देबाशिष मोहंतीची बॉलिंग स्टाईल १९९९ वर्ल्डकपचा लोगो ठरली होती

आजच्या क्रिकेट युगात बॉलींग डिपार्टमेंटला तितकं महत्व राहिलं नाहीए जितकं अगोदर होतं. आताच्या क्रिकेटमध्ये बरेच नियम हे बॅट्समनच्या फेवर मध्ये आहेत त्यामुळे गोलंदाजांना बऱ्याच अडचणी आहेत. पण हे काय आजच्याच पुरतं नाही तर अगोदरही होतं तेव्हा सनथ जयसूर्या, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा अशी दिग्गज मंडळी बॉलर लोकांची तुफ्फान धुलाई करायचे.

सनथ जयसूर्या मात्र तेव्हा त्याच्या ऐन भरात होता, समोर कोणीही बॉलर असो तो सगळ्यांनाच झोडून काढायचा. १९९७-९८ च्या काळात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. सीरिजच्या पहिल्याच मॅचला सनथ जयसूर्या आणि रोशन महानामा यांनी भारतीय बॉलिंग लाईन अप उध्वस्त करत ९५२ धावांचा डोंगर उभा केला. सनथ जयसूर्या ३४० आणि रोशन महानामाने २२५ धावा तडकावल्या. 

हा सामना अनिर्णयीत राहिला मात्र भारतीय संघाची अवस्था दारुण पराभवापेक्षाही वाईट झाली होती. या मॅचनंतर संघात मोठे बदल झाले.

यात नव्याने भरती झालेला ओडिसाचा एक खेळाडू होता नाव होतं देबाशिष मोहंती. यात इतके दिवस भारतीय बॉलिंगची पिसं काढणाऱ्या सनथ जयसूर्याला बाद करून देबाशिष मोहंतीने आपल्या आगमनाचं बिगुल वाजवलं होतं.

या मॅचमध्ये मोहंतीने आपल्या बॉलिंगची जादू दाखवत ७४ धावा देऊन ४ विकेट घेतल्या त्यात अरविंद डिसिल्व्हा, रोशन महानामा अशा बड्या खेळाडूंचा त्यात समावेश होता.

देबाशिष मोहंतीने ओडिशासारख्या भागातून येऊन अनेक तरुणांना प्रेरणा दिली. देबाशिष मोहंती हा असा खेळाडू होता ज्याच्या पदार्पणाच्या संपूर्ण ओडिसा राज्याला एक नवीन दिशा मिळाली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या देबाशिषला क्रिकेटचं वेड जबरदस्त होतं. सुरवातीला बॅट्समन म्हणून खेळणारा देबाशिष अचानक बॉलिंगकडे वळला आणि त्यात स्पेशालिस्ट झाला.

देबाशिष मोहंतीचं क्रिकेटचं वेड बघून त्याला त्याचे मित्र पागल म्हणायचे. १९९४ नंतर देबाशिष सगळ्यांच्याच नजरेत येऊ लागला होता. रणजी ट्रॉफीत त्याचं सिलेक्शन झाल्यावर देबाशिष मोहंतीने पहिल्याच सामन्यात ९ विकेट पटकावून आपली क्षमता दाखवून दिली. पहिल्याच मॅचमध्ये असीम कामगिरी केल्याने देबाशिषची चर्चा भारतीय संघात होऊ लागली. 

दिलीप ट्रॉफी आणि इंडिया ए संघातून खेळून मोहंतीची वर्णी भारतीय संघात लागली. दोन्ही बाजूने बॉल स्विंग करण्याची ताकद देबाशिषमध्ये होती. त्यावेळच्या भारतीय गोलंदाजांपैकी मोहंती एक वेगळा चॅप्टर म्हणून पुढे आला. १९९७ साली त्याचा श्रीलंकेविरुद्ध डेब्यू झाला. संपूर्ण कारकिर्दीत मोहंती फक्त एकच टेस्ट खेळू शकला. पण वनडे सामन्यांमध्ये त्याने आपल्या बॉलिंगने धुमाकूळ घातला होता.

वनडे मध्ये पाकिस्तानचा सचिन म्हणून फेमस असणाऱ्या सईद अन्वरला बाद करून त्याने चांगलीच हवा केली होती. त्या दौऱ्यावर सईद अनवरला मोहंतीने चांगलाच त्रास दिला आणि तिन्ही सामन्यात मोहंतीनेच त्याला बाद केलं. १९९८ साल मात्र मोहंतीसाठी वाईट ठरलं. त्याच्या कामगिरीवरून त्याला वर्ल्डकप संघात निवडणार नाही अशा बातम्या सुरु झाल्या होत्या. 

ऐन शेवटच्या वेळी मोहंतीची निवड वर्ल्डकप संघात झाली. वर्ल्डकप स्पर्धेत देबाशिषने १० विकेट मिळवल्या होत्या. भारताला सुपर सिक्स साठी क्वालिफाय करण्यात मोहंतीचा सिंहाचा वाटा होता. केनियाविरुद्ध ५६ धावा देऊन ४ विकेट मिळवल्या होत्या.

देबाशिष मोहंती १९९९ वर्ल्डकपचा सगळ्यात मोठा शोध मानला गेला.

त्याच्या युनिक बॉलिंग स्टाइलमुळे १९९९चा लोगो ठरवला गेला.

वर्ल्डकप मध्ये चांगली कामगिरी करूनसुद्धा मोहंती आपली जागा पक्की करू शकला नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने एका मॅचमध्ये १० विकेट घेऊन सगळ्यांना आश्चर्यचकित केलं होतं.

इतकं सगळं असूनही देबाशिषला फक्त ४५ वनडे खेळण्याची संधी मिळाली. जिथं एका बाजूला अजित आगरकरला ५ वेळेस कमबॅक करण्याची संधी दिली गेली तर देबाशिषकडे निवड समितीने परत लक्षच दिलं नाही. 

देबाशिष मोहंती हा ओडिसासाठी महेंद्रसिंग धोनी होता. एकदम दुर्गम भागातून आलेला देबाशिष मोहंती १९९९वर्ल्डकपच्या लोगोचा आयकॉन म्हणून ओळखला गेला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.