तुम्हाला माहित आहे का..? KBC तुम्ही घरबसल्या देखील खेळू शकता..

महाराष्ट्रात सध्या कोण होणार करोडपतीची हवा सुरूय. कोण होणार करोडपती म्हणलं की झटकन डोळ्यासमोर येतो तो निळा भव्य दिव्य सेट, गोलाकार रंगमंच, सूत्रसंचालकांचा रुबाब आणि समोर स्वप्न दाखवणारी हॉट सीट.

प्रत्येक सामान्य पण स्वप्नाळू माणसाचं एकदा तरी ती हॉट सीट गाठावी असं स्वप्न असतं. आणि सगळ्यांचे हॉट सीटपर्यंत पोहोचण्याचे आपापल्या पद्धतीने प्रयत्नही सुरूच असतात. शो सुरू असताना आमचे फादर तर हॉट सीटवरच्या स्पर्धकाच्या आधी बरोबर उत्तर देऊन मोकळे होतात आणि आमच्याकडे एक अभिमानाचा लूक टाकतात.

पण आता तुम्हाला, हेच ऑफिशियली करता येणारे…

म्हणजेच हा खेळ तुम्हाला आराम खुर्चीत बसून मोबाईलच्या एका क्लिकवर खेळता येणारे आणि घर बसल्या तुम्हाला त्यातून भारी भारी बक्षीसं मिळवता येणारेत..

असं कोणी सांगितलं तर?

कोणी कशाला, आम्हीच सांगतो की. तुम्हाला हे असं करता येणारे! बरं एवढंच नाही तर ही संधी तुम्हाला तुमच्या आरामखुर्चीतून उठवून डायरेक्ट तिकडल्या हॉट सीटवर सुद्धा नेऊन बसवू शकते बरं..

आता लय उत्सुकता ताणत नाय, डायरेक्ट मुद्द्यावर येते. तर मी बोलतेय ते, कोण होणार करोडपतीच्या प्ले अलॉंग क्विज गेम बद्दल.

हा गेम खेळून तुम्हाला आकर्षक बक्षीसं तर जिंकता येणारच आहेत शिवाय हॉट सीटवर येण्याची संधी मिळणारे. यासाठी नेमकं काय करायचं, गेम कसा खेळायचा वैगरे सगळं विस्कटून सांगते.

हा गेम खेळण्यासाठी तुम्हाला पहिले SonyLIV हे ॲप डाउनलोड करावं लागेल. SonyLIV हे ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर टाकून अकाऊंट रजिस्टर करावं लागेल, तुम्ही दीलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकला की तुम्ही रजिस्टर व्हाल.

तुम्ही ॲपमध्ये यशस्वीपणे लॉग इन झाला कि सर्च बॉक्स मध्ये ‘Kon honar’ असं टाकल्यावर खाली सचिन खेडेकर सरांचा फोटो असलेल बॅनर दिसेल. 

WhatsApp Image 2022 06 12 at 2.05.22 PM

त्यावर तुम्ही ‘Play Now’ हा पर्याय सिलेक्ट केला कि मग मग मोबाइल स्क्रीन व्यापलेली एक जांभळी विंडो ओपन होते, यावर तुमचं प्रोफाइल, भाषा निवड, तुम्ही किती पैसे कमावले याची माहिती, क्विज, गेम, किती बक्षीसं तुम्हाला मिळवायची आहेत याची माहिती, FAQs असे बरेच ऑप्शन्स दिसतील.

हा झाला प्ले अलॉंग खेळायचा पहिला ऑप्शन.

आता दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही ‘ kon honar’ असं सर्च न करता SonyLIVE ॲप च पेज खाली स्क्रोल करत गेला की Play along & Registration असा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून प्ले अलॉंग रजिस्ट्रेशन करू शकता.

WhatsApp Image 2022 06 12 at 2.05.23 PM

My Profile या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला तुमचं नाव, लिंग, राज्य आणि शहर या सगळ्या गोष्टी भराव्या लागतात. तुम्ही भरलेले डिटेल्स नंतर तुम्हाला पुन्हा बदलताही येऊ शकतात. तुमची माहिती भरल्याशिवाय तुम्हाला हा खेळ खेळायला सुरवात करता येत नाही. स्वतःची माहिती भरून झाल्यानंतर, एका पिवळ्या रंगाच्या बॉक्समध्ये ‘प्ले अलॉंग’ असं लिहिलेलं असेल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा.

आता हयात महत्वाचा भाग काय आहे तर हा गेम खेळायचा एक स्पेकिफिक टाइम आहे.

जेव्हा ‘कोण होणार करोडपती’ हा शो सुरू होतो म्हणजेच रात्री ९ वाजता तुम्हाला प्ले अलॉन्ग या पर्यायावर क्लिक करून, हॉटसीट स्पर्धकासोबतच हा गेम तुमच्या मोबाइलवर खेळता येतो आणि म्हणूनच गेमचं नाव प्ले अलॉंग असं आहे.

हॉट सीटवर असलेल्या स्पर्धकाने सोडवलेले प्रश्नच तुम्हाला तिथे दिसायला लागतील.

तुम्हाला दिलेल्या पर्यायांमधून एक पर्याय निवडून त्यावर क्लिक करून SUBMIT असं लिहिलेल्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. प्रत्येक बरोबर उत्तर तुम्हाला पॉईंट्स मिळवून देईल. जर तुम्ही उत्तर लॉक करायला दहा सेकंदांपेक्षा कमी वेळ लावला तर तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स कमावता येतात. FFF म्हणजेच फास्टेस्ट फिंगर फर्स्टची राऊंड खेळून तर तुम्हाला ५०० पॉईंट्स डायरेक्ट कमावता येतात

मोबाइलवर हा गेम खेळताना तुम्हाला 50-50 ही लाइफ लाइन सुद्धा वापरता येते.

प्रश्नाच्या वरती उजव्या बाजूला जे तुम्हाला धकधकनार हार्ट म्हणजेच हृदयाचं चिन्ह दिसतं ना तेच चिन्ह म्हणजे लाईफलाईन चा आयकॉन आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही लाईफलाईन वापरू शकता.

आता तुम्हाला मिळणारे पॉईंट्स मोजले कसे जातात तर, ते ठरतं तुम्ही कितव्या लेवलवर तो प्रश्न खेळताय आणि किती रुपयांसाठी खेळताय त्यावर. म्हणजे समजा हॉट सीट वरचा स्पर्धक 5000 रुपयांसाठी खेळत असेल तर तुम्हाला त्याच प्रश्नाचे 50 पॉईंट्स मिळतात.

प्ले अलॉंग खेळून तुम्हाला काय काय मिळवता येतं?

तर एकतर हॉटसीट वर जाऊन बसण्याची संधी, डेली कॅश प्राईझ, शोमध्ये प्रेक्षक म्हणून जाण्यासाठी पास, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टफोन आणि ब्लुटुथ स्पीकर जिंकण्याची संधी आणि इतर आकर्षक बक्षीसं..! तर मग आता वाट कशाची बघताय? पटापट SonyLIV ॲप डाउनलोड करा आणि नशीब काढा..!

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.