पोटावर तोफगोळे मारून घेणाऱ्या या भिडूचा स्वॅगच वेगळा होता.

खतरो के खिलाडी म्हंटल की, तुमच्या डोळ्यासमोर काय येत ?

khatron ke khiladi 1988 hin 20200518124629 2427

आईईईई गगगगं….हा खतरो के खिलाडी नाही ओ.

ते नाही का टीव्ही वर एक शो येतो. पहिलं त्यात अक्षय कुमार होता आणि आता रोहित शेट्टी असतो. खूप सारे भीतीदायक टास्क असतात त्याच्यात. किडे, वीण चू, साप, हेलिकॉप्टर, समुद्र असल्या सगळ्या गोष्टी. आता आठवलं असेल तर तेच ते. तर ते बघून आपल्याला वाटत काय. आयला काय भारी माणसं आहेत. कसल्या उड्या मारतात पटदिशी समुद्रात, कसले भारी टास्क करतात.

हे झालं टीव्हीवरच. पण भिडूंनो आज तुम्हाला, हे जे खतरो के खिलाडी आहेत ना त्यांच्या बापाची गोष्ट सांगणाराय. या बापाचं नाव आहे फ्रॅंक रिचर्ड्स. पण ते बघण्याआधी…

टीव्ही शो, न्यूजपेपर किंवा मग तुमच्या आजूबाजूला अशा अनेक लोकांबद्दल तुम्ही पाहिल किंवा वाचल असेल की काही लोकांची शारीरिक क्षमता सामान्य माणसापेक्षा खूप जास्त असते. त्यांच्यामध्ये असे काही लोक आहेत ज्यांनी आपल्या ताकदीच्या जोरावर जगाला अचंब्यात टाकण्याचं काम केलयं.

यात मग मलेशियाच्या रथकृष्णन वेळुंनी दाताने ट्रेन ओढली. तर क्वालालंपूरमधील एक शाओलिन साधू झाओ रुई यांनी त्यांच्या कपाळावर एक मिनिट ड्रिलिंग मशीन चालवली आणि त्यांना काहीच झालं नाही.

तुम्हाला जगात असे अनेक अजब लोक भेटतील. पण या सगळ्यांत एक खूपच अजब माणूस होता ज्याची ताकद या सर्वांपेक्षा जास्त आहे. हा फ्रॅंक नावाचा भिडू आपल्या पोटाने तोफेतून निघणारे तोफगोळे थांबवायचा.

या फ्रँकचा जन्म अमेरिकेतला. १८८७ चा. वडिलांचं नाव रिचर्ड जोन्स रिचर्ड. आणि आईच नाव एलेन एलिझाबेथ रिचर्ड्स. फ्रॅंकला लहानपणीच वाटलं होत कि त्याच्या पोटात काहीतरी अजब अशी शक्ती आहे. लहानपणी खेळताना त्याच्या पोटाला काहीजरी लागलं तरी त्याला अजिबातच त्रास व्हायचा नाही.

पुढं जसजसा तो वयानं मोठा होत गेला त्याची ताकद वाढतच गेली. त्याने अमेरिकेत होणाऱ्या कार्निव्हल्स मध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. आता हे कार्निव्हल्स म्हणजे एक प्रकारचे सर्कसच होते. असं म्हंटल जात की, फ्रॅंक या कार्निव्हल्स मध्ये सहभागी व्हायच्या आधी पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून सुद्धा काम केलं होत.

पण हा फ्रॅंक पहिल्यांदा प्रकाशझोतात आला तो म्हणजे, १९२४ च्या एका कार्निव्हल शोमुळे. Vaudeville हा एक थियेटरचा प्रकार असतो. त्यात फ्रॅंक सहभागी झाला. त्याने यात तो आपल्या पोटावर किती मार सहन करू शकतो हे दाखवलं. 

झालं…भिडू फेमस झाला.  

त्याने या शो मध्ये लोकांना हातोड्याने त्याच्या पोटावर मारायला सांगितलं. पण त्याला काही झालं नाही. पुढं त्याने लोकांना त्याच्या पोटावर नाचायला सांगितलं. लोकांनी येऊन त्याला कचाकच तुडवलं. त्याच्या पोटावर उड्या मारल्या. पण तरी सुद्धा त्याला काही नाही झालं.

या शोमध्ये त्याच्या पोटावर नाचून लोकांना मज्जा तर आलीच, पण लोक हैराण सुद्धा झाले की हा माणूस असा कसा अजब आहे. 

या फ्रॅंकने आपल्या पोटावर मारून घ्यायचे प्रयोग सुरूच ठेवले. आणि त्यानंतर असा एक प्रयोग केला ज्याचा रेकॉर्ड झाला. या पट्ठ्याने एका कार्यक्रमात जवळजवळ ४७ किलो म्हणजे १०४ पौंड लोखंडी गोळा तोफेच्या साह्याने आपल्या पोटावर मारून घेतला. हे बघून लोकांनी आ वासला ओ. फ्रॅंकचं सोडा तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक यायची वेळ आली.

जेव्हा फ्रॅंक त्या तोफेसमोर उभा राहिला होता, लोकांना वाटलं हा गेला. पण फ्रॅंकला गोळा लागला. फ्रँक धाडदिशी जमिनीवरती पडला. आणि परत उठून उभारला. परत परत त्याने तीच कृती केली. आणि त्याच्या या कृतीचा परिणाम जगात सगळीकडे त्याचा बोलबाला झाला. 

या खतरनाक शो नंतर या शो मॅनला नाव मिळालं Frank “Cannonball” Richards. ८१ वयवर्षात त्याचा मृत्य झाला. त्याच शव कॅलिफोर्नियातल्या पमोना सिमेट्री इथं दफन केलंय. फ्रॅंक गेला मात्र त्याच्या सारखा अजून कोणीच जन्माला नाही आला. त्यामुळं पोटावर तोफगोळे झेलणारा हा एकमेवच. आणि इतिहासात त्याच नाव अजरामर झालंय.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.