कुपोषण कमी करण्यासाठी मोदींनी मांडलेली फोर्टिफाइड राईसची संकल्पना काय आहे ?

भारतात अजूनही महिला आणि बालकांच्या शरीरात पोषक तत्त्वे कमी आढळून येतात. त्यामुळे कुपोषणचे प्रमाणपण अधिक आहे. २०१९ मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेत महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यात देखील कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे असल्याचे दिसून आले होते.

मोदी सरकारच्या पहिल्या टर्मला अनुसरून २०१९ मध्ये हा सर्वे करण्यात आला होता. देशात स्वच्छता, पिण्याचे पाणी यात सुधारणा झाली आहे. मात्र अजूनही कुपोषणाचे समस्या मोठी आहे. २०१७ मध्ये केंद्र सरकारने पोषण योजना सुरु केली होती. मात्र, ती पूर्ण तयारीनीशी करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते.

नॅशनल हेल्थ सर्वे-५ यातून भारतातील कुपोषणा बाबतची परिस्थिती समोर आली होती. कोरोना नंतर त्यात अधिक भर पडल्याचे दिसून येत आहे.

कुपोषण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोर्टिफाइड राईसची संकल्पना मांडली आहे. काय आहे फोर्टिफाइड, त्यामुळे काय फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

७५ व्या स्वातंत्र्य दिवसा निम्मित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनी फोर्टिफाइड राइसची संकल्पना सांगितली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, सरकार आपल्या वेगवेगळ्या योजनेंतर्गत गरिबांना तांदुळ देते. आता त्याला फोर्टिफाइड करण्यात येणार. यामुळे गरिबांना पोष्टिक तांदुळ मिळेल.

रेशन दुकान, मध्यान्ह जेवणात दिला जाणार तांदुळ असो. २०२४ पर्यंत प्रत्येक योजनेत दिला जाणार तांदुळ हा  फोर्टिफाइड असणार असल्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

फोर्टिफाइड राइस म्हणजे काय

फोर्टिफाइड म्हणजे तांदळात सुक्ष्म पोषक घटक जोडण्याची प्रतिक्रिया. आहारातील गरजा लक्षात घेऊन सूक्ष्म पोषक जोडण्यात येते. तांदुळ फोर्टिफाइड करण्यासाठी विविध तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

सध्या भारतात फोर्टिफाइडसाठी एक्सट्रूझन’ हे सर्वोत्तम तंत्रज्ञान मानले जाते. यात एक्सट्रूडर मशीनचा वापर करून फोर्टिफाइड तांदुळ तयार करण्यात येतो.

तांदळात पोषक घटक असणार आहे.

फोर्टिफाइड तांदळामध्ये लोह, व्हीटॅमीन-ए, व्हीटॅमीन-बी, फॉलिक असिडचे प्रमाण प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्याचे पोषणमूल्य वाढते. यामुळे कुपोषण दूर करणे देखील शक्य होते. यामुळेच कुपोषणाची समस्या कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवणात फोर्टिफाइड तांदुळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा वापर वाढविल्याने मुलांच्या महिलांचा आरोग्यासाठी फायदा होणार आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, भारतीयांच्या अन्नात पोषण घटकांची वाढ करणे गरजेचे आहे. त्या अनुसरुनचं हा निर्णय घेतला आहे.

त्याचे फायदे काय आहेत

फोर्टिफाइड तांदूळ खाण्याबरोबर ते औषध म्हणून सुद्धा उपयोगी आहे. यात असणाऱ्या पोषक तत्त्वामुळे  कुपोषणावर मात करता येऊ शकते. अशा विश्वास बोलून दाखविण्यात येत आहे.

प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र, गुजरात या राज्यात फोर्टिफाइड तांदूळ रेशनवर देण्यात येत आहे. जून २०२१ पर्यंत २.३ लाख टन फोर्टिफाइड तांदूळ वाटप करण्यात आल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, ओडिशा, गुजरात, उत्तरप्रदेश, आसाम, तामिळनाडू, तेलंगणा, पंजाब, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, आणि मध्यप्रदेश या राज्यात सप्टेंबर महिन्यात हि योजना सुरु करण्यात येणार आहे. 

२०२४ पर्यंत संपूर्ण भारतात हा तांदूळ विविध योजनेंतर्गत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.  सरकार या योजनेची अंमलबजावणी कशी करते यावर सर्व अवलंबून आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.