यूपीच्या सर्वात श्रीमंत आमदाराने मायावतींना गुलीगात धोका दिलाय…..

राजकारण आणि निवडणुका म्हणलं कि, नेते लोकं खीश्यात राजीनामे घेऊन फिरतात..कधी कोण पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात जाईल सांगता येत नाही….ये पॉलीटिक्स है भाई कभी भी कुछ भी हो सकता है…जहां हवा का रुख होगां लीडर लोग उधर भागेंगे..

चला आता कोण कोणत्या पक्षाला सोडचिट्ठी देतंय ते पाहिलं पाहिजे. आता युपीच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर कॉलेजची पोरं देखील इंटरेस्ट घेऊन सांगतात. तर आपण आत्ता बोलतोय ते नेते म्हणजे बसपाचे आमदार शाह आलम यांच्याबद्दल….शाह आलम हे यूपीचे सर्वात श्रीमंत आमदार मानले जातात. 

आमदार आलम शाह यांनी मायावतींची साथ सोडली अन पक्षाला रामराम ठोकलाय. हे नेते आझमगडच्या मुबारकपूरचे आमदार आहेत. गुरुवार, २५ नोव्हेंबर रोजी त्यांनी आपला सदस्यत्वाचा राजीनामा बसपा नेतृत्वाकडे सुपूर्द केला आहे. शिवाय शाह आलम उर्फ ​​गुड्डू जमाली यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामाही दिलाय. 

काही मीडिया रिपोर्ट्स समोर आले आहेत, ज्यात शाह आलमच्या राजीनाम्याचा मजकूर छापून आलाय..तो असाय कि, 

‘I do not want to be a burden on the party if my leader is not satisfied with me or my work,’ said Shah Alam in his resignation letter to party supremo Mayawati.

पार्टी हायकमांडला  राजीनामा देतांना त्यांनी म्हणलं आहे कि, “बेहन, मी तुमचा सदैव ऋणी राहीन. माझ्यावर विश्वास व्यक्त करून तुम्ही मला दोनदा विधानसभेची आणि एकदा लोकसभेची उमेदवारी दिली. २०१२ पासून आजपर्यंत मी पक्षाशी आणि तुमच्याशी कोणत्याही प्रकारची फसवणूक न करता पूर्ण सचोटीने व प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र अलीकडेच २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकी दरम्यान माझ्या लक्षात आले की, आता तुम्ही माझ्या पक्षाप्रती असलेल्या प्रामाणिकपणावर समाधानी नाही आहात. मग मला हे प्रकर्षाने जाणवले कि, जर  माझे नेते माझ्यावर समाधानी नसतील तर मी पक्षावर एक ओझे म्हणून राहणे माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा आणि आमदारकीचाही राजीनामा देत आहे”.

इतक्या प्रांजळपणे आणि प्रामाणिकपणाने राजीनामा सुपूर्द करणारे हे शाह आलम कोण आहेत?

शाह आलम हे आझमगडमधील मुबारकपूरचे आमदार आहेत. २०१२ आणि २०१७ मध्ये त्यांनी बसपाच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक जिंकली होती. २०१४ मध्ये शाह आलम यांनी आझमगड सदर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. त्यांना जवळपास २ लाख ७० हजार मते मिळाली असली तरी.

शाह आलम हे यूपीचे सर्वात श्रीमंत आमदार मानले जातात. त्यांची एकूण संपत्ती ११८ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. 

आता इतके श्रीमंत आमदार जर मायावतीच्या पक्षाला सोडून जात असेल, तर त्यांच्या पक्षांतून जाण्याने पक्षाच्या निवडणूक प्रचारावर आणि पुढील निकालावर परिणाम होऊ शकतो, हे मात्र स्पष्ट आहे.

 बरं आता शाह आलम हे बसपा सोडणारे काय पहिले नेते नाहीत. त्यांच्या मागे मागे पक्ष सोडणाऱ्या सदस्यांची यादी भली मोठी आहे.

 गेल्या १५ ते २० वर्षांत बसपा पक्षाचा पाया मजबूत करणारे अनेक कार्यकर्ते आणि नेते पक्ष सोडून गेले आहेत. अलीकडील पक्षातील काही महत्वाची आणि मोठी नावं बघायची झाली तर, शाह आलम यांच्या  आधी मायावतींनी लालजी वर्मा आणि रामचल राजभर यांची जूनमध्ये पक्षातून हकालपट्टी केली होती. आमदार वंदना सिंह यांचाही बसपच्या निलंबित नेत्यांमध्ये समावेश आहे. अलीकडेच त्यांनी कॉंग्रेसच्या अदिती सिंग यांच्याबरोबरच भाजपमध्ये एंट्री मारली आहे….ज्यांचा प्रवेश हे भाजपसाठी महत्वाचा असणार आहे कारण त्यांना युपीतल्या रिंगणात अखीलेश यादव यांना टक्कर देण्यासाठी खासकरून वाजतगाजत भाजपात आणल्याच्या चर्चा सद्या युपी च्या राजकीय वर्तुळात चालू आहेत. 

हे ही वाच भिडू  

 

Leave A Reply

Your email address will not be published.