अमित शहांनी ‘गॅंग’ असा उल्लेख केलेल्या ‘गुपकार’ आघाडीचे नेते पंतप्रधान मोदींची भेट घेत आहेत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे एका महत्वाची बैठक बोलाविण्यात आली आहे. यात जम्मू काश्मिर मधील १४ प्रमुख नेत्यांना बोलाविण्यात आले आहे. काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकल्यानंतर अशा प्रकारे पहिल्यांदाचं केंद्र सरकार या नेत्यांशी चर्चा करत आहे.

यात मुख्य म्हणजे जम्मू काश्मीरचे ४ माजी मुखमंत्री सहभागी होणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि पीडीपी प्रमुख महबुबा मुफ्ती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी ही बैठक होणार आहे.

जम्मू काश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. यावेळी बैठकीत काश्मिर मध्ये होणाऱ्या निवडणुकी संदर्भात चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीर मध्ये निवडणूक व्हावी अशी भूमिका केंद्र सरकारची आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नेत्यांना भेटीसाठी बोलाविले असल्याची चर्चा आहे.

गुपकार आघाडीच्या स्थापने नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा गॅंग असा उल्लेख केला होता. आता याच गुपकार आघाडी सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेत आहेत.

गुपकार आघाडी काय आहे

दोन वर्षापूर्वी ऑगष्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरात मोठ्या हालचाली दिसून लागल्या होत्या. काश्मीर भागात सैनिकांची संख्या वाढविण्यात आली होती. काश्मिर मध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांना लवकर परत आपल्या राज्यात जायला सांगण्यात आले. अमरनाथ यात्रा थांबविण्यात आली होती. यानंतर काश्मीर मधील नेत्यांनी काही तरी मोठे घडणार असल्याचा अंदाज बांधला होता.

जम्मू काश्मीर मधील प्रमुख नेत्यांची बैठकी

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम-३७० हटविण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच ४ ऑगष्ट २०१९ रोजी राज्यातील प्रमुख ८ पक्षांच्या नेत्यांची बैठक फारूक अब्दुल्ला यांच्या घरात पार पडली. या बैठकीत एक प्रस्ताव पार पडला. त्याला गुपकार तोडगा असे नाव देण्यात आले.

या बैठकीत सामील झालेल्या नेत्यांनी ठराव केला होता की, जम्मू काश्मीरची स्वायत्ता आणि त्याला मिळालेला विशेष दर्जा टिकून ठेवण्यासाठी एक जुटीने काम करायचे. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, कॉंग्रेस, जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स आणि आवामी नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांच्या प्रमुखांनी या प्रस्तावर सही केली होती.

गुपकार नाव कसे पडले..

गुपकार हे एका रस्त्याचे नाव आहे. या रस्त्याच्या कडेला नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला घर आहे. काश्मिर मधील सर्व नेत्यांची पहिली बैठक फारुख अब्दुल्ला यांच्या घरी झाली होती. त्यामुळे या नेत्याच्या समूहाला गुपकर तोडगा असे नाव देण्यात आले होते.

कलम-३७० हटविल्यानंतर गुपकार आघाडीतील नेत्यांना अनेक महिने नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

मागणी काय आहे

कलम-३७०, जम्मू काश्मीरचे संविधान आणि राज्याचा दर्जा वापस घ्यावा अशा गुपकारची मागणी आहे. आता पर्यंत या नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत.    

ही गुपकार आघाडी नसून गॅंग आहे- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

काश्मिर मधील सर्व पक्षीय ‘गुपकार आघाडी’ वर टीका करतांना नोहेंबर २०२० मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, गुपकार गॅंग ही तिरंग्याचा अपमान करणारे आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे गुपकार गॅंगच्या मागण्यांना समर्थक आहे का. त्यांना आपली भूमिका व्यक्त करायला हवी.

गुपकार गॅंग ग्लोबल होत आहे. त्यांना असे वाटते की परकीय देशांनी जम्मू काश्मिर मध्ये दाखल द्यावी. हे लोक दलित महिला आणि आदिवासींचे अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न करत आहे. आम्ही कलम ३७० रद्द करून या लोकांना अधिकार दिल्याचे अमित शहा यांनी सांगितले होते. ही गुपकार आघाडी नसून गॅंग असल्याचा आरोप केला होता.

काश्मिर मधील प्रश्नांसाठी याच गुपकार आघाडीला सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बैठक घ्यावी लागत आहे. दोन वर्षानंतर काश्मिर मधील परिस्थितीत काहीसा बदल दिसत असल्याने अशा प्रकारची बैठक घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.