आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा त्यांना वाजपेयीजींचा हनुमान म्हंटलं जायचं…

माजी पंतप्रधान आणि ‘भारतरत्न’ अटल बिहारी वाजपेयी हे देशातील एकमेव राजकारणी होते ज्यांनी चार राज्यांमधील सहा लोकसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि बलरामपूर, गुजरातमधील गांधीनगर, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि विदिशा आणि दिल्लीतील नवी दिल्ली संसदीय जागा जिंकणारे वाजपेयी एकमेव नेते आहेत.

आता त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यी लोकप्रियतेचा अंदाज बांधला जाऊ शकतो. अर्थात वायपेयींसारख्या नेत्यांबद्दल सगळ्यांनाच माहितेय. त्यांच्या राजकारणाचे धडे आजही नेतेमंडळींना दिले जातात. पण तुम्हाला माहितेय वायपेयींच्या या यशस्वी राजकीय कारकिर्दीमागे अनेकांचा हात होता.

यातलचं एक नाव म्हणजे ब्रजेश मिश्रा.

भारतीय परराष्ट्र सेवेतील सर्वात सक्षम अधिकाऱ्यांपैकी एक म्हणजे ब्रजेश मिश्रा. जे भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रधान सचिव होते. असं म्हंटल जायचं कि एनडीए सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे सर्व महत्त्वाचे निर्णय ब्रजेश मिश्राचं घ्यायचे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पडद्यामागचे सगळे निर्णय मिश्राचं घ्यायचे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री द्वारका प्रसाद मिश्रा यांचे ते पुत्र होते. द्वारका प्रसाद मिश्रा हे काँग्रेसचे कट्टर नेते मानले जात होते आणि ते इंदिरा गांधींच्या खूप जवळचे होते. पण ब्रिजेश मिश्रा यांचं आणि सोनिया गांधीचं कधीचं पटलं नाही.

ब्रजेश मिश्रा 1991 मध्ये भाजपमध्ये सामील झाले आणि सात वर्षांनंतर वाजपेयींचे मुख्य सचिव बनण्यासाठी त्यांनी भाजप सोडलं.

ब्रजेश मिश्रा यांना वाजपेयींचे हनुमान म्हंटले जायचे.

वाजपेयी आणि मिश्रा यांचं बाँडींग जबरदस्त होतं. कदाचित ते दोघेही एकाचं राज्यातून मध्य प्रदेशातले होते आणि दोघांना परराष्ट्रीय धोरणात फारचं इस्ट्रेस्ट होता. त्यामुळे असं असावं. ते काही का असेना पण दोघं कायम सोबत असायची, मग ते सकाळच्या नाश्त्यापासून अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत.

त्यामुळेचं जेव्हा वाजपेयींना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं, तेव्हा त्यांनी लालकृष्ण अडवाणींपासून नरेंद्र मोदींपर्यंत सगळ्यांनाचं झापलं  होतं.

मिश्रा यांचा एक किस्सा आजही नेतेमंडळींमध्ये चर्चेत आहे.

ते १९७० मध्ये चीनमध्ये तैनात होते. त्याच्या काही वर्षांपूर्वी म्हणजे १९६२ मध्ये भारताने चीनशी युद्ध केले होते, त्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध पार खराब होते.

१ मे १९७० रोजी एका कार्यक्रमानिमीत्त मिश्रा माओत्से तुंगला भेटले. यावेळी बऱ्याच देशांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. सगळ्यांची भेट घेतल्यानंतर माओत्से तुंग ब्रजेश मिश्राकडे आले, हसले आणि बराच वेळ त्यांच्याशी बोलत होते.

या दरम्यान, माओत्से तुंग यांनी म्हंटल की, आपण किती दिवस एकमेकांशी लढत राहू.

तुंग यांचं हे बोलणं एकप्रकारे भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची ही सुरुवात होती. अर्थातचं याचं श्रेय ब्रजेश मिश्रा यांना जातं.

मनमोहन सिंग सरकारने जुलै २००५ मध्ये पहिल्या भारत-अमेरिका अणुकरारावर स्वाक्षरी केली, तेव्हा मिश्रा हे त्या कराराचे प्रमुख विरोधक होते. असे म्हंटले जाते की, त्यांनी भाजपला सुद्धा या अण्वस्त्रविरोधी भूमिका घेण्यास प्रवृत्त केले होते. परंतु नंतर जेव्हा मनमोहन सिंग यांनी त्यांना सगळा करार समजावून सांगितला, तेव्हा ते या कराराचे समर्थक बनले. 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.