गांगुली वैतागून म्हणाला होता, सेहवागला कितीही समजावलं तरी तो स्वतःच्याच धुंदीत खेळायचा….

सौरव गांगुली भारताच्या महान कर्णधारांपैकी एक. गांगुलीच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडूंनी आपली क्षमता दाखवून दिली आणि संघाला विजय मिळवून दिलेत. याच खेळाडूंपैकी एक होता गोलंदाजांचा कर्दनकाळ वीरेंद्र सेहवाग. आजचा किस्सा आहे लॉर्ड्सवरच्या एका मॅचचा ज्यात सेहवागने गांगुलीचं डोकं फिरवलं होतं. जाणून घेऊया तो किस्सा काय आहे.

लॉर्ड्सवर ३२५ धावांचा पाठलाग भारतीय संघ करत होता. त्यावेळी सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग हे भारताचे सलामीवीर म्हणून खेळत होते. गांगुलीने सेहवागला सांगितलं कि,

वीरू ३२५ धावांचा पाठलाग करायचा आहे, आधीच आपण दोन तीन फायनल हरलोय यावेळी काहीतरी खतरनाक आपल्याला करायचं आहे.

सेहवाग शांत होता, लॉर्ड्सच्या लॉंगरूमच्या जवळून पायऱ्यांवरून उतरताना सेहवाग गांगुलीला म्हणाला दादा आपण हि मॅच जिंकणार आहोत. हे ऐकून गांगुलीचा पारा चढला आणि तो सेहवागला म्हणाला अरे दोन तीन फायनलमध्ये शून्यावर आउट झालायस आणि हि मॅच जिंकणार आहेस म्हणतोय.

मॅच सुरु झाली आणि सुरवातीच्या ओव्हरमध्ये गांगुली सेहवाग जोडीने जबरदस्त भागीदारी रचली. १० ओव्हर्समध्ये एकही विकेट न गमावता भारताने ६० धावा बनवल्या होत्या. तेव्हा गांगुली सेहवागला जाऊन म्हणाला हे बघ वीरू आपली सुरवात चांगली झालीय,

हि मॅच आपण आपल्या बाजूने फिरवू शकतो आणि ३२५ धावा चेस शकतो, तू फक्त आउट होऊ नकोस. सेहवागने हो म्हणून संमती दर्शवली.

रॉनी इराणी बॉलिंगला आला. ओव्हरमध्ये  होणार होता. इराणींच्या पहिल्याच चेंडूवर सेहवागने मिडॉनवरून हवेत शॉट मारला, बॉल बॉण्ड्रीपार गेला.

सेहवागच्या खेळण्याचा जोश बघून गांगुली सेहवागजवळ गेला आणि त्याला म्हणाला वीरू पहिल्याच बॉलवर चौकार मिळालाय, सिंगल सिंगल धावा काढून आपण ओव्हरला ८-९ रन बनवू शकतो, आणि रनरेट व्यवस्थित राहून आपण मॅच जिंकण्याचे चान्सेस वाढवू शकतो. वीरू म्हणाला हा दादा चिंता करू नको. आणि पुढच्याच बॉलवर सेहवागने मिडऑफवर चौकार लगावला. 

गांगुली पुन्हा सेहवागजवळ बॅट टॅप करत गेला आणि म्हणाला हे बघ वीरू आठ रन झालेत सिंगल सिंगल खेळत रहा. विरूने पुन्हा होकार दाखवला. पुढच्या चेंडूवर सेहवागने इराणीला स्वीप मारला, जर हा बॉल हुकला असता तर थेट एलबीडब्ल्यू विकेट होती.

मग गांगुली परत एकदा सेहवागजवळ गेला त्याला थोडीफार शिवीगाळ केली आणि म्हणाला आता जर तू हवेत शॉट मारला तर पुन्हा  इकडे येऊ नको तसाच तिकडून हॉटेलला निघून जा. 

सेहवाग म्हणाला हा दादा आता हळू खेळतो. परत पुढच्या बॉलवर सेहवागने चौकार मारला तेव्हा गांगुली त्याच्याकडे गेलाच नाही दूरवरून तो सेहवागकडे बघत होता. ओव्हर संपल्यावर सुद्धा सेहवाग गांगुलीकडे गेला नाही. कारण गांगुलीने हळू खेळायला सांगितलं होतं.

ओव्हरमध्ये सेहवागने रॉनी इराणीला तब्बल २२ रन ठोकले होते. ओव्हर झाल्यावर खेळाडू एकमेकांसोबत बोलायला येतात ना त्यासाठी दोघेही आले नाहीत.

हा किस्सा सांगताना गांगुली म्हणतो,

यामुळे खेळाडू तयार होतात,  खेळणारा सेहवाग हा एकमेव खेळाडू होता पण कधी कधी तो माझंही ऐकायचा नाही आणि त्यामुळे मला त्याचा राग यायचा पण तो एक जबरदस्त बॅट्समन होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.