१२००० रुपयांचं बक्षीस डोक्यावर असणाऱ्या डाकूनं थेट देशाच्या पंतप्रधानांनाच धमकावलं होत

डाकू म्हंटल कि, आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो काळे कपडे, कपाळाला भला मोठा टिळा, लांबलचक दाढी – केस, हातात बांधून आणि कंबरेला बंदुकीच्या गोळ्यांची माळ घातलेली खतरनाक माणूस. तसं म्हणायला आपल्याइथं बऱ्याच महिला डाकूही होऊन गेल्यात.

म्हणजे काय तर डाकू म्हंटल कि, प्रत्येकाचीच हातभार फाटते. कारण लहानपणापासूनच आपल्या घरच्यांनी काहींना काही कारणांनी त्यांची भीती घातलेली असते. दरोडे, अपहरण, धमकी, मर्डर ह्या आपल्या व्यवसायानं त्यांनी पोलिसांसोबत सामान्य लोकांचीही डोकेदुखी वाढवलेली असते. 

मात्र, एक डाकू असाही आहे, ज्याला अख्ख जग कुख्यात दरोडेखोर आणि चोर म्हणायचे पण गरीबांसाठी तो मसीहा होता. नाम है –

डाकू सुंदर गुर्जर दुजाना

उत्तर प्रदेशात राहणार हा डाकू आधी आर्मीत होता, पण कौटुंबिक भांडणांमुळे त्याला डाकू बनणं भाग पडलं, त्यानंतर त्याने सलग २३ वर्षे आसपासच्या भागात आपला दबदबा निर्माण केला होता.

असं म्हणतात कि, जेव्हा सुंदर सैन्याची नोकरी सोडून गावात आला होत त्याच एकच मिशन होत, ते म्हणेज  तिथल्या शाळेतला भ्रष्ट्राचार संपवणं. त्यावेळी शाळा व्यवस्थापनाविरोधात रोज भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत होत्या. याच गोष्टीमुळे तो व्यवस्थापनावर नाराज होता. हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी त्याने कायदा आपल्या हातात घेतला.

दुसऱ्या दिवशी गावकरी जेव्हा शाळेत गेले, तेव्हा शाळेच्या भिंती रक्ताने भरलेल्या होत्या. तिथूनच त्याच्या गुन्हेगारी जगताला सुरुवात झाली.

त्याच्या दबंगगिरीबद्दल असेही म्हटले जाते की,  त्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आता थेट पंतप्रधानांना धमकी दिली म्हंटल्यावर सगळेच कामाला लागले. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिस त्याच्या मागावर लागले. त्याला अनेकदा घेरलं गेलं. पण प्रत्येकवेळी तो पोलिसांच्या हातावर तूरी देऊन फरार झाला.  

त्याचा असाच एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. जेव्हा पोलिसांनी दुजानाला पकडण्यासाठी गावाला चारही बाजूंनी घेरले होते, तेव्हा सुंदर गुर्जरने आत्मसमर्पण करण्यापूर्वी मंदिरात पूजा करण्याची अट घातली, जी पोलिसांनी स्वीकारली. इकडं पोलीस त्याची पूजा संपण्याची वाट बघत होते, पण सुंदर गुर्जर हजारो पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून पळून गेला होता.

सुंदर डाकूनं यानंतर एकामागून एक अनेक गुन्हे केले. त्याच्या मनाविरुद्व वागणाऱ्याची तो हत्या करायला पुढे मागे पाहत नसायचा. एका महिन्यात ५- हत्या आणि दरोडे त्याच्या नावावर होते.  त्याने प्रशासनाच्या नाकात एक दम केला होता.  ज्यामुळे त्याच्या डोक्यावर १२,००० रुपयांचे बक्षीस होते. फार चाहे वो जिंदा हो या मुर्दा.

सगळीकडं धुमाकूळ घालणाऱ्या अश्या या डाकून पोलिसांना सुद्धा सोडलं नव्हतं. त्याच्यावर अनेक पोलीस अधिकाऱ्यांना मारण्याचा देखील आरोप होता. दरम्यान या सुदंर डाकून जिवंत असताना पोलिसांची नाकी नऊ केलीच होती, मात्र मेल्या नंतरही त्याने पोलिसांचे जीवन आणखीनच अवघड करून सोडले होते.

१९७६ च ते सालं सुंदर डाकू पोलिसांच्या रिमांडमध्ये होता. कोर्ट-कचेऱ्या सुरु होत्या. दरम्यान एक दिवस सकाळी अचानक रेडिओवर पेपरात बातमी येते कि,

‘यमुनेत बुडून सुंदर डाकुचा मृत्यू’

पण सुदंर डाकूच्या या मृत्यनं सगळ्या पोलीस खात्यावर आणि सरकारवर संशयाची टांगती तलवार उभी केली होती. कारण सुंदर डाकुचा मृतदेह यमुनेच्या काठावर संशयास्पद स्थितीत आंधळला होता. ते हि हातात हातकडी असलेला.  

त्यावेळी माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरलं. पोलीस कोठडीत असूनही हातकड्या घालूनही यमुनेत बुडून त्याचा अचानक मृत्यू कसा झाला? अश्या अनेक प्रशांत पोलिसांना समोर जावं लागलं होत. हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं. ज्यामुळं दिल्लीचे दोन आयपीएस प्रीतम सिंह भिंदर आणि पोलीस अधीक्षक गुरु चरण सिंह संधू यांच्यासोबत १३ दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांना कित्येक महिने तिहार जेलमध्ये राहायला लागलं होत.

हा, नंतर सर्व आरोपी पोलिसांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली खरी. पण खाकी वर्दीवर लागलेला कलंक कधीही न पुसणारा होता. या डाकूनं जिवंत होता तेव्हाही पोलिसांचे हाल केले , आणि मेल्यानंतही. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.