आता रेशन धान्याच्या दुकानात मिळणार कंडोम आणि सॅनिटरी पॅड !!

तुम्ही म्हणताल, काय पण फेकतोय राव भिडू. असं कुठं असतं व्हंय. इथं रेशनच्या दुकानावर घासलेट आणि बाकीचं अन्नधान्य घ्यायलाच आम्हाला नाकी नऊ येतेत. अन् आता तुम्ही सांगताय कंडोम ते पण रेशनच्या दुकानात. काय राव आम्ही खुळे हावोत व्हंय.

खुळेच हाईत तुम्ही. देशात काय घडतंया हिकडं तुमचं ध्यानच नाही. तुमचं महिन्यापास्न ह्यो मुख्यमंत्री होतो का त्यो उपमुख्यमंत्री होतो. त्यो पुन्हा आला अन् चार दिसात गेला. एवढंच सुरूय.

तर भिडूनो, आम्ही सांगतोय ते शंभर टक्के खऱं हाई. कारण तुम्हाला माहितच हाई आपलं सगळं काम वाचून, रिसर्च करून, शोधून असतंया. असं इथून तिथून उचलून आम्ही मांडत नसतोया. तर ह्यो मॅटर हाई आपल्या मुख्यमंत्री आदित्यनाथांच्या उत्तरप्रदेशचा.

कारण देशात सगळ्यात जास्त लोकसंख्या उत्तरप्रदेश राज्याची आहे. जवळपास 19 कोटी एवढी लोक तिथं राहत्यात. एवढ्या लोकांसाठी या राज्यात तब्बल 80 हजार रेशन धान्य दुकाने आहेत.

त्यामुळे लोकांना जागरूक करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने मागच्या आठवड्य़ात निर्णय घेतला. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानात गहु, तांदुळ, राँकेल या बरोबर कंडोम आणि सॅनिटरी पँड ठेवण्यात येणार आहेत.

अन्न नागरी पुरवठा विभागाचे आयुक्त मनीष चौहान यांनी सांगितलं की, राज्यात 80 हजार दुकानं आहेत. या माध्यमातून लोक जागरूक होतील. त्यामुळे सरकारने या गोष्टीला मान्यता दिलेली आहे. इथूनपुढे राशन दुकानात बाकीच्या अन्नधाऩ्यासोबत कंडोम, सैनेटरी पॅड, साबण, शॅम्पू, पेन या गोष्टी ठेवल्या जातील.

तसंच रेशनधान्य दुकानदारांची अनेक दिवसांपासूनची तक्रार होती की,

गहु, तांदुळ यापासून भेटणाऱ्या कमीशनमुळे घराचा खर्च सुद्धा भागत नाही. घर चालवायला आम्हांला अडचण येतेय.

या सगळ्यांचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं मनीष चौहान यांनी सांगितलं.

त्यामुळे, आयुक्तांनी सगळ्या जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागांना या बाबत आदेश दिले आहेत. तसंच FSSAI मान्यता प्राप्त असणाऱ्या कंपनीची वस्तुच या दुकानात विकली जायला हवी, असं सांगितलं आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या सर्व रेशन दुकानात या वस्तु विकल्या जाणार आहेत.

खरं तर लोकांना जागरूक करण्याच्या दृष्टीने सरकारने घेतलेला हा निर्णय अभिमानस्पद आहे. मात्र मेडीकलमधून कंडोम, किंवा सँनीटरी पॅड घेतांना कचाचणारे लोक रेशनधान्य दुकानातून या वस्तू खुल्या मनाने खरेदी करतील का हे आता पाहायला हवं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.