कल्पना चावलांच्या अपघाती निधनासाठी आजही नासाला जबाबदार धरण्यात येते….

कल्पना चावला हे नाव काय आपल्याला नवीन नाही. शाळेच्या पाठयपुस्तकातून कल्पना चावला हे नाव परिचयाचं होतं गेलं. भारतात जन्म घेतलेल्या कल्पना चावलाने अवकाशात भरारी घेत अनेक विक्रम नोंदवले पण स्पेसशिपमध्ये गेलेली कल्पना चावला परत पृथ्वीवर परतू शकली नाही. स्पेसशिप मध्ये असतानाच स्पेसशिपचा स्फोट होऊन तिचं निधन झालं.

पण कल्पना चावलाचं ज्यावेळी निधन झालं त्यावेळी नासावर बरेच आरोप झाले होते, नासामुळे कल्पना चावलाचा मृत्यू झाला, स्पेसशिपमध्ये झालेला बिघाड हा नासाला ठाऊक होता पण त्यांनी जाणूनबुजून तो अंतराळवीरांना सांगितला नाही असे बरेच आरोप नासावर करण्यात आले होते. पण स्पेसशिपमध्ये झालेला बिघाड त्यानंतर कल्पनाचा मृत्यू आणि नासाने कल्पना चावला बद्दल केलेलं कर्तव्य याबद्दल जाणून घेऊया.     

हरियाणामधल्या कर्नाल शहरात जन्मलेल्या कल्पनाला लहानपणापासूनच आकाशाचं वेड होतं. चित्र काढताना ती कायम विमानाचं चित्र काढत असायची. पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर कल्पना अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेली. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्ससमध्ये शिक्षण घेतलं. वयाच्या २६ व्या वर्षी कल्पना चावलाचं स्वप्न पूर्ण झालं.

जगातली मोठी स्पेस एजन्सी मानली जाणाऱ्या नासामध्ये कल्पना चावलाला एंट्री मिळाली. १९९७ मध्ये कल्पना चावलाला तिचं पहिलं स्पेस मिशन मिळालं. स्पेस शटल कोलंबिया हे यान उडवण्याची संधी कल्पनाला मिळाली. २००० मध्ये दुसऱ्या स्पेस मिशनसाठी सुद्धा कल्पनाची निवड झाली. तिच्या दुसऱ्या स्पेस मिशनसाठी अजून ६ सहकारी तिच्यासोबत होते. 

पण टेक्निकल कारणास्तव मिशन हळूहळू लांबणीवर पडत गेलं. शेवटी १६ जानेवारी २००१ रोजी कल्पना चावलाला पुन्हा स्पेसशिपमध्ये जाण्याची संधी मिळाली. अवकाशात गेल्यावर कल्पना आणि तिच्या क्रू मेंबर्सने पृथ्वीचा आणि तिच्या आसपासच्या वातावरणाचा अभ्यास केला आणि विशेष माहिती घेतली.

पण ज्यावेळी हे स्पेस शटल अवकाशात जाणार होतं त्याच्या उड्डाणाआधीच त्यामध्ये काहीतरी बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

स्पेसशिपच्या बाहेरील भागातला एक महत्वाचा भाग तुटला गेला होता त्यामुळे काहीतरी अपघात होण्याची शक्यता होती मात्र नासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि टेक्निकल टीमने या गोष्टीची गंभीर दखल घेतली नव्हती.

आता ज्या स्पेसशिपमधून कल्पना चावला आणि इतर टीम जात होती ते यान बिघडलेलं होतं असं बऱ्याच वैज्ञानिक लोकांनी सांगितलं मात्र त्याकडे कुणी जास्त लक्ष दिलं नाही. ज्यावेळी कल्पना चावला आणि तिच्या टीमने अवकाशात झेप घेतली तेव्हा त्यांना या प्रकाराबद्दल काहीही माहिती नव्हतं. पुन्हा पृथीवर येण्याचा त्यांचा मार्ग इथूनच बंद झाला होता.

आजही नासाचे वैज्ञानिक सांगतात कि स्पेसशिपमधल्या लोकांना याची कल्पना द्यायला हवी होती जेणेकरून त्यांचा जीव वाचला असता. अवकाशात गेल्यावर संशोधन करून आणि तब्बल १६ दिवस स्पेसशिपमध्ये राहून त्यांनी पृथ्वीबाहेरील जीवनाचा अभ्यास केला. १६ दिवसानंतर ज्यावेळी पृथीवर परतायचा निर्णय घेतला तो जीवावर बेतणारा ठरला. 

मिशन पूर्ण झाल्यावर कल्पना चावला आणि तिच्या टीमने पृथीवर परतीचा प्रवास सुरु केला. पण पृथ्वीच्या वातावरणात परतण्याच्या दरम्यान विविध गॅसेस त्या बिघाड झालेल्या भागातून स्पेस शटलच्या आत शिरले त्यामुळे स्पेसशिपचं इंटर्नल स्ट्रक्चर कायमचंच बिघडून गेलं. त्यामुळे संपूर्ण स्पेस शटल अनस्टेबल होऊन सगळ्या शेप शटलचा स्फोट होऊन तुकडे तुकडे झाले.

हि घटना १ फेब्रुवारी २००३ रोजी घडली. स्पेस सायंटिस्ट कल्पना चावला आणि तिचे सहा सहकारी यात मारले गेले. या घटनेमुळे स्पेस शटलचे उड्डाणं पुढच्या दोन वर्षांपर्यंत थांबवण्यात आले होते. जगभरातून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली गेली. कल्पना चावला आणि तिच्या टीमला श्रद्धांजली वाहण्यात आली.

यानंतर नासाने कल्पना चावलाच्या नावाने अवकाशातील एका ऍस्टिरॉईडचं नामकरण करण्यात आलं. भारताच्या एका सॅटेलाईटला कल्पना चावलाचं नाव देण्यात आलं. न्यूयॉर्कच्या ७४ रस्त्याला कल्पना चावलाचं नाव देण्यात आलं. नासाने एका सुपर कॉम्प्युटरचं नाव सुद्धा कल्पना चावला असं ठेवलं. मंगळ ग्रहावरील एका टेकडीला कल्प्नजा चावलाचं नाव देण्यात आलं. 

पण इतका सन्मान करूनही नासाला दोषी ठरवण्यात आलं कारण कल्पना चावलाचा जीव गेला हे खूप मोठं नुकसान झालं होतं. नासाला उड्डाणाआधीच माहिती असलेला यांत्रिक बिघाड अंतराळवीरांचा जीव घेऊन गेला यामुळे नासाला बरीच मानहानी सहन करावी लागली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.