध्ये त्यामुळे २४ जणांचा मृत्यु झाला. मागच्या काही दिवसापुर्वी दिल्लीत पण असे जीव गेलेत. त्यामुळे ऑक्सिजनसाठी मिळेल तिथून मदत घेणं चालू आहे. यात आता आपल्यासारख्या सामान्य लोकांच आपण समजू शकतो पण सत्ताधारी आमदार, खासदार पण ऑक्सिजनसाठी मिळेल तिथून मदत मागताना दिसतं आहेत.

काल दिल्लीतील असेच एका भाजप खासदार हंसराज हंस यांनी ट्विट करत एका कुटुंबाला ऑक्सिजन मिळावा म्हणून मदत करण्यासाठी आवाहन केलं.

त्यांचं ते ट्विट चांगलंच व्हायरल झालं. त्याच कारण देखील तसचं होतं. कारण त्यांनी ही मदत मागितली होती थेट युथ काँग्रेसला. विशेष म्हणजे युथ काँग्रेसकडून काही वेळातच रिप्लाय आला की खासदार हंसराज हंसजी, संबंधित कुटुंबापर्यंत ऑक्सिजन पोहोचवलं आहे.

 

कोरोना काळात रुग्णांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, संघटना, व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. त्यापैकीच एक संघटना आहे युथ काँग्रेस. मागील काही काळापासून युथ काँग्रेस श्रीनिवास बीव्ही यांच्या नेतृत्वात देशभरात रुग्णांना औषध, बेड, ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी मोहीम राबवत आहे. 

यातूनच मदतीसाठी त्यांना अनेक जण संपर्क साधत आहेत. यात अगदी सामान्य माणसापासून ते विदेशी संस्थांचा देखील समावेश आहे.

काही उदाहरण बघायची झाली तर १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी ऋषिकेश कुमार नावाच्या व्यक्तीनं दिवसभर फिरून बघितल्यानंतर कोरोना बेडसाठी श्रीनिवास बीव्ही यांना संपर्क साधला.

त्यानंतर १ तासाच्या आत ऋषिकेशला बेड मिळाल्याच श्रीनिवास यांनी सांगितलं.

२ दिवसांपूर्वी न्यूझीलंड उच्चायोगानं ट्विट करत श्रीनिवास यांना ऑक्सिजनसाठी मदत मागितली होती. त्यात म्हंटलं होतं,

श्रीनिवासजी, तुम्ही न्यूझीलंड दूतावासासाठी तात्काळ एका ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करू शकता का?”

त्यानुसार काही वेळातच दूतावासाच्या दारात सिलेंडर पोहचवण्यात आला. मात्र यादरम्यान आयोगाकडून हे ट्विट डिलीट करण्यात आलं. आणि नवीन ट्वीट करून सांगितलं की,

“आम्ही ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत. दुर्दैवाने आम्ही केलेल्या आवाहनाला चुकीच्या संदर्भात सादर करण्यात आलं. यासाठी आम्ही माफी मागतो.”

ट्विट डिलीट झालं मात्र न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी याबाबात युथ कॉंग्रेसचे आभार मानले,

यापूर्वी फिलिपीन्स दूतावासाने युवक काँग्रेसकडे ऑक्सिजन सिलेंडरसाठी मदत मागितली होती. त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि काँग्रेस नेते व माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्यात ट्विटरवर चांगलाचं वाद झाला होता. एस. जयशंकर यांनी त्याला ‘चीप पब्लिसिटी स्टंट’ म्हटलं होतं.

मात्र हे सगळं राजकारण बाजूला ठेऊन यातील चांगली गोष्ट बघायची झाली तर युथ काँग्रेसनं अशी नेमकी कोणती व्यवस्था उभी केली आहे, की या सगळ्यांना त्यांच्याकडे मदत मागावी लागली.

तर श्रीनिवास यांचे ट्विटरवर तीन लाखांहुन अधिक फॉलोअर्स आहेत. याच ठिकाणी SOS SOSIYC असं टॅग करुन रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन सिलेंडर, किंवा मोफत औषधासाठी संपर्क केला जातो. सोबतच फेसबूक आणि व्हॉट्सॲपवर पण मदतीचे मेसेज येत असतात.

