पैसे मिळवण्याच्या नादात त्याने थेट चार्ली चॅप्लिनच्या डेडबॉडीची चोरी केली होती….

जगातलं सगळ्यात अवघड काम कोणतं तर एखाद्याला हसवणं. कॉमेडी म्हणजे सगळ्यात अवघड अभिनय. बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड जिथं कॉमेडीला विशेष मानलं जातं. कॉमेडी म्हणल्यावर सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे चार्ली चॅप्लिन.

चार्ली चॅप्लिन जगातला सगळ्यात जास्त दुखी माणूस होता पण त्याच काम लोकांना हसवण्याचं होतं.

शब्दांचा आधार घेऊन जगाला हसवणं यात काही विशेष नाही पण एकही शब्द न बोलता चार्ली चॅप्लिनने जगाला हसवलं. चेहऱ्यावरच्या हावभावांवरून त्याने त्याचा अभिनय दाखवून दिला. हॉलीवूडमध्येच नव्हे तर जगात त्याच्यासारखा कलाकार कोणी झाला नाही. आजचा किस्सा आहे चार्ली चॅप्लिनच्या डेड बॉडीचा. हि बॉडी अचानक कोणीतरी चोरून नेली होती. त्याबद्दल जरा जाणून घेऊया.

लंडनमध्ये चार्लीचा जन्म झाला. लहानपणापासूनच घरी बेताची परिस्थिती असल्याने तो पडेल ती काम करायचा. अभिनयाचं वेड त्याला होतंच. कालांतराने तो हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये काम करू लागला. तब्बल ७५ वर्ष चार्ली चॅप्लिनचं सिनेमामध्ये करियर चाललं. या काळात त्याच्याइतकं कोणी प्रसिद्ध नव्हतं आणि कोणी त्याला स्पर्धा कर म्हणायला धजत नव्हता. 

१९५० च्या दःसकट चार्लीच्या सिनेमांवर प्रतिबंध आले. कम्युनिस्ट असल्याचा संशय चार्लीवर व्यक्त करण्यात आला होता त्यावेळी लाइमलाईट नावाचा सिनेमा चार्लीने तयार करून ठेवला होता. पण या कारणामुळे तो काही प्रसिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे चार्लीने इंग्लंड शहर सोडून स्वित्झरलँडचा रस्ता धरला.

२५ डिसेंबर १९७७ रोजी चार्लीचं निधन झालं. जगभरातून शोक व्यक्त केला गेला. जगाला हसायला लावणारा कॉमेडीचा सम्राट गेला म्हणून काही काही देशांमध्ये दुखवटा पाळला गेला होता. स्वित्झरलँड शहरातच २७ डिसेंबर १९७७ रोजी चार्ली चॅप्लिनला कॉर्सिएर सर वेव्ह नामक गावातल्या एंग्लिकन सेमेटरीमध्ये दफन करण्यात आलं.

दोन महिने उलटल्यानंतर गावकऱ्यांना तिथे दिसून आलं कि चार्लीला जिथं दफन करण्यात आलं होतं ती जागा उकरलेली होती आणि आतमध्ये असलेली चार्लीच्या शवाची पेटी गायब होती. त्या शवपेटीचा बराच शोध घेण्यात आला मात्र यश आलं नाही.

२ मार्च १९७८ पासून ते १६ मे १९७८ पर्यंत चार्लीची बायको ऊना चॅप्लिन आणि तिचा वकील यांना तब्बल २७ टेलिफोन कॉल आले.

त्या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने चार्लीचा देह परत करतो पण त्याऐवजी ६ लाख अमेरिकन डॉलर मला देण्यात यावे असं सांगण्यात आलं.

पण चार्लीच्या पत्नीने हे कारण देत नकार कळवला कि,

जर हे प्रकरण चार्लीला कळलं असतं तर तो पोट धरून हसत बसला असता.

या नंतर स्वित्झरलँड पोलिसांनी २०० टेलीफोन बुथवर नजर ठेवायला सुरवात केली. १६ मे १९७८ ला पोलिसांनी टेलिफोन बुथवरून खंडणीची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. तो तरुण  होता २५ वर्षीय रोमन वार्डेस. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचा बल्गेरिया देशाचा सहकारी गान्तस्को गनेव याला अटक केली.

या दोघांच्या ताब्यातून चार्ली चॅप्लिनचं कॉफीन पोलिसांनी परत मिळवलं. पोलिसांनी ते कॉफीन चार्ली चॅप्लिनच्या घरच्या लोकांच्या ताब्यात दिलं. यानंतर चार्ली चॅप्लिनच्या परिवाराने पुन्हा एकदा चार्लीचं पार्थिव शरीर सुरक्षित वॉल्टमध्ये टाकलं आणि काँक्रिटमध्ये त्यांच बांधकाम केलं. 

या कृत्याचा जगभरातून निषेध केला गेला होता. चार्ली चॅप्लिनसारख्या महान अभिनेत्याच्या देहाची मृत्यूनंतर विटंबना व्हावी याबद्दल चार्लीच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला गेला. चार्लीच्या पत्नीने म्हटल्याप्रमाणे जर चार्ली जिवंत असता तर या घटनेवर तो हसला असता.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.