भाऊ शहीद झाला पण CRPF जवानांनी मिळून बहीणचं लग्न लावून दिलं

“सैनिक तेरे सहादत पर, पर्वत भी रोया होगा,

मां ने एक बेटा खोया होगा, तब देश चैन से सोया होगा।

पिता ने बेटा खोया, बेटे ने भी एक साया खोया होगा,

रक्षाबंधन भी अब सुना होगा, एक सुहागन ने भी सिंदूर धोया होगा,

सैनिक तेरे सहादत पर, बादल भी रोया होगा।”

कवी पंकज यांच्या कवितेच्या या ओळी. ज्या एका शहिद सैनिकांच्या कुटुंबाची व्यथा मांडतात. सैनिकांबद्दल आपल्याला नेहमीच सार्थ अभिमान वाटतो. आणि  का नसावा. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी ते स्वतःच्या कुटुंबाची आणि जबाबदाऱ्यांची कुठलीच पर्वा करत नाहीत.  आपल्या ड्युटीवर तैनात होताना तशी शपथचं त्यांनी जणू खाल्लेली असते.

पण जेव्हा देशासाठी ते शाहिद होतात तेव्हा त्यांच्यामागे त्यांच्या अनेक जबाबदाऱ्या पार पडायला कुणी नसत. असं काहीस चित्र होत शहिद  सीआरएफ शैलेंद्र प्रताप सिंह यांच्या घरी पाहायला तयार झालं होत. मात्र यावेळी सुद्धा आपले जवान धावून आले.  

झालं असं कि, उत्तर प्रदेशातील रायबरेली इथं राहणारे शैलेंद्र प्रताप सिंह सीआरपीएफच्या ११० व्या बटालियनमध्ये तैनात होते. त्यांची बटालियन जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे कार्यरत होती. मात्र ५ ऑक्टोबर २०२० ला दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील लेथपुरा भागात दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देताना शैलेंद्र शहीद झाले.

शैलेंद्रच्या कुटुंबात वडील नरेंद्र बहादूर सिंग, आई सिया दुलारी सिंग आणि पत्नी चांदनी यांच्याशिवाय तीन बहिणी आहेत. शैलेंद्रला ९ वर्षांचा मुलगाही आहे. दोन बहिणी आधीच विवाहित आहेत. आता सगळ्यात लहान बहिणीचे लग्न होते.

शैलेंद्र घरातील एकुलते एक, ज्यांच्यावर घराची जबादारी होती. गेल्या सोमवारी म्हणजे १३ डिसेंबरला रायबरेलीमध्ये  शैलेंद्र प्रताप सिंह यांची छोटी बहीण ज्योती सिंह हीच लग्न होत. पण भावानंतर लग्नात महत्वाची जबाबदारी पार पडायला कोणीच नव्हतं. लग्नाची तयार करताना घरच्यांना शैलेंद्र यांची खूप कमतरता जाणवली. शेलेंद्र आज असता तर आपल्या बहिणाला मांडवात सोबत घेऊन गेला असता, लग्नाच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या असत्या, या आठवणीने त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर व्हायचे. 

शेवटी लग्नाचा दिवस उजाडला, दिवसभर शैलेंद्रची कमतरता सगळ्यांनाच खालावली. शेवटी संध्याकाळी  जेव्हा नवरी बनलेल्या ज्योतीला मांडवात नेण्याची वेळ आली, तेव्हा मात्र अचानक सीआरपीएफचे काही जवान लग्नाला पोहोचले. शैलेंद्रच्या अनुपस्थितीनंतरही लष्कराचे जवळपास १२ ते १३ सैनिक तेथे पाहून आसपासच्या लोकांना आश्चर्य वाटले.

पण लग्नाचे विधी सुरू असताना या सर्व जवानांनी भावाची भूमिका बजावली. या जवानांनी नवरीच्या डोक्यावर फुलांची चादर धरून तिला मांडवात घेऊन गेले, हे पाहून तिथले सगळेचजण भावूक झाले. शहीद शैलेंद्र  यांच्या बहिणीच्या लग्नात या जवानांनी भावाप्रमाणे सगळ्या विधी पूर्ण केल्या. जवानांनी शैलेंद्रच्या बहिणीला आशीर्वाद सुद्धा दिला.

शैलेंद्रच्या वडिलांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले कि, “माझा मुलगा आज या जगात नाही, पण सीआरपीएफच्या या जवानांच्या रूपाने कितीतरी मुलं मिळाली, ते सर्वजण सुख-दु:खात आमच्या कुटुंबासोबत उभे आहेत.”

सीआरपीएफनेही आपल्या सैनिकांचं कौतुक केलंय. सीआरपीएफने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केलेल्या ट्विटमध्ये या जवानांना शैलेंद्रच्या बहिणीचे ‘ब्रदर्स फॉर लाइफ’ असं म्हंटलय.

सीआरपीएफच्या या कर्तव्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. युजर्स या फोटोंवर भावून अशा कमेंट करत या जवानांना सॅल्यूट करत आहेत.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.