गुजरातच्या मोदींवर सर्वात जास्त प्रभाव महाराष्ट्राच्या वकील साहेबांचा आहे..

भाजपचे अनेक नेते सांगतात त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बराच मोठा प्रभाव आहे, त्यांची इन्स्पिरेशन म्हणजे मोदी ! देशात देखील मोदींची प्रभावशाली म्हणून प्रतिमा आहे.

पण मोदींचं इन्स्पिरेशन कोण आहे ? 

तर नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव पाडणारे व्यक्तिमत्व म्हणजे आरएसएसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव इनामदारइनामदार यांचे १९८५ मध्येच निधन झालं. मोदी इनामदार यांची तुलना भगवान रामाने श्रीलंकेसाठी बांधलेल्या ‘सेतूबंध’ सोबत करतात. मोदी त्यांच्या आयुष्यातील यशाचं श्रेय त्यांच्या गुरूंना देतात.

आपण जसं ऐकत आलोय की, मोदींचं आयुष्यच मोठं वैशिष्ट्यपूर्ण राहिलंय. आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मोदींनी आधी संघात आणि नंतर भाजपमध्ये स्वतःचं स्थान मजबूत केलं.  

१९६९ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी हायस्कूल पूर्ण केल्यानंतर मोदींनी वडनगरमधील आपले घर सोडलेकिशोर मकवाना यांच्या २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘कॉमन मॅन नरेंद्र मोदी’ या पुस्तकात ते म्हणतात, “मला काहीतरी करायचे होते पण काय करावे हे माहित नव्हते.” 

त्यांच्या याच स्ट्रगल स्टोरीतला टर्निंग पॉइंट म्हणजे, जेंव्हा त्यांच्या आयुष्यात वकील साहेबांची एंट्री होते.

इनामदार हे वकिल साहेब या टोपण नावाने संघात ओळखले जातात. मात्र,  फार कमी लोकांना याची माहिती आहे की, मोदींचे गुरु असणे आणि संघाचे कार्य करण्याच्याही पुढे जाऊन गुजरातमधील सहकार चळवळ पुढे नेण्याचे श्रेय इनामदार यांना दिले जाते. 

इनामदार यांचा जन्म १९१७ मध्ये पुण्यापासून १३० किमी दक्षिणेस असलेल्या खटाव नावाच्या गावात झाला. सरकारी महसूल अधिकाऱ्याच्या दहा मुलांपैकी एक असलेल्या इनामदार यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर १९४३ मध्ये त्यांनी संघात प्रवेश केला.

रामकृष्ण मिशनच्या मुख्यालयात काही काळ घालवला, नंतर गुवाहाटीला गेला. नंतर ते अल्मोडा येथील स्वामी विवेकानंदांच्या दुसर्‍या आश्रमात राहू लागले. दोन वर्षांनी वडनगरला परतलो. काही दिवस त्यांच्या घरी राहिल्यानंतर मोदी पुन्हा अहमदाबादला रवाना झाले आणि त्यांच्या काकांच्या चहाच्या स्टॉलवर काम करू लागले. काही काळानंतर ते पुन्हा एकदा शहरातील संघाचे मुख्यालय असलेल्या हेडगेवार भवनात राहणाऱ्या वकील साहेबांच्या संपर्कात आले.

त्याच दरम्यान संघाने इनामदार यांची गुजरातमध्ये संघाचे प्रांत प्रचारक म्हणून नेमणूक केली होती. ते शहरातल्या शालेय मुलांना संघाच्या शाखेत येण्यास प्रोत्साहित करत असत.  जवळपास १९६० च्या सुमारास मोदींची भेट इनामदार यांच्याशी झाली. 

मोदी संघात येण्याच्या प्रवासात इनामदार महत्वाचे ठरले !

लहान असताना मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथील इनामदार यांच्याशी मोदींची पहिली ओळख झाली. महाराष्ट्रात जन्मलेले वकील साहेब सध्याच्या गुजरातच्या त्या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामात गुंतले होते. मात्र, तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे नव्हते.

इनामदार वडनगरमधील त्यांच्या सभांना इनामदार अस्खलित गुजराती भाषेत संबोधित करत असत. त्यांची भाषणं ऐकून मोदी अगदी थक्क व्हायचे.

इनामदार यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आणि हैदराबादमध्ये निजामाच्या राजवटीविरुद्ध मोर्चे काढले. गुजरातमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक या नात्याने त्यांनी आयुष्यभर अविवाहित आणि साधे राहण्याचा नियम पाळला.

त्यांच्या याच आठवणी आणि गुरूंच्या शिकवणीवर २००८ मध्ये मोदींनी ‘ज्योतिपुंज’ नावाचं पुस्तक प्रकाशित केले होते. त्यात त्यांनी लिहिले होते, “दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या सहाय्याने आपला दृष्टिकोन श्रोत्यांना समजावून सांगण्याचे कौशल्य वकीलसाहेबांकडे होते. तुम्ही वाजवू शकता, तर ती बासरी आहे, अन्यथा ती फक्त लाकूड आहे”.

