भर संसदेतून ‘वॉक आउट’ करणारा इतिहासातील पहिला नेता मराठी होता.

विधानपरिषदेत होणारा सत्ताधारी आणि विरोधकांचा होणारा गोंधळ आपण नेहेमीच पाहतो. हे इतिहासात देखील झालं आहे..पण विशेष म्हणजे असा सभात्याग करून बाहेर जाणारे कोणते नेते असतील असा प्रश्न खूपच कमी लोकांना पडला असेल.

सरकारी विधेयकाचा निषेध म्हणून विधानपरिषदेच्या बाहेर जाणारे पहिले  नेते म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले होय. असा नेता, ज्यांचा साधेपणा आणि त्यांचे भाषणातील माहिती म्हणजे आरोप नसायचे तर सत्यता असायची. एक नेता ज्याला गांधी आणि जीना दोघेही आपला राजकीय गुरू मानत.

त्यांची अचूक बजेट भाषणे ऐकण्यासाठी लोकं वर्तमानपत्र येण्याची वाट पाहत असायचे.

गोपाळ गोखले हे गरीब कुटुंबातील होते पण त्यांच्या वडिलांना शिक्षणाचे महत्त्व समजले. स्वतःला कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल मात्र आपल्या मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी मुलांना शिकवले. मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर गोखले गणिताचे प्राध्यापक झाले.

त्यांनी कॉंग्रेसच्या स्थापनेच्या चार वर्षानंतरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तेही त्यांचे गुरु महादेव रानडे यांच्या प्रेरणेने.

कॉलेजमधील गोखले यांचे मित्र बाळ गंगाधर टिळक होते, जे नंतर त्यांचे सर्वात प्रसिद्ध राजकीय प्रतिस्पर्धी बनले.

राजकारणात सुरुवातीला गोखले यांना मार्गदर्शन मिळाले ते रानडे व नौरोजी यांच्याकडून. यामुळे त्यांना ब्रिटीश संस्था आणि कायदे यांचे बारकाईने आकलन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मुंबईत विधान परिषद स्थापन केली गेली.

जेथे बजेट व इतर बिलांवर अनेक वादविवाद व्हायचे.

येथे ब्रिटनहून कायद्याचा अभ्यास करून आलेल्या मुंबईचा शेर म्हणला जाणारा आणि तरुण फिरोजशहा मेहता यांचाच आवाज असायचा. तो सरकारच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना आंधळा म्हणायचा.

आजच्या घडीला हे दिसणं कठीण आहे, इथे सरकारने सगळ्यांनाच आपल्या मुठीत ठेवलंय त्यामुळे कुणीही त्यांना विरोध करायला गेलच तर त्यांना वेगवेगळ्या मार्गाने अडकवलं जातं.

१९ व्या शतकाच्या अखेरीस, जेंव्हा मेहताची तब्येत ढासळायला लागली तेव्हा त्यांनी गोखलेंना परिषदेत आणलं

आणि मग गोखले देखील सरकारवर गरजायला लागले आणि ही वॉकआउट ची घटना घडली.

 शेतकर्‍यांकडून जमीन हक्क हिसकावण्याच्या प्रस्ताविक विधेयकाच्या दरम्यान हा प्रकार घडला. मेहता यांनी हे विधेयक रद्दबातल केले आणि सांगितले की ब्रिटीश सरकार असा बाप बनत आहे जो, गरिबीतही मुलांना जिवंत ठेवण्यासाठी आईला सांगतोय आणि स्वतः मात्र अय्याशी करत फिरतोय.

“भारतीय शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय आहे. काही नवीन मातीची भांडी. फुलांचे काही वन्य प्रकार. पोटभर जेवण, दिवसाला थोडीफार सुपारी आणि कधीकधी चमकदार चांदीचे दागिने. सण-उत्सवाच्या निमित्ताने सामान्य शेतकरी ज्याचे आयुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटाळवाण्या अथांग श्रमाची भावना असते अशा काही आनंदांपैकी हा एक आनंद आहे, इतकं साधं जीवन असत शेतकऱ्यांचं”

सरकार मात्र बहुमताच्या बळावर हे विधेयक मंजूर करण्यावर ठाम होते, त्यानंतर याचा निषेध म्हणजे मेहता, गोखले व इतर सदस्य सभागृहाबाहेर पडले.

हे अभूतपूर्व होते, ब्रिटीश परंपरेच्या संरक्षकांसाठी मात्र हा घाव मोठाच होता. त्यावेळी टाईम्स ऑफ इंडियाचे वृत्तपत्रात इंग्रजी संपादकाने लिहिले.

या सदस्यांचा त्वरित राजीनामा घ्यायला हवा.

अशाप्रकारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी मेहता यांची परंपरा परिषदेत जिवंत ठेवली.

१९०२ मध्ये ब्रिटीश वित्त सचिव एडवर्ड लॉ यांनी ७ कोटी बचतीचे बजेट सादर केले. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात होते. पण गोखले यांनी तसे केले नाही. ते म्हणाले, मी माझ्या विवेकामुळे, तत्वांमुळे मी सरकारचे अभिनंदन करू शकत नाही.

ते म्हणाले की, “देशाची खरी स्थिती आणि आर्थिक स्थिती यात समन्वय नाही. हे वक्तव्य करीत त्यांनी तार्किक आकडेवारी दिली आणि दुष्काळ असतानाही ब्रिटीश सरकारने कराचे, भाड्याचे दर कसे वाढविले हे सांगितले. सैन्यावर अवाढव्य खर्च केले आणि शिक्षणावरील खर्च मात्र कमी केला”.

गोखले यांच्या या भाषणांनी सरकारची खरी प्रतिमा पूर्णपणे उघडकीस आणली. देशी वृत्तपत्रांनी त्यांना  हाताशी धरले.

गोखले प्रसिद्ध झाले आणि कॉंग्रेसवरील त्यांची पकडही वाढली आणि १९०५ मध्ये ते पक्षाचे अध्यक्ष झाले. परंतु या मुदतीच्या शेवटी म्हणजेच १९०६ मध्ये पक्ष फुटला. कारण टिळकांशी त्यांचे विचार पटेनाशी झाले, टिळक हे ब्रिटीश साम्राज्याविरूद्ध तीव्र निषेध करणारे वकील होते. या संसदीय वादविवादातून काहीही मिळणार नाही असा त्यांचा विश्वास होता.

तर गोखले यांचे मत होते की भारतीयांनी प्रथम शिक्षित होणे आवश्यक आहे. तरच तो नागरिक म्हणून त्याचा हक्क म्हणजेच स्वातंत्र्य मिळवू शकेल.

या वादामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की गोखले यांच्यामुळे टिळकांना कॉंग्रेस सोडावी लागली.

आणि अशा प्रकारे देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष पहिल्यांदा विभाजित झाला.

त्याच्या १० वर्षांनंतर हे राजकारण संपुष्टात आलं गोखले यांचे निधन झाले आणि टिळकांनी गोखलेंचा निषेध करणे सोडले होते.

हे हि वाच भिडू:

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.