गांधीजींच्या विरोधात जाणारे पहिले क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी म्हणजे बिपीनचंद्र पाल.

भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात क्रांतिकारक विचारांची ठिणगी टाकली ती बीपीनचंद्र पाल यांनी. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून बिपीनचंद्र पाल यांची ओळख होती. पत्रकार, समाजसुधारक, शिक्षक, राजकारणी अशा सगळ्या क्षेत्रात ते पारंगत होते.

आपल्या क्रांतिकारक विचारांनी इंग्रजांची झोप त्यांनी उडवली होती. गांधीजींच्या धोरणांबद्दल त्यांचा विरोध का होता हे जरा बघूया.

बिपीनचंद्र पाल यांची ओळख म्हणजे लाल- बाल – पाल या त्रयींमधील ते पाल म्हणून प्रसिद्ध होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया बिपीनचंद्र पाल यांच्या विचाराने भक्कम झाला होता. स्वदेशी आंदोलनांमध्ये त्यांची भूमिका हि महत्वाची होती. लाल-बाल-पाल या त्रिमूर्तीने इंग्रजविरुद्ध अनेक मोहिमा उघडल्या होत्या आणि इंग्रजांना सळो कि पळो करून सोडलं होतं.

७ नोव्हेंबर १८५८ मध्ये त्यांचा जन्म झाला. प्राथनिक शिक्षणातच त्यांना बऱ्याच गोष्टींची माहिती झाली होती.  काळात मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले. नंतर एका ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून ते होते पण अनपेक्षितपणे मोठ्या राजकीय लोकांच्या सहवासामुळे त्यांचा ओढा हा राजकारणाकडे आणि देशसेवेकडे वाढला. समाजसुधारणा करताना आडकाठी करणारी लोकं, जातिभेदाविरुद्ध संघर्ष, समाजाचा दबाव अशा अनेक गोष्टींविरोधात ते काम राहिले.

राजकारणात येण्यापूर्वी ते लोकमान्य टिळक, अरविंद घोष, लाला लजपतराय यांच्या विचाराने प्रभावित झाले होते. देशभक्ती आणि स्वातंत्र्यासाठी काहीही करण्याची तयारी करणारी हि मंडळी होती. १९०७  साली बिपीनचंद्र पाल वंदे मातरम नावाच्या दैनिकातून इंग्रजांविरुद्ध त्यांनी जनमत तयार करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

आपल्या विरुद्ध जनमत तयार केल्यामुळे इंग्रजांनी बिपीनचंद्र पाल यांना तुरुंगात डांबलं. सहा महिन्यानंतर त्यांची सुटका झाली. त्यावेळी इंग्रज सरकारने विरोध करणाऱ्या लोकांना जेलमध्ये डांबण्याचं धोरण अवलंबलं होतं. हा प्रकार पाहून ते काही काळासाठी इंग्लंडला गेले. 

महात्मा गांधींनी सुरु केलेल्या स्वदेशी आंदोलनात ते सहभागी होते आणि ब्रिटिशांचा ते कडाडून विरोध करत होते. इंग्लंडमध्ये तयार होणाऱ्या मालाचा त्यांनी बहिष्कार केला होता. बिपीनचंद्र पाल यांनी मँचेस्टरमध्ये तयार होणाऱ्या कपड्यांवर भारतात पूर्णपणे बहिष्कार केला आणि इंग्रज सरकारला घाम फोडला.

त्यावेळी पहाडी आवाजातले ते एकमेव वक्ते होते. आपल्या भाषणातून समाजामध्ये ते क्रांतिकारी विचारांचं प्रबोधन करून जनतेला देशाप्रती जागरूक ठेवायचे. अगदी दुरून दुरून लोक त्यांच्या भाषणांना गर्दी करायचे.

गांधींच्या शांततेने चालणाऱ्या आंदोलनाला ते वैतागले होते. गांधीजींच्या असहकार चळवळीला त्यांचा विरोध होता. त्यांचं मत होत कि,

ब्रिटिशांविरुद्ध शांततेने  किंवा चळवळी, मोर्चे काढून काहीही फरक पडणार नाही. अशा प्रकारचे हजारो आंदोलन केले तरी इंग्रज सरकार हटणार नाही. हा देश गुलामीच्या बंधनातून बाहेर काढायचा असेल, देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर पूर्ण तयारीनिशी इंग्रज सरकारवर जोरदार हल्ला चढावला पाहिजे.

स्वातंत्र्यासाठी इंग्रज सरकारकडे विनंती करत बसणे हे आपल्याला कदापि मान्य नाही. आंदोलन , मोर्चे वगैरे करत बसणे म्हणजे वेळ जाण्याचे कामं आहेत. एकदा निर्णय घेतल्यावर ते आपल्या मतांवर ठाम असत. त्यांच्या या विचारांमुळे बरेच लोकं त्यांच्याकडे आकर्षित झाली. या विचारधारेमुळे लोक त्यांना क्रांतिकारी विचारांचे जनक म्हणून संबोधू लागले.

गुलामगिरी ही मानवी आत्म्याविरूद्ध आहे, परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला स्वातंत्र्य बहाल केलंय ”

बिपीनचंद्र पाल हे बेधडकपणे आपली मते मांडायचे. भारतात तयार होणारा माल हा सर्वोत्कृष्ट असून त्याला योग्य बाजारभाव न मिळाल्याने आपली अर्थव्यवस्था सुद्धा डबघाईला आल्याचं त्यांनी ओळखलं होतं. त्यामुळे स्वदेशी माल विकत घेऊन देशातील लोकांनी अर्थव्यवस्था बकळत करण्यासाठी प्राधान्य द्यावं अशी त्यांची भूमिका होती.

लाल- बाल- पाल या त्रयीने देशासाठी अमूल्य योगदान दिले. पुढे बिपीनचंद्र पाल हे राजकारणातून निवृत्त झाले आणि एकाकी आयुष्य जगू लागले. २० मे १९३२ साली त्यांचं एकांतवासात निधन झालं. भारताने एक आघाडीचा स्वातंत्र्यसेनानी गमावला. आपल्या क्रांतिकारक विचारसरणीने त्यांनी देशातील तरुण लोकांना प्रोत्साहन दिलं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.