त्यानंतर दिल्लीत १२५ पेक्षा जास्त सदस्यांची आणि देशभरातील विविध राज्यात १ हजार पेक्षा जास्त जणांची टिम सकाळी ७ वाजल्यापासून या मदतीसाठी येणाऱ्या मेसेजवर लक्ष ठेवून ॲक्शन घेत असते. हे काम कमीत कमी पहाटे ३:३० वाजेपर्यंत सुरु असते.

यात दिल्लीतील १२५ सदस्यांपैकी १०० सदस्य मेडिकल सुविधांच्या मॅनेजमेंट सुविधांसाठी प्रत्यक्ष फिल्डवर जातात. तर बाकी जण ट्विटर, फेसबूक आणि व्हॉट्सॲप यावरील मेसेजेस मॅनेज करतात, हॉस्पिटल्सशी संपर्कात राहतात. जर बाहेरच्या राज्यातील मेसेज असेल तर तो संबंधित राज्यातील एसओएस आयवायसी टिमला पाठवला जातो. जिथून पुढची कार्यवाही केली जाते.

११ एप्रिलपुर्वी देशात रेमडिसिविर आणि इतर औषधांचा तुटवडा जाणवण्याच्या आधी युथ कॉंग्रेसच्या वॉर रुममार्फत आयवायसीची टिम डॉक्टरांकडून रुग्णांच प्रिसीक्रिब्शन, हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचं पत्र, पॉझिटीव्ह रिपोर्टची कॉपी आणि आधार कार्ड घेवून जवळच्या मेडिकलशी रुग्णांच्या नातेवाईकाला जोडून दिलं जायचं.

त्यानंतर औषधांचा तुटवडा सुरु झाल्यानंतर याचे वाटप करण्याचे सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. तेव्हापासून युथ कॉंग्रेसकडून थेट प्रशासानाला संपर्क करत आहे. सरकारकडून ही औषध सध्या थेट रुग्णालयांना दिली जात आहेत.

आता प्रशानसाच्या आणि युथ कॉंग्रेसच्या वॉर रुममध्ये काय फरक आहे? तर सरकारकडून तयार केलेले ॲप, वेबसाईट हे कधी कधी वेळेवर अपडेट केलं जातं नाही. त्यामुळे रुग्णांना बेडची त्यावेळची माहिती मिळतं नाही. मग गोंधळ होतो. मात्र युथ कॉंग्रेसच्या वॉर रुममधून प्रत्येक तासा-दोन तासाला हॉस्पिटल्स आणि नोडल अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून बेड, ऑक्सिजनचे अपडेट घेतलं जातं.

याच प्रोसेसमधून जात युथ कॉंग्रेसनं आजपर्यंत २० हजार पेक्षा जास्त जणांना मदत केल्याचा दावा केला आहे.

औषध, बेड ऑक्सिजन व्यतिरीक्त इतर मदत..

युथ कॉंग्रेसच्या दाव्यानुसार त्यांनी औषध, बेड ऑक्सिजन व्यतिरीक्त आजपर्यंत ५ हजार जणांना प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आणले आहे. राहूल राज नामकं मुलग्यानं मागच्या आठवड्यात दिल्लीवरुन बेंगलोरला जात प्लाझ्मा दान केला.

सोबतच मागच्या वर्षीपासून लॉकडाऊनच्या काळात बाहेरील राज्यातील कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात टिमकडून निगमबोध घाटाच्या बाहेर २ हजार प्रवासी मजूरांना जेवण, सॅनिटायझर, मास्क असं सगळं देण्यात आलं होतं.

आयवायसीच्या दाव्यानुसार त्यांनी आता पर्यंत १ हजार पात्र प्रवासी मजूरांना लस मिळवून देण्यासाठी मदत केली आहे.

श्रीनिवास एका हिंदी माध्यमाशी बोलताना हे सगळं काम करण्यामागचा उद्देश सांगितला होता. ते म्हणतात, मागच्या वर्षी देशव्यापी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर राहूल गांधींनी आम्हा युथ कॉंग्रेसच्या सगळ्या टिमला एकत्र केलं आणि एक काम सांगितलं होतं,

‘जाईए और ज़िंदगियां बचाइए’.

आम्ही आजही ते काम करत आहोत….

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.