राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी CIA ने पाच वर्षांपूर्वीच भविष्य सांगितलं होते…

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी नलिनी श्रीहरण, आरपी रविचंद्रन यांची सुटका करण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

सुटका करण्यात आलेली दोषी महिला नलिनी सध्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे. याआधी मद्रास उच्च न्यायालयाने दोषी नलिनीची सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. त्यानंतर नलिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

याआधी राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी एजी पेरारिवालन याची १८ मे रोजी सुटका करण्यात होती. पेरारिवालन याने राजीव गांधींच्या हत्याप्रकरणात ३० वर्षे शिक्षा भोगलेली आहे. त्याने संविधानातील कलम १४२ चा आधार घेत आपल्या सुटकेची मागणी केली होती.

दोषी नलिनीने पेरारिवालनच्या बाबातीत घेण्यात आलेल्या याच निर्णयाचा दाखला देत माझीही सुटका करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार नलिनी श्रीहरण, आरपी रविचंद्रन यांची सुटका केली आहे. 

या सगळ्यात चर्चा होतीये ती राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी ५ वर्ष अगोदरच CIA ने शक्यता वर्तवली होती. 

२१ मे १९९१ रोजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील श्रीपेरमबदूर येथे हत्या केली होती. त्यापूर्वी अमेरिकेची  CIA या गुप्तचर संस्थेने एक अहवाल तयार केला होता. तो अहवाल २०१७ मध्ये सार्वजनिक करण्यात आला होता. त्यात राजीव गांधी यांच्या हत्ये संदर्भातील अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. CIA च्या वतीने सादर करण्यात आलेल्या अहवालात अनेक राजीव गांधी यांच्या हत्येमुळे दोन देशातील राजनैतिक संबंध कसे राहतील हे सुद्धा सांगितलं होत. 

इंडिया फ्टर राजीव नावाचा अहवाल CIA संस्थेने तयार केला होता. 

जानेवारी १९८६ ला CIA ला मिळालेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला होता. यात राजीव गांधी यांचा १९८९ पूर्वी कार्यकाळ संपण्यापूर्वी हत्या करण्यात येईल असा उल्लेख करण्यात आला होता. 

या अहवाल तयार झाल्यानंतर ५ वर्षांनी राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. या अहवाल की जजमेंट नावाचा एक विषय होता. राजीव गांधी अचानकपणे सत्तेतून बाहेर पडले तर देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारणात काय बदल घडू शकतो याची शक्यता वर्तवली होती. तसेच याचा भारत अमेरिका, भारत रशिया तेव्हाचा युएसएसआर आणि इतर देशांसोबत कशा प्रकारचे संबंध राहतील हे सुद्धा नमूद केलं होत.

CIA च्या अहवाला नुसार राजीव गांधी यांची हत्या काश्मीरी मुस्लिम किंवा शीख व्यक्तींकडून हत्या होऊ शकते. त्यासाठी राजीव गांधी यांना तगडी सुरक्षा पुरवण्यात यावी. उत्तर भारतात लष्करची सुरक्षा त्यांना दिली जावी असे नमूद करण्यात आले होते. तसेच दंगल होण्याची शक्यता वर्तवली होती. 

तसेच या अहवालात माजी पंतप्रधान पी व्ही नरसिम्हा राव, व्ही. पी. सिंह यांचा देखील उल्लेख होता. याच कारण म्हणजे राजीव गांधी यांच्यानंतर हे दोघे त्यांचे स्थान घेतील  त्यामुळे त्यांची हत्या होईल असे सांगण्यात आले होते. महत्वाचं म्हणजे CIA च्या अहवाला प्रमाणे राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ मध्ये नरसिम्हा राव पंतप्रधान झाले.  

‘द थ्रेट ऑफ अ‍ॅसॅसिनेशन: स्टॅबिलिटी इन जियोपार्डी’ या शीर्षकाखाली अहवालात म्हटले आहे की, पुढील काही वर्षांत भारतात पंतप्रधानांची खून  होण्याची दाट शक्यता आहे. राजीव गांधी यांना लक्ष केले आहे.  

CIA अहवाल सार्वजनिक करतांना त्यातून काही भाग वगळण्यात आला.

अहवालाचे काही पाने समोर आणली नव्हती. त्यामुळे  श्रीलंकेच्या तमिळ अतिरेक्यांचा उल्लेख आहे की नाही हे अस्पष्ट आहे. तर अहवालात काही ठिकाणी श्रीलंकन ​​तमिळ आणि सिंहली-बहुल श्रीलंकन ​​सरकारमधील मतभेद दूर करण्यासाठी राजीव यांच्या प्रयत्नांचा उल्लेख आहे.

तसेच राजीव गांधी काही कारणामुळे सक्रिय राजकारणातून माघार घेण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली होती. अहवालानुसार, राजीव गांधी यांच्या कार्यकाळात त्यांची हत्या होण्याची शक्यता जास्त असली तरी, इतर कारणामुळे ते १९८९ पूर्वी राजकारणातून बाहेर पडतील अशी शक्यता वर्तवली होती. 

तसेच राजीव गांधी यांना सत्तेतून बाहेर काढल्यानंत त्यांच्या कुटुंबियावर हल्ला घडवला जाऊ शकतो असं सुद्धा यात नमूद केलं होत. सीआयएने आपल्या अहवालात म्हटले होते की, आम्हाला विश्वास आहे की राजीव यांच्या हत्येमुळे भारत अमेरिकन हितसंबंधांची हानी होईल. राजीव गांधींच्या हत्येमुळे देशांतर्गत राजकारणात बदल घडून येतील. त्याचा परिणाम दोन्ही देशांवर होतील. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने मात्र राजीव गांधी यांच्या हत्येवरून देशात लष्करी उठाव होण्याची शक्यता फेटाळून लावली होती. 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.