शाहरुख खान खरंच पाकिस्तानला पैसे देतो का?

सद्या सगळीकडे एकच चर्चा चवीने चघळली जातेय ती म्हणजे आर्यन खान. आता शाहरुख खानच्या पोराने जे काही कांड करून ठेवलंय त्यामुळे गेले बरेच दिवस झालं मिडिया अन सोशल मिडियावर  नुसता दंगा चालू आहे. साहजिकच आहे आता पोराने घातलेल्या घोळामुळे त्याचा पप्पा म्हणजेच शाहरुख अडचणीत आला आहे. मध्यंतरी अशाही बातम्या आलेल्या कि शाहरुखने आर्यन खानच्या ड्रग्स च्या प्रकरणामुळे अनेक कंपनीच्या जाहिराती गमावल्यात. त्यात आयपीएल असो वा बायजू असो अशा कंपन्यांनी शाहरुखसोबतचे करार थांबवले होते.

असो आता या आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे नेटकरी शाहरुखच्या इज्जतीचे वाभाडे काढत आहेत. त्यात भरीस भर म्हणजे काहीही झालं कि शाहरुखचे पाकिस्तान कनेक्शन शोधले जाते आणि ‘खान’ कंपनी कशी पाकिस्तान ला पैसे/फंड पुरवत आहे याच्या पोस्ट व्हायरल होतात.

२०१९ च्या सप्टेंबर महिन्यात, २०२० मध्ये एप्रिल महिन्यात त्यानंतर अलीकडेच २०२१ मध्ये सप्टेंबर महिन्यात अशाच चर्चा चालू होत्या. दरम्यान ट्विटरवर #BoycottShahRukhKhan ट्रेंड झाला होता.  या फेक न्यूजवर शाहरुख च्या चाहत्यांनी #StopFakeNewsAgainstSRK हॅशटॅगने ट्विटरवर ट्रेंड केला होता. दरम्यान, ट्विटरवर शाहरुख खानचा इम्रान खानसोबतचा एक फोटो व्हायरल होत होता आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. शाहरुखला इम्रानसोबत पाहून युजर्सने शाहरुख खानवर बहिष्कार घालण्याची मागणी देखील झाली होती आणि संपूर्ण प्रकरणाची सुरुवात येथूनच झाली आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये शाहरुखने पाकिस्तानला ४५ कोटी रुपयांची मदत केल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर टीव्ही चॅनलनेही हा दावा फेटाळून लावला होता.

२०१७ मध्ये पाकिस्तानमध्ये तेल टँकरचा स्फोट होऊन २१९ लोकांचा मृत्यू झाला होता. शाहरुखने पीडितांना ४५ कोटी रुपयांची देणगी पण पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी ते पुढे आले नाहीत. असे दावे सोशल मिडियावर व्हायरल झाले होते पण हा दावा नसून अफवा आहे आणि हि अफवाही खोटी असल्याचे नंतर निष्पन्न झाले होते. खरं तर शाहरुख खानने ट्विटरवर पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला.

तर काही शाहरुख च्या चाहत्यांनी, शाहरुख ला बॉलिवूडमधला सर्वात मोठा सेल्फ मेड मेगास्टार म्हणलं आहे.. कोणतीही पार्श्वभूमी नसतांना, कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठींब्याशिवाय  शाहरुख स्टार बनला आहे म्हणत त्याला सपोर्ट करत शाहरुखने भारतात संकटाच्या काळात केलेल्या मदतीची यादीच शेअर केलीये.

Image

 

आताही असंच झालं लोकांनी शाहरुख पाकिस्तान ला फंड पुरवतो म्हणून लोकं गप्पा हाणतात. पण खरंच शाहरुख खान पाकिस्तानला पैसे पुरवतो का? 

