गाणगापूर ते दर्गा ; भारतातली अशी मंदिरे जी अंगात आलेली भूतं काढण्यात फेमस आहेत

आजवर आपण पछाडलेलं असं काय पाहिलं नाही. पछाडलेला माणूस, घर, दार, खिडक्या, वाडे, मांजर, कोंबड्या, कुत्री, शेळ्या आणि अजून लै काय काय पाहिलं असेल.. लैच डोक्याबाहेरच म्हणून ‘पछाडलेला’ सिनेमा पाहिलाय.

पण पछाडलेली मंदिर…कायSSS ???

होय भारतात अशी काही मंदिर आहेत जिथं पॅरानॉर्मल ऍक्टीव्हीटीज चालतात. काही मंदिरात लोकांना लागीर झालेली भूत पळवायला आणलं जात तर काही ठिकाणी स्वतः भूतच येऊन राहतात म्हणे.

बघूया मोस्ट हॉंटेड मंदिर

१. महेंद्रपुर बालाजी मंदिर, राजस्थान

Mehandipur Balaji 640x479 1

इथ लोक पाप धुवून काढण्यासाठी उकळत पाणी अंगावर ओतून घेतात.

राजस्थानमधील महेंद्रपूर बालाजी मंदिर हे भूत काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे बहुधा भारतातल एकमेव ठिकाण आहे जिथ लाईव्ह भूत काढण्याचा प्रकार चालतो. हे मंदिर राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात आहे. इथं पछाडलेली हजारो लोक स्वतःवर उकळत पाणी ओतून घेतात. तर काहीजण स्वतःला साखळदंडाने भिंतीला बांधून ठेवतात. असं म्हंटल जात की या जागेच्या आसपास बरीच भुतं फिरतात.

२. हजरत सय्यद अली मीरा दातार दर्गा, गुजरात

unnamed

दुष्ट आत्म्यांपासून मुक्त होण्यासाठी लोक इथल्या भिंतींवर स्वत:ला साखळीने लटकवून घेतात. .

ऊनिवा गावात हा दर्गा आहे. या दर्ग्यात मानसिकदृष्ट्या पीडित असलेल्या किंवा काही लोकांच्या मते भूतग्रस्त अशा महिलांना आणले जाते. इथे नेहमीच भयानक गोष्टी घडत असतात असे गावकरी सांगतात. विशेष म्हणजे येथे सर्व जातीधर्मातल्या भुतांचे स्वागत केले जाते.

३. श्री काष्टभंजन देव हनुमानजी मंदिर, गुजरात

hanuman ji

या मंदिरात लोक हनुमानाची पूजा करण्यासाठी व भूतांना पळवून लावण्यासाठी येतात. भाविकांच्या म्हणण्यानुसार हे स्थान भूत आणि भुताटकी झालेल्या लोकांना मुक्त करते.

४. देवजी महाराज मंदिर, मध्य प्रदेश

वाईट आत्म्यांपासून मुक्त मिळवण्यासाठी लोक त्यांच्या तळहातावर कापूर लावतात.

या मंदिरात पौर्णिमेच्या वेळी लोक भूतांपासून मुक्त होण्यासाठी मंदिरात येतात. या मंदिरात लोक धावत येतात. अशा बाधित लोकांना पवित्र झाडूने झाडले जाते. भूत जास्तच स्ट्रॉंग असेल तर लोकांना त्यांच्या तळहातावर कापूर जाळावा लागतो. दरवर्षी या मंदिरात ‘भुतांचा मेळावा’ देखील असतो. (माहित नसलेली सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे भुतांचा मेळावा)

5. दत्तात्रेय मंदिर, गाणगापूर

entry gate of shri dattatreya

या मंदिराच्या छतावर लोक लटकतात आणि देवाला शिव्या देतात.

हे मंदिर कर्नाटकातील गणगापुरात आहे. अमावस्या आणि पौर्णिमाच्या वेळी लोक येथे येतात. एकदा का सगळे जमले की सकाळी ११. ३० वाजता महामंगल आरती सुरू होते. यादरम्यान, ज्या लोकांमध्ये भुतं आहेत अशी लोकं किंचाळायला सुरवात करतात. असं म्हणतात कि त्यांना त्रास होत असतो म्हणून ते देवांना शिव्या देतात. काही जण तर अगदी भिंतीवर, मंदिराच्या तटबंदी वर चढण्याचा प्रयत्न करतात.

६. निजामुद्दीन दर्गा, दिल्ली

nizamuddindargah 1599290980

येथे एका बंद खोलीत एक्सॉरसिझ्म केले जाते अस म्हणतात.

या दर्ग्याच्या गर्दीपासून दूर एक खोली आहे जी लोकांना भूतांपासून मुक्त करते. त्या बंद खोलीत एक्सॉरसिझ्म केले जाते. एक्सॉरसिझ्म करताना त्या खोलीतून आरडाओरड, किंकाळणे ऐकू येते.

७. चंडी देवी मंदिर, हरिद्वार

येथे नवरात्रोत्सव काळात लोकांच्या अंगात येते.

चंडी देवीला, देवीचे एक हिंसक रूप मानले जाते. भूत पळवून लावण्यासाठी हरिद्वार मधलं महत्वाचं मंदिर आहे. खरं तर, नवरात्रोत्सवात देवीच वार इतकं तीव्र असत की देवीचं लोकांचा प्रत्यक्षात ताबा मिळवते, आणि लोकांच्या अंगात देवी संचारते. !

८. हर्सू भ्राम मंदिर, बिहार

दुष्ट आत्म्यांपासून मुक्त होण्यासाठी लोक या मंदिरात येतात.

हे मंदिर बिहार-उत्तर प्रदेश सीमेवर आहे. अस मानले जाते की हे मंदिर एका निराश ब्राह्मणच आहे. त्याची इच्छा होती कि लोकांनी त्याला देव मानून त्याची पूजा करावी. येथे लोक दुष्ट आत्म्यांपासून, मुक्त होण्यासाठी येथे जातात.

९. संत साबिर शाह दर्गा, चैनपूर

स्वत: ला बरे करण्यासाठी पुरुष स्वत:ला दर्ग्याच्या भिंतींवर साखळीने बांधून घेतात.

हा भारतातला असा दर्गा आहे जिथे सगळ्यात स्ट्रॉंग भूत उतरवली जातात. भुतांचे शक्य ते सर्व कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. या दर्ग्याचा परिसर भयानक आणि निर्विकारतेने भरला आहे.

तर भिडुनो हि आमच्या कानावर आलेली बातमी. यात आम्ही कुठंबी अंधश्रद्धेला खतपाणी घालत न्हाई. जे सापडले ते दाखवले एवढाच आमचा हेतू हाय. भूत काढणाऱ्या मंदिरांची स्टोरी वाचून ज्यांना ज्यांना असं वाटत की, “मी माझ्या सोताच्या डोळ्यांनी त्या जागी भुताचा नाच बघितलाय..शिरप्याच्या अंगात भूत आलं हुत.. आयच्यान्‌ खोटं न्हाई” अशा येड्यांनी  आपापल्या शिरप्याला इथं घेऊन जायला हरकत नाही.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. Harshal Pathak says

    आमच्या गावाला पण एक दर्गा आहे तिथे भुतं काढली जातात बमोशी बाबाची दर्गा मुक्काम पोस्ट चाळीसगांव तालुका चालिसगाव जिल्हा जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.