पाकिस्तानातले लोक म्हणायचे, सरदारजी तुम्ही इथे निवडणूक लढवा, सहज जिंकाल…

बिशनसिंग बेदी भारताच्या बेस्ट खेळाडूंपैकी एक होते. भारतात तर त्यांचा जलवा होताच शिवाय पाकिस्तानात सुद्धा त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. फक्त एक उत्तम क्रिकेटरच नाही तर एक उत्तम माणूससुद्धा बिशनसिंग बेदी होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचे फॅन थेट पाकिस्तानचे पूर्व राष्ट्रपती जिया उल हक होते. असाच एक किस्सा त्यांचा पाकिस्तानमध्ये घडला होता.

१९७८ साली भारताने पाकिस्तानचा दौरा केला होता. पंतप्रधान मोरारजी देसाई हे खेळाडूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण खेळत होते. रावळपिंडीमध्ये तीन दिवसांची टेस्ट मॅच खेळवली जात होती. पण या सामन्यात बिशनसिंग बेदी खेळत नव्हते. या मॅचच्या तिसऱ्या दिवशी कॅप्टन सुनील गावस्कर आणि सर्फराज नवाज यांच्यात मैदानातच बाचाबाची झाली होती. 

या बाचाबाचीच्या कारणावरून सुनील गावस्करानी इनिंग घोषित केली नाही. याच मॅचच्या संध्याकाळी जिया उल हक यांच्यासोबत खेळाडूंची भेट घडणार होती. जिया उल हक यांचे अगोदरच कान भरवून देण्यात आले होते कि भारतीय खेळाडू इथं मॅच खेळायला आलेलेच नाही, भारतीय खेळाडू रडके आहेत वैगरे अशा बऱ्याच वावड्या उठवण्यात आल्या होत्या.

जिया उल हक हा भोळा माणूस होता, त्यांनी लांबूनच बेदींना बघितलं आणि विचारलं क्यू बेदीसाब, इनिंग घोषित का केली नाही ? मी जर कॅप्टन असतो तर मी १२ वाजताच मॅच घोषित केली असती.

हे ऐकून बेदी म्हणाले कि मी हि मॅच नव्हतो खेळत. पण नंतर जिया उल हक यांना थांबवत बेदी म्हणाले पण मला नव्हतं माहिती कि मी १२ वाजता हा निर्णय घेणार आहे. हे ऐकून सगळीच उपस्थित लोकं हसू लागली.

याबद्दल जेव्हा मीडियाने बिशनसिंग बेदींना विचारलं कि काय झालं तेव्हा बेदी म्हणाले मी थोडीच त्यांना सरदार बनायला सांगितलं होत ? दुसरी घटना अजूनच भारी आहे. बिशनसिंग बेदी या दौऱ्यानंतर परत एकदा पाकिस्तानला गेले होते. पेपर वाचता वाचता त्यांना एके ठिकाणी रक्तदानाची जाहिरात दिसली. रक्तदानाच्या ठिकाणी त्या व्यक्तीचा आणि बिशनसिंग बेदी यांचा ब्लड ग्रुप मॅच होत होता.

बिशनसिंग बेदी थेट त्या रक्तदानाच्या ठिकाणी पोहचले आणि तिथं सांगितलं कि मी एक भारतीय आहे. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर माझं रक्त घेऊ शकता. हि बातमी सगळ्या पाकिस्तानमध्ये व्हायरल झाली. या घटनेमुळे बिशनसिंग बेदींना पाकिस्तानात भरपूर आदर सन्मान मिळू लागला. तिथले रिक्षावाले त्यांच्याकडून पैसे घेत नसत.

पाकिस्तानमधले लोक बिशनसिंग बेदींची हि माणुसकी बघून म्हणायचे कि आप यहा काफी फेमस है, अगर चुनाव लडे तो जीत जायेंगे.

पाकिस्तानमधील आदरातिथ्य पाहून बिशनसिंग बेदी भारावून जायचे. भारतात तर तर फेमस होतेच पण या किस्स्यामुळे ते पाकिस्तानांतसुद्धा फेमस झाले होते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.