माकडतोंड्या माणसांसाठी बीरा नावाच्या बियरचा शोध लावण्यात आलाय.
पिने की कॅपॅसिटी, जिने की स्ट्रेंथ, अकाऊंट का बॅलन्स और नाम का खौफ…कभी भी कम नहीं होना चाहिये, नाम है …….बीरा 91
नाव ऐकून हारकला असाल, नव्हे. तस ही का हरकु नये म्हणा. जान है आपली बीरा.
आता ज्यांना बीरा माहित आहे त्यांना सांगायला नको ते काय असतंय ते. पण ज्यांना माहित नाही त्यांना थोडक्यात सांगूया. बीरा 91 एक अस्सल इंडियन मेड बियर ब्रँड आहे. आणि आज तो सगळ्या तरुणांच्या गळ्यातला ताईत झालाय.
आता ही बियर घटाघट ढोसणाऱ्यांना माहित पाहिजे, नाव बीरा 91 च का ? कोणी या महान दारूचा शोध लावला ?
तर सुरुवात करूया आजच्या बीरा 91 नामक महान दारूच्या गोष्टीला.
आठवा तो दहा वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा भारतात फक्त दोन किंवा चार अशा हाताच्या बोटावर मोजाव्या एवढ्याच बिअर मिळायच्या. त्यातल्या आणि बहुतेक तरी परदेशीच असायच्या. आता यात एक इंडियन ब्रँड होता तो म्हणजे विजय मल्ल्या भाऊंच्या मालकीची, ‘किंगफिशर’. स्वस्त असणारी ही बियर सगळ्यांचीच लाडकी होती.
अशी वर्षा मागून वर्ष जातच होती. मग उजाडलं २०१५ साल. आणि मग शोध लागला महान बीरा 91 दारूचा.
बीरा हा संपूर्णपणे भारतीय ब्रँड आहे. या दारूचा शोध लावण्याचं महान कार्य केलंय अंकुर जैन या माणसाने. या माणसाने त्याच्या मित्रपरिवारकडून उसने पैसे गोळा करून ‘बिरा 91’ तयार केली. अंकुरने शिकागो येथून २००२ मध्ये ‘कॉम्प्युटर इंजिनीअरिंग’ मध्ये डिग्री घेतली. अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर त्याने अमेरिकेत ‘हेल्थ केअर इन्फॉर्मेशन’ स्टार्टअप मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली.
आता इथं असं हि त्याला बोअर व्हायचं. पाय मोकळे करायला म्हणून हा अंकुर त्याच्या ऑफिसच्या वरच्या मजल्यावर गेला. तिथं ब्रुकलिन ब्रेवरीच ऑफिस होत. ब्रुकलिन ब्रेवरी हे अमेरिकेतल ‘क्राफ्ट बिअर’ मधलं मोठ नाव आहे.
या पठ्ठ्याने जेव्हा हे ऑफिस बघितलं तेव्हा त्याला वाटलं आपण पण अशी क्राफ्ट बियर तयार केली तर किती भारी होईल. आता तुम्ही म्हणाल ही क्राफ्ट बियर म्हणजे काय रे भाऊ..
तर क्राफ्ट बियर म्हणजे मोठ्या मशीनमध्ये न बनवली जाणारी दारू. ती लहान मशीन आणि स्वतंत्र ब्रुअर्सद्वारे तयार केली जाते. दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला अनेक पब आणि बारमध्ये अशा मशिनी सापडतील. जर तुम्ही अशा पबमध्ये बिअर मागितली तर तुम्हाला क्राफ्ट बिअर (नव्याने तयार केलेली बिअर) मिळेल. याला ‘क्राफ्ट बिअर’ म्हणतात.
म्हणजे थोडक्यात ताजी ताजी दारू ..
आता जेव्हा अंकुर जैन अमेरिकेत होता, तेव्हा तो वीकेंडला तो मित्रांसोबत बियरचा आनंद घ्यायचा. अशातच त्याच्या ऑफिसच्यावर असलेलं ब्रुकलिन ब्रेवरी इथून तर त्याची बिअरबद्दलची आवड आणखीनच वाढू लागली आणि त्याने भारतात व्यवसाय सुरू करण्याची योजना आखली. यानंतर, अमेरिकेत स्टार्टअप सोडल्यानंतर अंकुर भारतात परतला. भारतात परतल्यावर त्याने सेरेना बेव्हरेजेस सुरू केले. ही कंपनी क्राफ्ट बिअरच्या आयतीच आणि वितरणाच काम करायची.
अंकुरने भारतीय रेस्टॉरंट्स, बार आणि पबमध्ये सुमारे ४ वर्षे बिअर पुरवल्यानंतर, दारूविषयीची त्याची समज आणखी सुधारली. यानंतर त्याने दारू बनवणारी स्वतःची कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि ते पण क्राफ्ट बीअरची.
आता दारूचा धंदा तर सुरु करायचा पण बाटलीला नाव काय द्यायचं हे ठरत नव्हतं. पुढं अंकुरला बिअरचे नाव बिरू असं ठेऊया म्हणून सुचलं. पण या नावावर आधीच एका जपानी कंपनीचा कॉपीराईट होता. त्यामुळं त्यान दारूचं नाव बिरा ठरवलं.
पण पुढं 91 का विचाराल ?
तर 91 हा भारताचा टेलिफोन कोड आहे. भारतातील सर्व मोबाईल क्रमांक 91 ने सुरू होतात. त्यामुळे पूर्ण नाव ‘बीरा 91’असं ठेवण्यात आलं. त्याचा लोगो माकडाच्या तोंडाचा आहे. यामागचा तर्क असा होता की प्रत्येक माणसाच्या आत माकडासारखा खोडकरपणा आणि नखरा असतो. थोडक्यात माकडतोंडी माणसांच्या माकडचेष्टा करण्यासाठी तयार केलेली बियर.
२०१५ मध्ये, अंकुरने “बिरा 91” दहा लाख डॉलर खर्च करून लॉन्च केली. अंकुरने सुरुवातीला ‘बिरा 91’ चे फक्त २ फ्लेवर्स लाँच केले आणि या दोन्ही पण फ्लेवर्सना लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला.
या ६ वर्षात ही बिअर तरुणांची पहिली पसंती बनली आहे. आज, बहुतेक ‘बिरा’ देशातील मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि पबमध्ये दिसतेच दिसते. भारतात बनवलेली ही पहिली बाटलीबंद ‘क्राफ्ट बिअर’ आहे. पहिली ३ वर्षे बिरा बाजारात कोणालाच माहिती नव्हती. पण गेल्या ३ वर्षात बिराने ज्या प्रकारे तरुणांमध्ये आपला दबदबा तयार केलाय…बॉस मानलं पाहिजे. बीरा भारतातल्याच नव्हे तर जगभरातील तरुणांची पहिली पसंती बनली आहे.
हे ही वाच भिडू
- जुनी भांडणं विसरून त्या रात्री पोटभर दारू पिऊन दोघांनी वासेपूरची डील फायनल केली
- दारूसोबत पाणी नाही मिळालं म्हणून दैना झाली आता हा भिडू रिक्षातून लोकांना मोफत पाणी वाटतोय..
- पोलिसांना दारू पाजून तो फरार झाला आणि आता हॉलिवूडच्या व्हिलनला लाजवेल असं आयुष्य जगतोय.