मोदींमुळे गुजराती पिक्चर ऑस्करला गेलाय का ?

भारताकडून ऑस्करला आरआरआर जाणार की काश्मीर फाईल्स ? यावरुन बरेच दिवस चर्चा रंगली होती. अनुराग कश्यप, विवेक अग्निहोत्री आणि बॉलिवूडमधल्या आणखी काही लोकांमध्ये ट्विटर वॉरही झालं. गेल्या काही महिन्यांपासून साऊथच्या पिक्चरला आलेलं वलय, त्यात खतरनाक ऍक्शन सिन, इंटरनॅशनल मार्केटमध्ये झालेली हवा यामुळं काही लोकांना आरआरआरचं पारडं जड वाटत होतं, तर काही लोकांना भारतात मिळालेली प्रसिद्धी आणि गंभीर विषयामुळं काश्मीर फाईल्सचं पारडं जड वाटत होतं.काश्मिर फाईल्स फॉर ऑस्कर असा ट्विटरवर ट्रेंडही होता…

पण या सगळ्यात भारताकडून ऑस्करला पिक्चर निवडला गेला, तो छेल्लो शो नावाचा एक गुजराती पिक्चर. कुठंच चर्चा नसताना, बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनवरुन चर्चा झालेली नसताना हा पिक्चर थेट ऑस्करला कसा काय गेला ? हा प्रश्न अनेकांना पडला. मागोमाग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजराती आहेत, त्यांच्यामुळेच छेल्लो शो हा गुजराती पिक्चर भारताकडून अधिकृतपणे ऑस्करला गेला, अशा चर्चा सुरू झाल्या..

पण हे खरय का? गुजराती सिनेमा असल्यामुळे छेल्लो शो ऑस्करला पोहचला का? भारताकडून ऑस्करला पाठवला जाणारा पिक्चर कशाच्या आधारे सिलेक्ट होतो ? आणि सिनेमा सिलेक्ट करणारी मंडळी असतात तरी कोण ? तेच समजून घेऊया

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.