२०१४ च्या दरम्यान प्रकाशित झालेल्या ‘नरेंद्र मोदी: अ पॉलिटिकल बायोग्राफी’ या पुस्तकाचे लेखक असलेले अँडी मारिनो यांचे असे मत आहे की,

मोदींच्या आयुष्यात वाढलेले संघाचे महत्व, तसेच आयुष्यात गुरु म्हणून लाभलेले इनामदार, त्यांच्याशी वाढलेली जवळीक या सगळ्या गोष्टी मोदींचे वडील दामोदरदास यांना खटकत असत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या वडिलांसोबतचे संबंध फारसे चांगले नव्हते. 

अशा परिस्थितीत तरुण नरेंद्रला इनामदार यांच्यात एक वडिलांची व्यक्तिरेखा सापडली, ज्यांनी त्यांना केवळ राजकारणातच मार्गदर्शन केले नाही तर जीवनाच्या इतर संघर्षातही त्यांना मदत केली.

मात्र वडील हयात असतांना आपल्या पोराच्या आयुष्यात वडिलांच्या जागी दुसरे कोणी येणं, वडिलांसारखा व्यक्ती गुरु म्हणून मिळणे तेही विशेषत: वकील साहेबांसारखे स्थानिक नावाजलेले व्यक्तिमत्व, त्यांचा प्रभाव वाढणे हे त्यांच्यासाठी दुःखाची गोष्ट होती. आपल्या पोराला आपला काही उपयोग नाही अशा पद्धतीने मोदींचे वडील भावनिकदृष्ट्या दुखावले होते, असं लेखक लिहितात.

मात्र याच इनामदारांनी तरुण मोदींमधील ‘नेता’ ओळखला

इनामदारांनी युवा नरेंद्रमधील नेतृत्वगुण ओळखले होते. त्या दोघांमधील संपर्क वाढला, इनामदार मोदींच्या गावात वारंवार जाऊ लागले. इनामदार यांची मोदींशी वारंवार होणारी चर्चा आणि भेटींमुळे दोघांमधील दीर्घ आणि मजबूत संबंध तयार झाले. 

आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मोदींना इनामदारांचं मार्गदर्शन मिळालं. कुटुंब सोडून गुजरातला परतणे असो किंवा पुन्हा अभ्यास सुरू करणे असो. 

म्हणूनच मोदी वारंवार आपल्या गुरूंचा उल्लेख करतात की, वकिल साहेबांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव आहे.

इनामदार यांनी मोदींना संघटनेत सामील होण्यास सांगितले होते. मोदी सांगतात कि, ‘मी कुठल्यातरी संघटनेत सहभागी व्हावे, असे इनामदार सतत सांगत असायचे’.  इनामदार यांनी १९७१ च्या काळात नरेंद्र मोदींना दिल्लीला पाठवले, जेणेकरून ते बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या चळवळीत भाग घेऊ शकतील.

ही मोदींची पहिली राजकीय खेळी होती, ज्यामुळे ते तिहार तुरुंगात गेलेले. तसेच आणीबाणीच्या काळात मोदी भूमिगत राहिले होते असं वाचण्यात येतं. शिखाच्या आणि संन्याशीच्या वेशात मोदींचे फोटोही आपण पाहिलेत.  

असोत तर गुरूंच्या मार्गदर्शनाने मोदींची कारकीर्द सुरु झाली.

संघाने नरेंद्र मोदींना वडोदराचे विभाग प्रचारक बनवण्यात आले. नंतर त्यांना विभागीय प्रचारक बनवण्यात आले.  पण याच दरम्यान, मोदींचा इनामदार यांच्याशी असणारा संपर्क कमी झाला, पण आपल्या गुरूसोबत वेळ घालवण्याची संधी त्यांनी कधीही सोडली नाही. मोदी जेव्हा कधी अहमदाबादला जायचे तेव्हा ते इनामदारांना भेटायला वेळ काढायचेच काढायचे. 

मात्र १९८५ च्या काळात इनामदार यांचं निधन झालं.

आणि त्यानंतर १९८७ मध्ये संघाने मोदींना भाजपमध्ये पाठवले.

तसं मोदींनी राजकीय जीवनात २००१ मध्ये पहिल्यांदाच दिल्लीच्या ७ रेसकोर्स रोडवर पंतप्रधानांच्या निवासस्थानी पाऊल ठेवलं होतं.  त्याचं निमित्तही तसं खासच होतं.

तेंव्हा ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. मोदी त्यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी आले होते. 

या पुस्तकाचे अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं होतं. पुस्तकाचे नाव होतं ‘सेतुबंध’ !

ज्यामध्ये मोदींनी ‘वकील साहेबांची’ तुलना प्रभू रामाने लंकेला जाण्यासाठी बांधलेल्या पुलाशी केली आहे. तसं पाहिलं तर वकीलसाहेबांची मोदींच्या आयुष्यातील भूमिका ही नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनाला जोडणाऱ्या पुलासारखीच आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.