२०१७ मध्ये इंडिया टीव्ही, The Lallantop ने  या प्रकरणाचा तपास केला होता. यामध्ये त्यांनी शाहरुखच्या मीडिया आणि पीआर टीमशी संपर्क साधला होता. शाहरुखच्या टीमने त्याला मेल करून सांगितले होते की सध्या सुरू असलेल्या बातम्या चुकीच्या आणि निराधार आहेत. या घटनेतील पीडितांना शाहरुखने कोणतीही मदत केली नाही.

या वृत्तसंस्थेने काही तपास केला असता त्यात असे आढळून आले की त्यांच्या संपूर्ण, न कापलेल्या अहवालात, इंडिया टीव्हीने २०१७ मध्ये शाहरुखच्या टीमशी बोलले होते ज्यांनी अफवांचे खंडन केले होते. हे स्पष्ट आहे की शाहरुखने २०१७ मध्ये किंवा आतापर्यंत पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची  देणगी दिली नव्हती.

प्रत्यक्षात, शाहरुखने आणि त्याच्या समूह कंपन्यांनी कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत (PM-CARES) निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधी यासह अनेक मदत निधी दिल्याचे बोलले जाते. त्याची काही यादी म्हणजे,

१. पीएम-केअर्स फंड: कोलकाता नाइट रायडर्स, आयपीएल फ्रँचायझी, पीएम-केअर्स फंडला आर्थिक  योगदान दिले आहे.

२. रेड चिलीज एंटरटेनमेंटने महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीला देखील आर्थिक मदत.

३. हेल्थकेअर प्रदात्यांसाठी वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई): केकेआर आणि मीर फाउंडेशन पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र सरकारसोबत काम करतील आणि ५०,०००  पीपीई किट्सचे मदत केली.

४. एक साथ – द अर्थ फाऊंडेशन: मीर फाउंडेशन ‘एक साथ’ सोबत मुंबईतील किमान एक महिन्यासाठी ५,५०० हून अधिक कुटुंबांना दैनंदिन गरजा पुरवल्या आहेत.

५. रोटी फाउंडेशन: रोटी फाउंडेशनच्या सहकार्याने मीर फाउंडेशन दररोज किमान 10,000 लोकांना ३ लाख जेवणाच्या किट्स पुरवल्या.

६. काम करणाऱ्यांची चार्टर: मीर फाउंडेशन त्यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीभर ओळखल्या गेलेल्या २५०० हून अधिक रोजंदारी कामगारांना किमान एक महिन्यासाठी मूलभूत जीवनावश्यक वस्तू आणि किराणा सामान पुरवेल.

७. अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांना मदत : मीर फाउंडेशन १०० हून अधिक अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांना मासिक स्टायपेंड देण्यात येते जे त्यांच्या मूलभूत गरजांची काळजी घेईल.

ह्या मदतीचं जाऊ द्या शाहरुखचे आजोबा हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते.

हीच परंपरा शाहरुखच्या वडिलांनी आणि काकांनीही पुढे चालू ठेवली. १९४२ साली भारत छोडो आंदोलन सुरु झालं आणि स्वातंत्र्यलढ्याला हिंसक वळण लाभलं तेंव्हा जवळपास साठ हजार जणांना अटक झाली होती. यात होते शाहरुखचे वडील मीर महंमद आणि काका दारा देखील सहभागी होते.

मीर महमद खान हे सच्चे भारतीय होते, शेवटपर्यंत भारतीय राहिले. त्यांचं हिरो व्हायच स्वप्न चाळीस वर्षांनी त्यांच्या मुलान पूर्ण केलं. आजही शाहरुखला कोणी म्हणाले की भारत देश सोडून पाकिस्तानला जा तेव्हा तो चिडून उत्तर देतो,

“अगर वो मेरा देश होता तो मेरे पिता उसे छोडकर यहा नही आते. सब मुसलमान पाकिस्तान को जा रहे थे तब मेरे वालीद दुनिया से लडकर भारत मै रुके. अंग्रेजोको देश को भगा दिया. मै उसं शेर का बच्चा हुं. मेरा देश छोडकर थोडेही जाउंगा.”

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.