वीरप्पन नंतरच्या सगळ्यात मोठ्या डाकुचा शेवटी खेळ खल्लास झालाय

उत्तर प्रदेशातील मोस्ट वाँटेड गुन्हेगारांपैकी एक असणाऱ्या डाकू गौरी यादवला शनिवारी सकाळी पोलिसांनी चकमकीत ठार केले. असे म्हंटले जाते कि, डाकू वीरपन्ननंतर हा दुसरा मोस्ट वॉन्टेड डाकू होता. त्याच्या उचापातींना फक्त उत्तर प्रदेशचं नाही तर मध्य प्रदेश सरकारही वैतागलं होत. 

ज्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने गौरी यादववर पाच लाख तर मध्य प्रदेश सरकारने पन्नास हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.

असं म्हंटल जात कि, काही कुख्यात डाकूंच्या हत्येनंतर गौरी हा शेवटचा मोठा डाकू होता, ज्याची या जंगली भागात सर्वात जास्त दहशत होती.

एडीजी अमिताभ यश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३.३० वाजता चित्रकूट जिल्ह्यातील मुधाबंद गावाजवळील जंगलात गौरी यादव चकमकीत मारला गेला. गौरी आणि त्याची टोळी तिथे रात्र घालवत होती.

पोलिस तेथे पोहोचल्यानंतर जोरदार गोळीबार झाला, पोलीस आणि गौरी यादवच्या टोळीत चकमक झाली. यावेळी त्याचे काही साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले पण गौरी यादव पोलिसांच्या हातून मारला गेला. 

यांनतर पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून एक AK-४७, एक जुन्या मॉडेलची क्लाशनिकोव्ह सेमी-ऑटोमॅटिक रायफल आणि १२ बोअरची बंदूक, दोन देशी बनावटीची पिस्तूल आणि अनेक जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

गौरी यादवने २००१ मध्ये गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. त्यादरम्यान त्याने दरोडेखोर गोप्पासोबत मिळून टोळी चालवली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौरीला २००८  मध्ये एसटीएफने पकडले होते आणि तुरुंगात पाठवले होते. मात्र दोन वर्षानंतर त्याची सुटका करण्यात आली.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांनी गौरी यादवला गुप्तचर म्हणून शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्याच प्रशिक्षणाचा फायदा घेत गौरी यादव स्वतःला वाचवायचा.

जेलमधून बाहेर पडल्यानंतर गौरी यादवची दहशत आणखीचं वाढली. गौरी यादववर ६० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचं समजते. ज्यात दिल्लीतील पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याचाही आरोप आहे. सोबतच खून, अपहरण, खंडणी आदी प्रकरणांचा समावेश होता.

 गौरी यादवविरुद्ध उत्तर प्रदेश व्यतिरिक्त मध्य प्रदेशातही गुन्हे दाखल आहेत.

२०१७ मध्ये गौरी यादवच्या टोळीतील लोकांनी चित्रकूटमधील कुल्हुआच्या जंगलात त्यांच्या प्रतिस्पर्धी टोळीतील तीन जणांना जिवंत जाळलं होतं. यानंतर उत्तर प्रदेशचे डीजीपी जावेद अहमद यांनी गौरी यादववर एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते, ही रक्कम नुकताच वाढवून साडेपाच लाख करण्यात आली.

चित्रकूट-बांदा परिसरात दादुआ लुटारूंचा धाक असायचा. दादुआ, ज्याचं खरं नाव  शिवकुमार पटेल होतं, त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी आठ जणांची हत्या केली आणि चित्रकूट जिल्ह्यातील देवकाली गावातून पळ काढला.

दादुआबद्दल व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्याच्यावर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये ४०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दादूवर १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. १९७५ मध्ये सुरू झालेला हा दहशतीचा खेळ जवळपास ३२ वर्षे या भागात सुरू होता. मात्र दादुआला पोलिस पकडू शकले नव्हते.

पन २००७ मध्ये, एसटीएफच्या पथकाने चित्रकूट जिल्ह्यातील मानकपूर येथे दादुआला घेराव घालून ठार मारण्यात यश मिळविले.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.