हर घर तिरंगा उपक्रम नेमका कसा साजरा केला जातोय
भारत यावर्षी ७७ वा स्वतंत्र दिवस साजरा करत आहे. दरवर्षी हा स्वतंत्र दिवस वेगवेगळे उपक्रम घेऊन साजरा केला जातो. भारत स्वतंत्र झाल्या पासून हा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरा करत आहोत. शासकीय कार्यालयं, शाळा, महाविद्यालयात आपण झेंडा वंदनासाठी हजर आसतो. पण, २०२२ पासुन प्रत्येकाच्य घरावरं तिरंगा ही मोहीम हर घर तिरंगा या शिर्षकाखाली चालु आहे. हे वर्ष या मोहीमेचं दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी लोकांनी आपल्या घरी तिरंगा झेंडा फडकावत अभिवादन केलं होतं. यावर्षीही अगदी त्याच पध्दतीने आपण आपल्या घरामध्ये झेंडावंदन करणार आहोत.
गेल्यार्षीप्रमाणे या वर्षीही सरकारची घरोघरी तिरंगा मोहीम सुरू आहे. ‘हर घर तिरंगा अभियाना’त सहभागी होण्याचे आवाहन सरकारने देशवासियांना केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी लोकांना त्यांचे तिरंग्यासह फोटो आणि व्हिडिओ हर घर तिरंगा वेबसाइटवर पोस्ट करण्यास सांगितले आहे. १३ ऑगस्टपासून सुरू झालेली ही मोहीम १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. विविधतेने नटलेल्या देशात जेव्हा निरनिराळी संस्कृती, पेहराव, भाषा बोलणारे लोक एकाच ध्वजाखाली एकच राष्ट्रगीत गातात, तेव्हा आपल्या एकात्मतेची आणि अखंडतेची भावना निर्माण होते. जर तुम्हीही तुमच्या घरात तिरंगा फडकवणार असाल तर तुम्हाला त्यासंबंधीचे नियम आणि कायदे माहित असले पाहिजेत. त्याच्या अपमानासाठी तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. भारत सरकारने तिरंगा फडकावण्याबाबत काही नियमही निश्चित केले आहेत. राष्ट्रध्वज तिरंग्याचा मान राखण्यासाठी या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘भारताचा ध्वज संहिता २००२ (भारतीय ध्वज संहिता) नावाच्या कायद्यात तिरंगा फडकवण्याचे नियम घालून दिले आहेत.
भारतीय ध्वज फडकवण्याचे नियम.
२००२ मध्ये भारत सरकारने भारतीय ध्वज संहिता लागू केली.. या संहितेत तिरंगा फडकवण आणि उतरवण या संदर्भात सामन्यांसाठी काही नियम नमूद करण्यात आले.. या नियमांनुसार, पहिलं म्हणजे ज्या ठिकाणी ध्वज फडकवला जाईल, ती जागा योग्य असावी. तिरंगा सर्वांना दिसेल अशी ती जागा असावी. दुसरं म्हणजे कोणताही ध्वज तिरंग्याच्या शेजारी लावायचा असेल, तर त्याची जागा तिरंग्याच्या खाली असली पाहिजे.
तिसरा नियम म्हणजे तिरंगा फडकवण्याच्या वेळेस बिगुलचा वापर करावा. तिरंगा कोणत्याही कारणामुळे कापला किंवा फाटला, तर तो नियमानुसार नष्ट करावा. चौथा नियम म्हणजे एखाद्या मंचावर ध्वजारोहण होत असेल, तर वक्त्याने समोर पाहावं आणि ध्वज उजवीकडे असायला हवा. पाचवा म्हणजे ध्वजाचा आकार आयताकृती असावा आणि त्याच्या लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर ३:२ अस असावं. तसेच ध्वजावरच्या अशोक चक्रामध्ये २४ आरे असण आवश्यक आहे.
साहवा तिरंग्याचा कोणत्याही प्रकारे जमिनीला स्पर्श होऊ देऊ नये आणि सातवा नियम म्हणजे २००२ मध्ये भारतीय ध्वज संहिता लागू होण्यापूर्वी, २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट रोजी सामान्य लोक तिरंगा फडकवत नव्हते. पण, आता नवीन नियमांमुळे कोणतीही व्यक्ती मर्यादित स्वरूपात केव्हाही तिरंगा फडकवू शकते.
भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरील डीपी बदलण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे.
याची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील स्वतःच्या फोटोच्या जागी तिरंगी झेंड्याचा फोटो लावुन केली आहे.
त्याच बरोबर hargarhtiranga.com या वेबसाइटवर तिरंग्यासह फोटो अपलोड करण्यास सांगितलं आहे. तुम्ही सर्वजण तुमचा सेल्फी या वेबसाइटवर अपलोड करू शकता. हर घर तिरंगा मोहिम ही २०२२ साली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेली मोहीम आहे. या वेबसाइटवर आतापर्यंत ७० लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे सेल्फी अपलोड केले आहेत. यावर्षी या वेबसइटवर फोटो आपलोड करण्याची विनंती भारत सराकारने केली आहे.
हा सेल्फी अपलोड कसा करायचा..
सगळ्यात पहिले harghartiranga.com या वेबसाईटवर जावं लागेल. तिथे तुम्हाला होमपेजवर अपलोड सेल्फी विथ फ्लॅगचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावं लागेल.आता एक पॉपअप तुम्हाला दाखवेल. त्यावर तुमचे नाव लिहा आणि सेल्फी अपलोड करा.
सेल्फी अपलोड करण्यासाठी तुम्हाला ‘hargartiranga.com’ वेबसाइटवर तुमचं नाव आणि फोटो वापरण्यासाठी तुमची संमती द्यावी लागेल. त्यानंतरच तुम्ही तुमचा सेल्फी सबमिट करू शकाल. सेल्फी सबमिट केल्यानंतर, नावाच्या मदतीने तुम्ही तुमचा सेल्फी वेबसाइटवर देखील शोधू शकता. जर काही कारणास्तव तुम्हाला सेल्फी दिसत नसेल तर तुम्हाला तो १६ ऑगस्टनंतर पाहता येऊ शकतो.
आणि या हर घर तिरंगा उपक्रमात जर तुम्ही सहभाग घेतला तर तुम्हाला त्यासाठी प्रमाणपत्रही मिळणार आहे. या सगळ्या उपक्रमाचा उद्देष म्हणजे प्रत्येक भारतीय नागरीकांनां ध्वजाच्या प्रति असलेला आदर त्याचबरोबर त्यांचं महत्त्व काय आसणार आहे? हे सर्व सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
गेल्या वर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाला अधिक पसंती मिळाली आहे. भारतातील प्रत्येक राज्यातील घराघरात हि मोहीम पोहचवण्याचा सरकारचा उद्देष आहे. आणि तोच उद्देश्य डोळ्यासमोर ठेऊन गेल्या वर्षी पासून प्रत्येक जण घरोघरी ध्वजारोहण करत आहेत.
हे ही वाच भिडू:
- घर-घर तिरंगा फडकवण्याचा अधिकार देणारे मोदी नव्हते तर काँग्रेसचा हा खासदार होता..
- ब्रिटिश सत्तेत या क्रांतिकारकांनी छत्रपतींच्या गडावर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम गाजवला …
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.