मैदानात उतरला चिल्लर राजा, पहिल्या टप्प्यात अधिकाऱ्यांनाच फोडला घाम.

सोमवारी पहिल्या टप्याची अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं अर्ज भरण्यासाठी जात होते. तुम्ही पाहिलंच असेल की, सोलापुरात अर्ज भरण्यासाठी सुशिलकुमार शिंदें होमहवन करून गेले. तर प्रकाश आंबेडकरांनी भव्य रँली काढत अर्ज भरला.

तर तिकडं नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी आपल्या कुटुंबासोबत अर्ज भरला. तर बीडमध्ये तिन्ही मुंडे बहिणींनी एकत्र येत भव्य रँली काढत प्रितम मुंडेचा अर्ज भरला. तर धनजंय मुंडे यांनी रखऱखत्या उन्हात घोषणा देत बजरंग सोनवणे यांचा अर्ज भरला.

मात्र या उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी सगऴ्य़ात जास्त चर्चा झाली ते तामिळनाडू मधील एका उमेदवारांची.

चर्चेत येण्यासारखं झालं तर काय ? 

नेमकं झालं असं, चैन्नईतील दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी अपक्ष म्हणून कुप्पलाजी देवदास अर्ज भरण्यासाठी गेले होते. अर्ज भरायचा म्हणल्यावर 25 हजार रूपये भरावे लागतात. आता आपण अर्ज भरलाय याची चर्चा झाली पाहिजे. माध्यमांनी भी आपल्याकडं कँमेरे वळवले पाहिजेत. पेपरात आपला चांगला फोटो झऴकला पाहिजे.

म्हणून या पठ्ठ्यानं चक्क

कढई, हंडा, दाणपात्र यासारख्या भांड्यामध्ये 25 हजार रूपयांची  2, 5, आणि 10 रूपयांची चिल्लर नेली.

ती चिल्लर मोजता मोजता अधिकाऱ्यांचा नाकी नऊ आले. अन् अन फुकटात प्रचारही झाला की.

मकरंद अनासपुरेकडून प्रेरणा. 

काही भिडू लोकांचं म्हणणंय. ही शक्कल वापरतांना त्यानं आमच्य़ा मक्याचा म्हणजेच मकरंद अनासपुरेंचा सल्ला घेतला होता. म्हंजी त्य़ानं मक्याचा ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा पिक्चर बघितला असावा आणि त्यातूनच त्यानं ही प्रेरणा घेतली असावी.

कारण, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या पिक्चरमध्ये मकरंद अनासपुरे निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी जातो. तेव्हा तो भलीमोठी चिल्लर घेऊन गेलेला असतो. आणि ती मोजतांना अधिकाऱ्यांना पुरता घाम फुटतो. 

चिल्लर राजा. 

कुप्पलाजी देवदास यांच्या अनोख्या शैलीमुळे माध्यमांनी त्यांची दखल घेतली. मोठी रॅली न काढता, शक्तीप्रदर्शन न करता त्यांना मोठी प्रसि्द्धी मिळाली.

त्यांच्या य़ा शक्कलीनंतर सोशलमिडीय़ावरही त्यांची भरपूर चर्चा झाली आणि

सोशलमिडीयावरच्या पोट्ट्यांनी त्यांना चिल्लर राजा असं नाव दिलंय.

आता हा चिल्लर राजा निवडणुकीत काय रंग उधऴतोय हे त्याचं तोच जाणू मात्र सुरूवात तर पठ्ठ्यानं जोरदार केलीय.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.